' शिर्डी मंदिराप्रमाणे आणखी एका मंदिरात छोटे कपडे घालून जाता येणार नाही… – InMarathi

शिर्डी मंदिराप्रमाणे आणखी एका मंदिरात छोटे कपडे घालून जाता येणार नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या देशात मंदिर आणि त्यांचा इतिहास खूप मोठा आहे प्रत्येक मंदिररामागे काही ना काही पौराणिक कथेचा संदर्भ आहेच. काही मंदिर हि आजही स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.

काही मंदिरांमध्ये आजही स्त्रियांना प्रवेश नाही तर काही मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश नाही. केरळ मधील पादनात मंदिराची केस अजूनही कोर्टात चालू आहे.

कोणत्याही धार्मिक स्थळांना भेटी देण्यामागे जशी भक्तांची धार्मिक श्रद्धा असते तसे भाविकांनी देखील त्या मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे. काही महिन्यांपूर्वी शिर्डी संस्थानने जे लोक गुडघ्याच्या वरती असलेले कपडे घालून येतील त्यांना मंदिरात प्रवेश नाही. यावरून मोठा गदारोळ झाला होता.

 

shamalji inmarathi

 

कपड्यांचा हा नियम आणखीन एका मंदिरात ही लागू केला आहे. चला तर जाणून घेऊयात त्या मंदिराबद्दल:

मेहसाणा – उदयपूर राज्य महामार्ग क्र. 8 वर शामलाजी हे शहर आहे. हे शहर गुजरात आणि राजस्थान या राज्यांच्या सीमेवर असून आरवली पर्वत रांगांमधून वाहणार्‍या मेश्वो नदीच्या काठी वसले आहे. शामलजी हे मध्ययुगीन भारतातीलही महत्वाचे शहर होते जिथे लांबवर व्यापार करणारे व्यापारी विश्रांती साथी थांबत.

 

shamalji 2 inmarathi

 

या शहरापासून पुढे आरवली पर्वतरांगा सुरू होत असल्याने व्यापर्‍यांचे हे महत्वाचे विश्रांतीस्थळ होते. एवढाच या शहराचा इतिहास नाही तर मेश्वो नदीचा इतिहास व संस्कृति हा अतिशय पुरातन ठेवा आहे.

पाषाणयुग व लघु पाषाण युगातील अनेक वारसास्थळे या नदीकिनारी सापडली आहेत. या स्थळांचा शोध एम. एस. विश्वविद्यालयातील पुरातत्व विभाग व गुजरात राज्य पुरातत्व विभागाने मिळून लावला आहे.

1960 च्या दशकात जेव्हा श्याम-सागर जलाशयाचे निर्माण झाले तेव्हा ह्या सार्‍या पाषाण युगीन जागा पाण्याखाली गेल्या. सोबतच क्षत्रप युगातील बौद्ध धार्मिकस्थल ‘देवनी मोरी’ हेसुद्धा पाण्याखाली गेले.

 

shamalji 1 inmarathi

हे ही वाचा – भगवान विष्णूचे ‘सर्वात मोठे मंदिर’ आहे भारताबाहेर, त्याचा रंजक इतिहास ठाऊक आहे का?

चौथ्या शतकातील क्षत्रप राजा रुद्रसेन तृतीय ( 348-378 ) याने आपल्या शासन काळात इथे विटांचा एक सुंदर स्तूप बनवला, सोबत एक मंजूषा देखील अर्पण केली ज्यावरील अभिलेखानुसार या मंजुषेत भगवान बुद्धाचे अवशेष जतन आहेत. या परिसरात दोन विहार व अनेक छोटे स्तूप आहेत.. जवळच एका मोठ्या पुरातन मंदिराचे अवशेष देखील आहेत.

हा परिसर नवव्या शतकाच्या आसपास उजाड झाला असावा. 1961-62 दरम्यान प्रा. सुब्बाराव यांच्या देखरेखीखाली शामलजी परिसरात पुन्हा उत्खनन करण्यात आले असता असे आढळून आले की हे व्यापारी शहर असून याच्या चारी बाजूंनी तटबंदी होती.

इथे मिळालेल्या वितांचा आकार देवनी मोरी येथील विटांसारखाच आहे. मैत्रक राजवंशा नंतर हे शहर नष्ट झाले असावे. त्यानंतर गुजरात चा सुलतान अहमदशाह प्रथम, मेवाड, बडोद्याचे गायकवाड यांची इथे सत्ता राहिली असावी..कारण उत्ख्नात त्या काळातील नाणी मिळाली आहेत.

शहरातील शामलजी मंदिर हे एक अद्भुत स्थापत्यशैलीचे आणि पुरातन पार्श्वभूमी असलेले मंदिर असून या मंदिराच्या जन्माविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. पैकी एक म्हणजे, ब्रह्मदेव पृथ्वीवर तपासाठी जागा शोधत असताना त्यांना मिश्वो नदीकाठाची ही जागा आवडली.

 

shamalji 3 inmarathi

 

इथे त्यांनी एक हजार वर्षे तप केले..त्याने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी त्यांना इथे एक यज्ञ करायची आज्ञा दिली. तेव्हा ब्रह्मानी यज्ञ केला व आराध्य देव म्हणून श्रीविष्णू ची स्थापना केली. ही मूर्ती काळ्या पाषानातील असून हातात गदा घेतलेली गदाधर रूपात होती. म्हणून भगवान शामलजी यांना गदाधर असेही म्हणतात.

दुसरी कथा अशी आहे की देवांचा वास्तुकार विश्वकर्मा याने हे मंदिर एका रात्रीत बनवले होते. पण घेवून जायच्या आधीच सकाळ झाल्याने तो मंदिर सोबत न घेताच देवलोकी परत गेला. ते हेच मंदिर .

तिसरी कथा मात्र लॉजिकली खरी वाटते ती अशी की तेथील एका आदिवासी शेतकर्‍याला शेतात श्रीविष्णू ची मूर्ति सापडली. त्या मूर्तिची पुजाअर्चा सुरू केल्यावर त्या शेतक्र्‍याला चांगले दिवस आले. हे त्याच गावातील एका वैष्णव व्यापार्‍याला समजले. त्याने त्या मूर्तिची स्थापना मंदिरात केली तेच हे साक्षी गोपाल किंवा गदाधर मंदिर. यानंतर इतर शासकांनी या मंदिराचे पुनर्निर्माण करुन मंदिर आणखी सुंदर बनवले.

 

shamalji 6 inmarathi

 

वैष्णव संप्रदायाच्या 154 महत्वाच्या तीर्थक्षेत्र पैकी हे एक क्षेत्र आहे. मंदिर हे वास्तूकलेचा उत्तम नमूना असून मंदिरातील साक्षीगोपालची मूर्ति ही गुप्त कालीन असावी ही शक्यता आहे. वैष्णव संप्रदायाचे प्रवर्तक श्री. वल्लभाचार्य यांनी भेट दिल्यानंतर हे क्षेत्र पुन्हा प्रसिद्धीस आले.

मंदिराची रचना दोन मजली असून नागर शैलीतील या मंदिराचे शिखर ताराकृती आहे, कडेने अनेक देवी-देवता कोरलेल्या आहेत. शिवाय अनेक गज मूर्ती देखील आहेत. बघताना असे वाटते की जणू या हत्तींनी पाठीवर हे मंदिर तोलून धरले आहे .

इतर कोरीव लेण्यात रामायण महाभारत कालीन प्रसंग चितारले गेले आहेत. मंदिराच्या प्रांगणात एक विशालकाय हत्तीची मूर्ति देखील आहे. मंदिरात अनेक शिलालेख आहेत. मुख्य मंदिराजवळ एक अजून प्राचीन मंदिर असून अभ्यासकांच्या मते ते मूळ मंदिर आहे.

 

shamalji 4 inmarathi

हे ही वाचा – अनेक तास देवदर्शनासाठी रांगेत उभे राहणारे भाविक मात्र ‘या’ मंदिरात जायला घाबरतात

हरिश्चंद्र चौरी या नावाने ओळखल्या जाणार्‍या या मंदिराचे आता काही भागच शिल्लक राहिले आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट ही की या मंदिरासमोर सोलंकी शैलीतील साधारण 11 ते 12 व्या शतकातील एक सुंदर प्रवेशद्वार आहे. एक छोटे गणेश मंदिर देखील आहे, जे गुप्त काळाच्या शेवटी प्रचलित असलेल्या शैलीतील आहे. सोबत शिव, चामुंडा आदि देवतांच्या मुर्ती हि मंदिर प्रांगणात सापडल्या आहेत.

ह्या मंदिराची व्यवस्था एक ट्रस्ट द्वारे पाहिली जाते. मंदिराचे पावित्र्य अबाधित रहावे, शुचिता रहावी यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश करताना भाविकांसाठी एक नियम बनवण्यात आला जो याआधी शिर्डी मंदिरात बनवला गेला , तो म्हणजे भाविकांनी मंदिरात दर्शनाला येताना पूर्ण कपड्यातच यावे.

 

shamalji 5 inmarathi

 

बर्मुडा, शॉर्ट स्कर्ट , आदि घालू नये. अथवा पीतांबर किंवा लुंगी नेसून च मंदिरात प्रवेश करावा. मंदिराच्या प्रवेशद्वारावर हा सूचना फलक लावण्यात आला असून भाविकांनी मंदिरात येताना या नियमाबरोबरच मास्क देखील लावावा ही विंनंतीही करण्यात आली आहे.

अशा नियमांचे पालन करून आपण ही आपली संस्कृती जपली पाहिजे व आपल्यासोबत इतरांच्या आरोग्यालाही जपले पाहिजे. त्या दृष्टीने मंदिर ट्रस्ट ने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे..

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?