Site icon InMarathi

फुफ्फुसं सुदृढ ठेवणाऱ्या दीर्घश्वसनाचे ८ भन्नाट फायदे तुम्हाला ठाऊक हवेतच!

deep breath featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ह्या धकाधकीच्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला काय करावं, काय नाही काही सुचत नाही. आपण अस्वस्थ झालो, दम लागला, तणाव आला की सगळ्यात आधी आपल्याला दीर्घ श्वास घ्यायला सांगतात.

दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या शरीरात एन्डोर्फिन नामक हार्मोन्सचा संचार होतो, ह्या हार्मोनला “हॅपिनेस हार्मोन” म्हणतात. ज्यामुळे आपण आपला ताण विसरून आनंदी होतो, व शांत होतो.

ह्या व्यतिरिक्तसुद्धा दीर्घश्वास घेण्याचे बरेच फायदे आहेत. आज आपण तेच पाहणार आहोत.

 

१) आयुर्मान वाढतं –

 

 

असं म्हणतात जो प्राणी जितका जास्त दीर्घ श्वास घेतो त्याचं आयुष्य तितकंच वाढत जातं. कारण आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीरात प्राणवायू मिसळला जातो.

===

हे ही वाचा कमी ऑक्सीजनची धोक्याची सूचना देणाऱ्या या आजाराची “ही” लक्षणं माहित आहेत का?

====

आपण आपल्या फुफुसांच्या पूर्ण क्षमतेचा कधी वापरच करत नाही, त्यामुळे ते कमकुवत होतात आणि आपल्या शरीराला पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपलं आयुष्य सुद्धा कमी होत जातं. त्यामुळे, आयुष्य वाढवायचे असेल तर रोज सकाळी १५ मिनिटे दीर्घश्वास घेणे महत्वाचे आहे.

 

२) शरीरातील विषारी घटक निघून जातात –

 

 

आपण श्वास बाहेर सोडतो त्यावेळी शरीरातून कार्बन-डायऑक्साईड बाहेर पडते. त्यासोबत शरीरातील काही कचरा सुद्धा बाहेर पडतो. जर आपण दीर्घ श्वास घेतले नाही तर आपल्या इतर अवयवांना हा कचरा बाहेर काढायला अधिक मेहनत करावी लागते.

ज्यामुळे वयाआधीच ते अवयव थकू लागतात. म्हणून दीर्घश्वास घेणे हे शरीर डिटॉक्स करण्याची एक खूप उपयुक्त पद्धत आहे.

 

३) निद्रानाश नाहीसा होतो –

 

 

काही लोकांना भरपूर टेन्शनमुळे, रोगांमुळे, विस्खळीत जैवनशैलीमुळे रात्री झोप लागत नाही, लागली तरी शांत झोप नसते म्हणून सकाळी ठाकल्यासारखंच वाटतं.

ज्यांना कोणाला असा निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी आपल्या दिनचर्येत प्राणायामचा, म्हणजेच दीर्घश्वास घेण्याचा नक्कीच समावेश करावा. सकाळी उठून, गार वातावरणात बसून प्राणायाम करून बघा. शांत वाटेल व रात्री झोपही छान येईल.

 

४) रोगप्रतिकार शक्ती बळावते –

 

 

दीर्घश्वास घेतल्याने शरीरातील ऑक्सिजन साठा वाढतो व कार्बनडाय ऑक्साईड निघून शरीरातील घाण कमी होते. ज्यामुळे अवयव ऑक्सिजनेटेड झाल्यामुळे शरीराची संरक्षण यंत्रणा मजबूत होते व रोगप्रतिकार शक्ती बळावते.

आपण कोणत्याही आजाराला पटकन बळी पडत नाही आणि सुदृढ राहतो.

 

५) त्वचा टवटवीत राहते –

 

 

कोणत्याही वस्तूला ऑक्सिजन मिळाला की ती वस्तू तशीच ताजी आणि टवटवीत राहते. तसंच आपल्या त्वचेचंही आहे. रक्तामार्फत आपल्या शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळाला की त्या टवटवीत राहतात व आपली त्वचा सुद्धा टवटवीत राहते.

यामुळे सुरकुत्या येणे, काळे डाग येणे, त्वचा सैल पडणे हे सगळे त्रास फार लवकर होत नाहीत आणि दीर्घ श्वास घेतल्याने हे सगळे शक्य आहे.

त्वचा टवटवीत ठेवायची असेल तर रोज सकाळी १५ मिनिटे दीर्घ श्वास घेणे आवश्यक आहे.

 

६) वेदनांची जाणीव कमी होते –

 

 

एन्डोर्फिन हे एक हॅपिनेस हॉर्मोन असून, नैसर्गिक वेदनाशामक आहे. दीर्घश्वास घेतल्याने ह्या हॉर्मोन्सचं शरीरातील प्रमाण वाढतं आणि आपल्याला कोणत्याही, शारीरिक मानसिक वेदनांची जाणीव कमी होते.

===

हे ही वाचा पेनकीलर्स न घेताही वेदना बऱ्या होतात, त्यासाठी हे ७ उपाय करून बघाच!

===

७) रक्तप्रवाह आणि रक्ताभिसरण सुरळीत होते –

 

 

ज्यांना ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी दीर्घश्वास घेणे खुप महत्वाचे आहे. रोज फक्त १५ मिनटं दीर्घश्वास घेतल्याने आपला रक्तप्रवाह आणि शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते.

प्रत्येक अवयावपर्यंत पुरेसे रक्त, ऑक्सिजन पुरवले जाते व रक्त घट्ट होण्याचा, गुठळी होण्याचा सुद्धा त्रास कमी होऊ शकतो.

 

८) तरतरी राहते –

 

 

शरीरातील ऑक्सिजनचा साठा पुरेसा असला की आपल्याला मरगळ वाटणे, सारखा थकवा येणे ह्या तक्रारी उद्भवत नाहीत. त्यामुळे दीर्घश्वास घेणे आवश्यक आहे.

कसा घ्यावा दीर्घ श्वास –

१) सकाळी उठून नित्यक्रिया आवरून खोली बाहेर, म्हणजेच गॅलरीत, अंगणात, गच्चीवर मोकळ्या हवेत येऊन बसा.
२) डोळे मिटून घ्या.
३) आता एक लांब श्वास घ्या, आपल्या फुफुसांची क्षमता आपल्यालाच ठाऊक असते त्यामुळे श्वास किती दीर्घ घ्यायचा सुद्धा आपल्यालाच नीट अंदाज असतो .
४) श्वास घेऊन १ ते १० पर्यंत आकडे मोजा आणि आकडे मोजणे होई पर्यंत श्वास धरून ठेवा.
५) हळुवार श्वास बाहेर सोडा.
६) ह्यानंतर आपण पोटावर हात ठेवून श्वसनाच्या प्रक्रियेला समजूनघ्या. आपल्या पोटाच्या हालचालींकडे नीट लक्ष द्या.
७) हा व्यायाम रोज सकाळी १५ मनिटे करा.

 

 

हा छोटासा व्यायाम केल्याने आपल्या अनेक समस्या सुटतील आणि आपण एका निरोगी जीवनाकडे वाटचाल कराल. दवाखान्यात वाया जाणारा आपला भरपूर पैसा वाचेल.

कोरोना काळातही फुफुसांना सुदृढ बनवण्यासाठी दीर्घ श्वास घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी आपल्याला दिलाच आहे. त्यामुळे आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठीपण काढा आणि आपलं आयुष्य सुखकर बनवा.

===

हे ही वाचा – आजपासून हे सोपे उपाय केले नाहीत तर भविष्यात मोकळा श्वास घेणं निव्वळ अशक्यच!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version