Site icon InMarathi

इंदिरा गांधींना कोर्टापासून निवडणुकीपर्यंत हरवत नेणारा “राजकारणातील विदूषक”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्हाला हे माहिती आहे का? की भारताची आयर्न लेडी इंदिरा गांधी यांचा भारतातील राजकीय झंझावात रोखण्याची किमया एका व्यक्तीने करून दाखवली आहे. एव्हढेच नाही तर त्यासाठी प्रसंगी कारावास ही भोगला आहे

त्या व्यक्तीची एकूण आयुष्यातील १७ वर्षे तुरुंगात गेली. स्वातंत्र्यापूर्वी ३ वर्षे आणि स्वातंत्र्यानंतर १४ वर्षे. असे म्हंटले जाते की इंदिरा गांधी यांना जर कुणाचे भय असेल तर याच व्यक्तीचे.

 

===

हे ही वाचा “आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींच्या ‘ह्या’ चुका त्यांना प्रचंड महागात पडल्या!

===

कारण इंदिराजीनी आणीबाणी लावण्याचे कारणही हीच व्यक्ती होती. आपल्या कार्यकालात याच व्यक्तीने काशी विश्वनाथ मंदिर दलितांसाठी खुले व्हावे म्हणून आंदोलन केले होते आणि आरोग्यमंत्री बनल्यावर गोरगरिबांच्या उपचारासाठी सरकारी दवाखाने खुले केले. आर्थिक मदत सुरू केली.

आपली खासगी संपत्ती आणि जमीन या व्यक्तीने गरिबांमध्ये वाटून टाकली होती. कधीही आपल्या वैयक्तिक फायद्याचा विचार या व्यक्तीने केला नाही.

२९ मार्च १९७९ या दिवशी जनता पार्टीतील १५० हून अधिक संसद सदस्यांनी आपल्या सह्या असलेला एक अर्ज तयार केला, ज्यात पक्ष विरोधी कामे केल्याबद्दल पूर्व आरोग्यमंत्री राज नारायण यांना पक्षातून निष्कासित करण्यात यावे अशी मागणी केलेली होती.

 

 

हे तेच राज नारायण आहेत ज्यांनी १९७७ मधील लोकसभा निवडणुकीत भारताच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंदिरा गांधी यांना पराभूत केले होते आणि ज्यांना जनता पक्षाच्या विभाजनासाठी जबाबदार धरण्यात आले.

काय होती ती कथा? ज्यात भारतीय राजकारणातील विदूषक म्हणून ओळखल्या गेलेल्या या दिलखुलास माणसाने इंदिरा गांधींना हरवले होते. चला तर जाणून घेवूया..

राज नारायण हे एक पूर्ण वेगळ्या व्यक्तिमत्वाचे नेता होते. राममनोहर लोहिया यांचे निकटवर्तीय असलेले राज नारायण सोशालिस्ट पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

डॉ. युगेश्वर कल्हण लिखित पुस्तक , ‘आपातकाल का धूमकेतू’ या पुस्तकात असे नमूद करण्यात आले आहे की राज नारायण यांनी इंदिरा गांधीविरुद्ध प्रत्येक शक्य ठिकाणी लढाई लढली. मग ती रस्त्यावरील आंदोलनात असो की संसदेत असो की निवडणुकीच्या रिंगणात नाहीतर अगदी न्यायालयात देखील.

१९७१ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदार संघात इंदिराजीच्या अगेन्स्ट कोणीतरी मातब्बर व्यक्ती उभी राहणे गरजेचे होते. पण कोणाचीच तयारी नव्हती. न की चंद्रभानू गुप्ता किंवा चन्द्रशेखर.

===

हे ही वाचा या घटना घडल्या…आणि इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली!

===

अशावेळी राज नारायण सिंह संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास तयार झाले आणि ती निवडणूक ते हरले सुद्धा. यानंतरच खर्‍या राजकीय लढाईला सुरवात झाली.

 

 

निवडणूक प्रचारादरम्यान इंदिराजींच्या प्रत्येक चुकीच्या कृतीवर राज नारायण यांचे लक्ष होते. ते इंदिराजींच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीचे रेकॉर्ड ठेवत होते. निवडणूक संपल्यानंतर राज नारायण जमा केलेल्या सर्व पुरव्यांनीशी न्यायालयात गेले आणि त्यांनी इंदिराजींवर सात आरोप लावले.

खटला सुरू झाला,तो जवळपास ५ वर्षे चालला. एक वेळ अशी आली की खुद्द इंदिराजीना न्यायालयात हजर राहून सफाई द्यावी लागली. शेवटी ५ वर्षानी खटल्याचा निकाल राज नारायण यांच्या बाजूने लागला.

न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिराजींच्या कोणत्याही दबावाची पर्वा केली नाही व रायबरेली निवडणुकीचा निकाल अवैध असल्याचे घोषित केले.

पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधी यांच्या लिहीलेल्या आत्मचरित्रात देखील या घटनेचा उल्लेख आहे. १२ जून १९७५ साली या खटल्याचा निकाल आला आणि बरोबर १४ दिवसांनी इंदिराजी यांनी आणीबाणी घोषित केली.

 

 

या नंतर काही तासातच राज नारायण, जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, सत्येंद्र नारायण सिन्हा आणि अटलविहारी वाजपेयी यांना अटक करण्यात आली. देशभरात अनेक जणांना तुरुंगात टाकण्यात आले इतका राज नारायण यांचा दरारा तयार झाला होता.

या धरपकडीच्या सत्रामुळे मात्र सारा विपक्ष एकत्र यायला मदत झाली. यानंतर मात्र १९७७ मध्ये जेव्हा आणीबाणी हटवून इंदिरा गांधी यांनी पुन्हा निवडणूक जाहीर केली तेव्हा रायबरेली मतदार संघातून पुन्हा राज नारायण इंदिराजीच्या विरोधात निवडणुकीत उभे राहिले इतकेच नाही तर जिंकले सुद्धा.

“जोवर राज नारायण जीवंत आहे. तोवर लोकतंत्र जीवंत आहे.” राममनोहर लोहिया यांनी राज नारायण यांच्यासाठी काढलेले हे उद्गार आहेत.

 

 

राज नारायण यांनी आपल्या मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. अतिशय साध्या पद्धतीने जगणार्‍या राज नारायण यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या बँक खात्यात फक्त १४५० रुपये होते.

आपल्या राजकीय प्रवासात इंदिरा गांधींना एकाच व्यक्तीकडून हार पत्करावी लागली.. ती व्यक्ति म्हणजे राज नारायण!

===

हे ही वाचा आणीबाणी आणि “एका चित्रपटामुळे” संजय गांधीं गेले थेट तुरुंगात!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version