आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोरोनाचे पहिले आणि मोठे लक्षण म्हणजे कोरडा खोकला आणि ताप. कोरोनाआधी कोरडा खोकला ही एक सामान्य बाब होती, मात्र कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर खोकला ही एक मोठी गोष्ट ठरत आहे.
या खोकल्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले तर याचे गंभीर परिणाम देखील होत असल्याचे समोर येत आहे. सर्दी, खोकला होणे ह्या छोट्या वाटणाऱ्या समस्या पुढे जाऊन एका गंभीर आजारांचे रूप घेतात. त्यासाठी सुरुवातीलाच यावर उपाय करणे गरजेचे आहे.
यासाठी तुम्ही घरातल्या सोप्या आणि सध्या गोष्टी वापरून खोकल्याला नियंत्रण आणू शकतात. जाणून घ्या खोकल्यावरील घरगुती आणि सोपे उपाय.
मध :
कोरड्या खोकल्या झाल्यावर मधाचे सेवन उत्तम उपाय आहे. कोरडा खोकला कमी करण्यासाठी कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स करून ते प्या.
हा उपाय जर नियमित केल्यास खोकल्यात लवकर आर्म मिळतो. शिवाय मधामुळे घशातील खवखव सुद्धा कमी होते.
हळदीचे दूध :
हळदीचे दूध अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. तुमचा कोरड्या खोकल्याचा त्रास काही दिवसात कमी होईल. हळदीमध्ये असलेल्या कर्रक्युमिन नावाच्या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित आजारांचा त्रास कमी होतो.
गरम पाण्याची वाफ :
सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे देखील कठीण होते असल्यास वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो. श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते.
–
हे ही वाचा – अंघोळ करताना केलेली फक्त “ही” एक गोष्ट कित्येक आजारांना कायम दूर ठेवेल…
–
आले आणि मीठ :
आल्याचा छोटा तुकडा बारीक करून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाका. हे मिश्रण आपल्या दाढेखाली ठेऊन त्याचा रस हळूहळू घशामध्ये घ्यावा. पाच मिनिटांनंतर हे मिश्रण फेकून द्या आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नये.
ज्येष्ठमधाचा चहा:
एका कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर टाकून ते पाणी उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला पाहिजे तर त्यात देखील मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा प्यायला तर खोकल्यात आराम मिळेल.
लसूण :
लसूणच्या काही पाकळ्या तुपात तळून घ्याव्या आणि त्या गरम-गरम खा. त्याने गळ्याला शेक मिळतो आणि आराम मिळतो. कोरड्या खोकल्यासाठी लसूण उत्तम औषध आहे.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या :
एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने दिवसातून दोन वेळा गुळण्या करा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते.
–
हे ही वाचा – मानवी स्पर्श झाला तर पाने मिटवून घेणारी ही वनस्पती आहे अनेक आजारांवर उपयुक्त!
–
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.