Site icon InMarathi

इलॉन मस्क नव्हे – विजेवर चालणारी कार या भारतीयाने शोधून काढली होती…!

reva feature inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या आर्थिक परिस्थितीत इंधनाचे भाव उच्चांकी आहेत. तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांना हे महागलेला इंधन परवडत असेलच याची काही शाश्वती नाही परंतु इतकी वर्ष पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आपण सर्वजण नाईलाजाने इंधनावरील गाड्या सर्रास वापरत होतो.

इंधनाचे दर काय आहेत याचा विचार न करता परंतु मंडळी लक्षात घ्या गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे इंधनाला अनेक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणजेच विजेवर काम करणाऱ्या गाड्या, हा सर्वात चांगला पर्याय आहे.

 

 

इलॉन मस्क याची टेसला नावाची कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल साठी जगप्रसिद्ध आहे परंतु तुम्हाला माहित आहे का इलॉन मस्कच्याही आधी एका भारतीय इंजिनियरने इलेक्ट्रिक व्हेईकल तयार केली होती आणि फक्त तयारच केले नाही तर ती इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात देखील उपलब्ध होती. कोण आहे तो भारतीय इंजिनियर जाणून घेऊयात या लेखामध्ये….

मंडळी अगदी दहा वर्षांपूर्वी जर कोणी चार चाकी गाडी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला इलेक्ट्रिक व्हेईकल सुचवली असती तर तो ग्राहक हसला असता.

परंतु आज संपूर्ण जगातील ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला हे कळाल आहे की पेट्रोल डिझेल या सारख्या इंधनावर चालणाऱ्या गाड्या आता काही वर्षातच इतिहास जमा होतील आणि येणारा भविष्यकाळ इलेक्ट्रिक व्हेईकलचा. त्यामुळेच सध्या जगभरातील नामांकित ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोडक्शन घेत आहेत आणि तेही मोठ्या प्रमाणावर.

 

हे ही वाचा – भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या..

जगभरातील नामांकित कंपन्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे एका भारतीय इंजिनीयरला मात्र खूप आधीच सुचलं होतं.

चेतन मैनी या भारतीय इंजिनियरने रेवा इलेक्ट्रिकल्स या कंपनीची स्थापना करत इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करण्याची सुरुवात केली तेही १९९९ मध्ये म्हणजे आज पासून अंदाजे बावीस वर्षआधी. चेतन यांचे शिक्षण अमेरिकेत झालं. मिशिगन विद्यापीठात शिकत असताना पहिल्यांदा त्यांना जाणवलं की त्यांना वाहनांमध्ये प्रचंड आवड आहे.

मिशिगन विद्यापीठात शिकत असताना जनरल मोटर्स या कंपनीने ठेवलेली स्पर्धा त्यांच्या संघाने जिंकली आणि त्यासोबतच त्यांच्या संघाने जनरल मोटर्स तर्फे एक सहल देखील जिंकली.

या सहली दरम्यान प्रवास करत असताना चेतन यांनी सोलर एनर्जी वर काम करणारी गाडी पहिल्यांदाच पाहिले संपूर्ण सहली दरम्यान ते याच वाहनाने प्रवास करत होते आणि त्यांना एकदाही त्या गोष्टीचा त्रास झाला नाही.

 

 

या सहली मुळे त्यांच्यातील जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांनी पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स देखील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पूर्ण केला.

मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण भारतासाठी इलेक्ट्रिक व्हेईकल च्या क्षेत्रात काही योगदान देऊ शकतो का? आणि त्यांनी त्यासाठी काम करायला सुरुवात केली. याच काळात रेवा या इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या कंपनीचे मुहूर्तमेढ रोवली गेली.

१९९९ ला चेतन यांच्या लक्षात आलं की, फक्त इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणे एवढंच पुरेसं नाही तर त्यासाठी सर्वसामान्यांचा प्रबोधन देखील करावे लागणार आहे.

व्यवसायदेखील त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, भारताचा विचार केला तर इलेक्ट्रिक व्हेईकल या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणारे तज्ञ मंडळी आणि कौशल्य असणारे कामगार देखील नव्हते.

यावर उपाय म्हणून चेतन यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या काही कामगारांना इलेक्ट्रिक व्हेईकल इंडस्ट्री बद्दल मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांनी त्यांना आवश्यक असणारे कौशल्यपूर्ण कामगार मिळवले आणि त्यांची गरज भागवली.

 

 

चेतन यांच्यासाठी सुरवातीचा काळ अत्यंत कठीण होता परंतु मागील काही वर्षांचा विचार केला तर तो काळ मात्र चेतन आणि त्यांच्या रेवा इलेक्ट्रिकल्स या कंपनीसाठी आनंददायी होता, कारण २०१० मध्ये महिंद्रा या नामांकित कंपनीने त्यांना या क्षेत्रात सहकार्य करायचे मान्य केले २०१० नंतर रेवा इलेक्ट्रिकल या कंपनीचे नाव महिंद्रा रेवा असे करण्यात आले.

महिंद्रा सारख्या मोठ्या कंपनीचं पाठबळ तर चेतन यांना मिळालेच परंतु त्यासोबतच अनेक गोष्टी त्यांना फायदेशीर ठरत होत्या. त्या गोष्टी म्हणजे भारतीय सरकारचे इलेक्ट्रिक वेहिकल्स बद्दल बदललेलं मत, पेट्रोल डिझेल सारख्या आवश्यक इंधनाचे वाढणारे भाव या आणि अशा अनेक घटकांमुळे चेतन यांच्या कंपनीला मोठी किंमत आली.

 

 

 

हे ही वाचा – कारचा संपूर्ण कायापालट करणारा जादूगार; एक वेगळं करियर करायचंय? जरूर वाचा

सुरुवातीला त्यांच्या कंपनीत कोणीही पैसे गुंतवायला तयार होतं परंतु परिस्थिती बदलल्यावर अनेक नामांकित इन्वेस्टर त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी उत्सुक होते.

आज महिंद्रा रेवा भारतातीलच नव्हे तर जगातील इलेक्ट्रिकल व्हेइकल्स क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते इलेक्ट्रिकल वेहिकल्स एवढच नाही तर त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची सामग्री महिंद्रा रेवा जगभरात पोचवत आहे.

या भारतीय कंपनीचा आणि भारतीय व्यक्तीचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version