' रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये सकारात्मकतेचा देखील आहे मोठा हात…!! – InMarathi

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये सकारात्मकतेचा देखील आहे मोठा हात…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागच्या वर्षीपासून सुरु झालेली कोरोना नावाची महामारी २०२१ हे वर्ष मध्यावर आले तरी सुरु आहेच. किंबहुना २०२१ मध्ये या कोरोनाचे स्वरूप अधिक भयानक आहे. कोरोनाने आपल्या जीवनात प्रवेश केला आणि आपले संपूर्ण जीवनच बदलून गेले.

समाजप्रिय असणारा मनुष्य क्षणात समाजापासून तुटला आणि घर नावाच्या तुरुंगात अडकला. मनोरंजनाची साधने असलेल्या टीव्ही, सोशल मीडिया, रेडिओ, वृत्तपत्रे आदी अनेक साधनांमधून, सध्या फक्त आणि फक्त नकारात्मकता पाहायला, वाचायला, ऐकायला मिळते आहे.

 

negativity 3 in marathi

 

==

हे ही वाचा : कोरोनामुळे वाढलेल्या नकारात्मकतेचा दूरगामी परिणाम होऊ द्यायचा नसेल तर “हे” वाचणं आवश्यक आहे

==

ही नकारत्मकता आपल्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम करते. कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती खूप महत्वाची असल्याने, सध्या प्रत्येक जण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी विविध उपाय देखील केले जात आहेत.

 

immunity inmarathi

 

या सर्वांमधे एक उपाय अतिशय महत्वाचा ठरत आहे आणि तो उपाय म्हणजे आपल्यात असणारी सकारात्मकता.

आता तुम्ही म्हणाल सकारात्मकता आणि रोगप्रतिकारशक्ती यांचा काय संबंध? संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, जर तुम्ही सकारात्मक राहाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल.

आपल्या शरीरावर रोगांच्या होणाऱ्या आक्रमणाला पळवून लावण्यासाठी किंवा आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती खूप महत्वाची असते. सध्या कोरोना रुग्णांना किंवा सामान्य लोकांना एक वाक्य खूप ऐकायला मिळते ते म्हणजे ‘Be Positive’.

 

positivity in marathi

 

आजूबाजूला इतकी नकारात्मकता असताना सकारात्मक कसे राहावे? सकारात्मक राहण्यासाठी पर्यायाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल?

आनंदी राहा

नकारत्मकता आणि तणाव हे आपल्या शरीरात नकळत प्रवेश करतात आणि आपल्या शरीराचे मानसिक स्वास्थ बिघडवतात. त्यामुळे आनंदी राहा. स्वतःला वेळ द्या.

 

be happy inmarathi

 

===

हे ही वाचा : सभोवतालच्या ५ नकारात्मक गोष्टी ज्या तुम्हाला depression मध्ये नेवु शकतात

===

नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष

नकारात्मक गोष्टी आपल्या शरीरावर आणि मनावर जलद आणि मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

 

ignore neg in marathi

 

अतिविचार टाळा

सतत कोणता ना कोणता विचार करणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यासाठी अतिविचार टाळा. स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा, जेणेकरून तुमच्या डोक्यात विचार येणार नाही.

 

overthinking inmarathi

 

 

सोशल मीडियापासून दूर रहा

सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करणे शक्य झाले तर उत्तम. तेवढे शक्य नसल्यास किमान सोशल मीडियाचा वापर कमी करा. आठवड्यातून एक संपूर्ण दिवस सोशल मीडियापासून लांब राहा. सोशल मीडियावरील अफवा आणि चुकीची माहिती पसरवू नका.

 

soshal media in marathi

 

योग्य व्यायाम आणि ध्यान करा

व्यायामाने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. यासाठी रोज थोडा तरी व्यायाम करा. विशेषतः श्वासांचे व्यायाम नक्की करा. सोबतच ध्यान देखील करा.

 

yoga in marathi

 

वाचन करा

लॉकडाउनच्या काळात ऑफिसच्या कामातून वेळ मिळाल्यावर उत्तम काहीतरी वाचा. पुस्तकं देखील सकारात्मकता आणि मानसिक स्वास्थासाठी चांगला पर्याय आहे.

 

read in marathi

 

सकस आहार घ्या

कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकारत्मकतेसोबतच उत्तम आहारदेखील खूप महत्वाचा आहे. ताजे, गरम, प्रोटीनयुक्त जेवण घ्या.

 

healthy food InMarathi

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

हे ही वाचा : फार काही नाही, या एका शब्दाचं उच्चारण आहे तंदुरुस्त शरीर, मनाची गुरुकिल्ली!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

महत्वाच्या ऐतिहासिक व वर्तमान घडामोडींची माहिती : inmarathi.com

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?