आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
१९७७ ची एक संध्याकाळ, आणीबाणी नुकतीच संपली होती आणि या लाटेवर स्वार होत जनता पार्टीचं सरकार सत्तेत आलं होतं. जातीभेद नष्ट करण्यासाठी म्हणून जनता पार्टिनं कॉन्स्टिट्युशन क्लबमधे तीन दिवसांच्या कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं होतं. या कॉन्फरन्सचं मुख्य आकर्षण होते राजनारायण.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
मंचावर येत राजनारायण यांनी दलितांच्या हिताच्या अनेक गोष्टी सांगण्यास सुरवात केली मात्र हे सांगत असताना त्यांनी एक गंभीर चूक केली. दलितांचा उल्लेख त्यांनी वारंवार, हरिजन असा केला.
मंचावर आणि समोर प्रेक्षकांतही अनेक मान्यवर दलीत नेते उपस्थित होते मात्र त्यांच्यापैकी कोणीहीयावर चकार शब्दानं आक्षेप घेतला नाही. राजनारायण यांच्या भाषणानंतर अनेक नेत्यांची भाषणं झाली आणि मग एक तरूणी मंचावर आली.
इतका वेळ खदखदत असलेला असंतोष तिच्या तोंडून प्रखरपणे बाहेर पडू लागला. तिनं समाजवादी नेत्यांच्या अक्षरश: चिंध्या केल्या. तिनं सांगितलं की दलितांसाठी हरिजन हा शब्द उच्चारणं चुकीचं असताना समाजवादी नेते जे स्वत:ला दलितांचे कैवारी समजतात त्यांना इतकी समजही असू नये?
बाबासाहेबांनी देखिल हरिजन हा शब्द बाद करून त्याऐवजी अनुसुचित जाती अर्थात शेड्युल कास्ट हा शब्दप्रयोग केलेला आहे. इतकं भानही या नेत्यांना नसावं? आणि हे आमचं नेतृत्व आहे?
मायावतींचं हे भाषण ऐकून समोर उपस्थित समुदायात एक नवी चेतना जागली आणि जनता पार्टिच्या निषेधाच्या घोषणा सुरू झाल्या. मायावती भाषण संपवून खाली उतरल्या आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरश: वर्षाव चालू झाला.
अनेक दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मायावतींचं अभिनंदन केलं, यात एक संघटना होती, बामसेफ. काशिराम यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांचं लक्ष मायावतींकडे गेलं आणि काशिराम यांच्यापर्यंत ही बातमी गेली.
बामसेफसोबत काम करण्यास त्यांच्या वडिलांचा विरोध होता मात्र हा विरोध झुगारून देत त्यांनी सिव्हिल सर्विसेसचा अभ्यास सोडून चळवळीत स्वत:ला झोकून देण्याचा निर्णय घेतला आणि नंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही.
मायावतींच्या राजकीय प्रवासात अनेक वादळं आली मात्र यापैकी बहुचर्चित वादळ ठरलं ते म्हणजे, गेस्ट हाऊस कांड.
१९९५ साली, चोवीस पंचवीस वर्षापूर्वीची ही घटना राजनैतिक वर्तुळात भुकंप आणणारी ठरली होती. १९९२ साली उत्तर प्रदेशातील दोन तुल्यबळ नावं होती, मुलायम सिंह आणि मायावती. या दोघांच्या राजकीय पक्षांनी म्हणजेच सपा आणि बसपानं युती केली होती.
मात्र १९९५ साली मायावती यांनी मुलायम सिंह सरकारला असणारा पाठिंबा काढून घेतला, या पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयामुळे दोन्ही पक्षात आणि नेत्यांत कडवटपणा आला होता.
या घटनेनंतर घडलेलं गेस्ट हाऊस कांड हे केवळ मायावती-मुलायम यांच्या वैराचं जाहिर प्रदर्शन नव्हतं तर भारतीय राजकारण किती खालच्या थराला जाऊ शकतं याचं किळसवाणं दर्शन होतं. भारतीय राजकाराणाला लावलेला काळा डाग असं या घटनेचं वर्णन करता येईल.
१९९२साली मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पार्टीची स्थापना केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी भाजपच्या उत्तर प्रदेशातल्या वाटा बंद करण्याच्या हेतूनं बसपासोबत राजकीय लाभातून युती केली होती.
सपा आणि बसपा २५६ आणि १६४ जागांवर निवडणूक लढले. सपानं १०९ जागा तर बसपानं ६७ जागांवर दावा दाखविला. मात्र केवळ राजकीय लाभापोटी केलेली ही युती फारशी टिकली नाही. आधीपासूनच असलेला बेबनाव आता आणखीन तीव्र बनू पहात होता.
अशातच भाजपनं अल्पमतात असणार्या बसपाला पाठींबा दाखवला. मायावतींनी सपाचा पाठींबा काढून घेण्याचं ठरविलं.
मायावतींच्या या निर्णयानंतर भाजपाने उत्तर प्रदेशाचे तत्कालिन राज्यपाल मोतीलाल वोहरा यांना पत्र दिलं की जर उत्तर प्रदेशात बसपा सरकार बनविण्याचा दावा करणार असेल तर भाजपचं त्याला समर्थ असेल.
–
राष्ट्रगीताची “सक्ती” आणि “वंदेमातरम की जन गण मन वाद” : RSS कार्यकर्त्याच्या नजरेतून
अट्टल बदमाश गुन्हेगार भाजपात सामील झाल्याबद्दल एका समर्थकाने व्यक्त केलेले विचार…
–
यानंतर काही दिवसांनी मायावतींनी चर्चेसाठी लखनऊ गेस्ट हाऊसमधे आपल्या मंत्र्यांची बैठक बोलवली. समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना या बैठकीची कुणकुण लागताच ते गेस्ट हाऊवर जाउन थडकले.
गेस्ट हाऊसबाहेर जमलेल्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बसपाच्या मंत्र्यांना मारायला सुरवात केली. हे सगळं घडत असताना बसपाच्या सुप्रिमो असणार्या मायावतींनी स्वत:ला गेस्ट हाऊसच्या एका खोलीत बंद करून घेतलं होतं.
समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती कळताच त्यांनी या खोलीवर हल्ला बोल केला. दार जोरजोरात ठोठावत असतानाच मायावतींवर शिव्यांचा मारा केला. अत्यंत हिणकस असे शेरे मारले.
अत्यंत खालच्या पातळीवर जात सपाच्या कार्यार्त्यांनी अक्षरश; नंगानाच चालविला होता.
तो जमाना लॅण्डालाईनचा होता. आजच्यासारखे मोबाईल त्या काळात नसल्यानं खोलित अडकलेल्या मायावतींना मदतीची याचना करणं कठीण होऊन बसलं होतं. मात्र भारतात जो काही अल्पकाळ पेजर चालला तो हा काळ होता.
सिकंदर रिजवी यांनी मायावतिंना पेजर करून सांगितलं की वाट्टेल ते झालं तरीही दार उघडू नका. बसपाचे काही नेते जखमी होऊन घायाळ होत हॉस्पिटलमध्ये गेले तर काही या प्रकाराला घाबरून पळाले.
काहीजण मात्र धैर्यानं गेस्ट हाऊसवर थांबले आणि पोलिसांकडे मदतिसाठी फोन करू लागले. योगायोग असा की फोनची रींग नुसतीच वाजत राहिली. पलिकडून ना कोणी फोन उचलला ना कोणी मदतीसाठी आलं.
खोलीत बंद मायावतींनी दाराला अडणी म्हणून खोलीतलं सर्व जड सामान लावल होतं. जेणेकरून कडी तुटून दार उघडलंच तर ते उघडलंच जाऊ नये.
या भयानक प्रसंगातून मायावती कशा सुटल्या याच्या दोन थिअरीज प्रचलित आहेत. काहींच्यामते भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्याने मायावतींची सुटका केली तर काहींच्यामते त्यावेळेस उपस्थित मिडियानं मायावतींची सुटका केली.
असं म्हणतात की या सगळ्या प्रकरणात मायवतींवर शारीरिक हल्लासुद्धा झाला होता त्यांचे कपडे फाडण्यात आले होते.
तत्कालीन बीजेपी विधायक ब्रम्हदत्त द्विवेदी यांनी मायावती यांना तिथून वाचवलं असं म्हंटलं जातं. संघाचे कार्यकर्ते असल्याने ते लाठी चालवण्यात निपुण होते, आणि तसेच ते तिथल्या लोकांना सामोरे गेले आणि मायावती यांना सुखरूप बाहेर आणले.
जेव्हा याच ब्रम्हदत्त द्विवेदी यांची हत्या करण्यात आली तेव्हासुद्धा मायावती यांना अतीव दुख झाले. शिवाय जेव्हा ब्रम्हदत्त यांच्या विधवा पत्नीने निवडणुकीत उभे राहायचे ठरवले तेव्हा मायावती यांनी स्वतः त्यांच्यासाठी प्रचार केला आणि त्यांच्या विरोधात एकही उमेदवार उभा केला नाही.
यानंतर मायावती सहीसलामत बाहेरही आल्या आणि मुख्यंमत्रीही बनल्या मात्र त्यांनी त्याहीवेळेस आणि नंतरही जाहिरपणे सपावर आरोप करत सांगितलं की त्या संध्याकाळी गेस्टहाऊसवर त्यांना कायमचं नष्ट करण्यासाठीच सपाचे कार्यकर्ते आले होते.
मायावती आणि त्यांचा पक्ष दोन्ही एका झटक्यात नष्ट करण्याचं हे कारस्थान होतं. या घटनेमुळेच त्यानंतर या दोन्ही पक्षात आणि नेत्यात कायमचं वैर आलं.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.