आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘लस घेतली का ?’ हा प्रश्न सध्या अत्यंत महत्वाचा आहे. काही शहरांमध्ये लोकांनी नुकताच पहिला डोस घेतला आहे, तर काही ठिकाणी दोन्ही डोस घेऊन लोक सुरक्षित झाले आहेत.
लसीकरणाचं प्रमाण जितकं अधिक होईल तितकी कोरोनाची भीती कमी होईल हे नक्की. ‘कोवीशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ या भारतात तयार होणाऱ्या दोन लसींकडे सध्या सगळेच जण एक ‘जीवन संजीवनी’ म्हणून बघत आहेत.
‘कोवीशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’पैकी ‘कोवीशिल्ड’ ही ऑक्सफोर्डच्या सहाय्याने तयार करण्यात आलेली आहे, तर ‘कोवॅक्सिन’ ही संपूर्णपणे भारतीय असलेली पहिली लस आहे.
हैद्राबादच्या भारत बायोटेक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या तीन संस्थांनी एकत्र येऊन ‘कोवॅक्सिन’साठी मान्यता मिळवली आणि भारताला आपली पहिली लस मिळाली.
भारत बायोटेक ही तीच कंपनी आहे ज्यांनी काही वर्षांपूर्वी हिपॅटायटीस आणि झायका व्हायरस साठी सर्वप्रथम आणि सर्वात स्वस्त दरात लस उपलब्ध करून दिली होती.
भारत बायोटेकच्या कामगिरीचं श्रेय हे डॉक्टर कृष्णा एल्ला यांना दिलं जातं. डॉक्टर कृष्णा एल्ला आणि यांच्यासारख्या इतर शास्त्रज्ञ लोकांमुळे आज आपण या कोरोना युद्धात तग धरून आहोत. जे काम आपले सैनिक सीमेवर करत आहेत तसंच काम आज आपले डॉक्टर करत आहेत.
===
हे ही वाचा – जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली गेलेली लस या भारतीयाने निर्माण केली आहे
===
भारत बायोटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर कृष्णा एल्ला यांनी हा प्रवास कसा साध्य केला? व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्यात त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.
डॉक्टर कृष्णा एल्ला यांचा तामिळनाडूमधील थिरूथानी या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. कृष्णा यांना शेतकरी होण्याची खूप इच्छा होती. हे साध्य करण्यासाठी त्यांनी कृषी विभागात पदव्युत्तर शिक्षण सुद्धा घेतलं होतं.
घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे डॉक्टर कृष्णा यांनी बेयर केमिकल्स या कंपनीतील कृषी विभागात काम करायचं ठरवलं. रोटरी ग्रुपच्या ‘फ्रीडम फ्रॉम हंगर’ या स्कॉलरशीपमुळे डॉक्टर कृष्णा यांना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.
१९९५ मध्ये डॉक्टर कृष्णा एल्ला यांनी अमेरिकेतील विसकॉनसीन-मॅडीसन विद्यापीठातून पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या आईच्या आग्रहास्तव ते भारतात परतले.
अमेरिकेत असताना डॉक्टर कृष्णा एल्ला हे साऊथ कॅरोलिना येथील वैद्यकीय विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होते. भारतात आल्यावर त्यांनी हिपेटायटीस म्हणजेच कावीळच्या साथीवर लस शोधण्याचं काम हाती घेतलं. खूप मोठी मागणी असलेली कावीळची लस कमीत कमी दरात लोकांना उपलब्ध व्हावी असं डॉक्टर कृष्णा एल्ला यांचं ध्येय होतं.
हैद्राबादमध्ये एक छोटीशी लॅब भाड्याने घेऊन त्यांनी आपलं संशोधन कार्य सुरू केलं. त्यांच्याजवळ असलेली सर्व वैद्यकीय उपकरणं डॉक्टर कृष्णा यांनी या लॅबमध्ये बसवली आणि ‘भारत बायोटेक’ची सुरुवात झाली.
‘कावीळची लस ही १ डॉलरमध्ये सामान्य जनतेला उपलब्ध करून द्यावी’ हा त्यांनी निश्चय केला आणि त्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरूवात केली.
सर्व अर्थसंस्थांकडे १२.५ करोड रुपयांच्या अर्थसहाय्याची मदत मागणाऱ्या डॉक्टर कृष्णा एल्ला यांना फक्त आयडीबीआय बँकेने २ करोडची मदत केली होती.
त्या मदतीवर भारत बायोटेकने १९९९ मध्ये राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कावीळच्या लसीचं लोकार्पण केलं आणि ६५ देशांना कावीळची लस पुरवण्याचं काम करू दाखवलं. १ डॉलर किमतीमध्ये ही लस सर्वांना पुरवून डॉक्टर कृष्णा एल्ला यांनी सर्वांनाच चकित केलं होतं.
===
हे ही वाचा – सरकार चाचपडत असताना या साहेबांनी कोव्हिड लाटेशी लढण्याची केलेली तयारी अफाट आहे!
===
एका मुलाखतीत डॉक्टर कृष्णा एल्ला यांनी सांगितलं होतं, की त्यांना कोणत्याही सामाजिक संस्थेकडून, भारत सरकारकडून कधीच अनुदान मिळालं नाही. प्रत्येक लसीचं संशोधन आणि उत्पादनाचा खर्च कंपनीने स्वतःच्या मेहनतीवर उभा केला आहे.
१९९६ मध्ये डॉक्टर कृष्णा एल्ला यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसमोर बायोटेक नॉलेज पार्कचा प्रस्ताव ठेवला. प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने या प्रस्तावाला लगेच मान्यता मिळाली.
आंध्रप्रदेश सरकारने औद्योगिक वसाहतीतील जागा ‘जिनोम व्हॅली’साठी दिली आणि तिथे भारत बायोटेकचा कावीळ लस तयार करण्याचा पहिला प्रकल्प सुरू करण्यात आला.
आज या जागेत नोवर्तीस, बेयर बायोसायन्स आणि ITC सारख्या कंपन्यांना सुद्धा जागा मिळाली आणि अशा बायोटेक पार्कची निर्मिती बँगलोर आणि पुणेमध्ये सुद्धा करण्यात आली आहे.
भारत बायोटेकने कावीळसोबतच स्वाइन फ्लू, झिका आणि आता कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगांवर लस शोधण्याचं काम यशस्वीपणे करून दाखवलं होतं. याव्यतिरिक्त, भारत बायोटेक हे टायफॉईड, पोलिओची सुधारित लस यावर सुद्धा सध्या काम करत आहे.
डॉक्टर कृष्णा एल्ला यांचा आपल्या संशोधन कौशल्य आणि टीमवर इतका विश्वास आहे की, ते करोडो रुपये सुद्धा खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. भारत बायोटेक आपल्या प्रोजेक्टनुसार बँकेकडून कर्ज काढते. पैसे उभे करायचे असल्यावर IPO चा मार्ग अवलंबतात.
भारत बायोटेकचा सर्वात मोठा ग्राहक भारत सरकार आहे. त्यासोबतच, युनिसेफ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि Gavi सारख्या लसीकरणची जबाबदारी घेणाऱ्या कंपन्या या भारत बायोटेक सोबत नेहमीच काम करत असतात.
भारत बायोटेकचे आज भारतात हैद्राबादमध्ये ३ आणि बँगलोरमध्ये १ असे ४ प्लॅंट्स आहेत. त्याशिवाय, भारत बायोटेकने वॉशिंग्टन विद्यापीठाच्या सेंट लुईस मेडिकल स्कुलसोबत करार करून कोरोना साठी करोडो लसींचे उत्पादन करण्याचं काम हाती घेतलं आहे.
===
हे ही वाचा – भारतीय संशोधकांची कमाल….कोरोनावर लसीइतकीच प्रभावी गोळी शोधून काढली
===
कृष्णा एल्ला यांच्या कार्याचा गौरव:
– २०१३ मध्ये प्रदान करण्यात आलेला बायो स्पेक्ट्रम पर्सन ऑफ द इयर
– २०११ मध्ये विस्कॉन्सिन विद्यापीठा कडून प्रदान करण्यात आलेला डिटिंगविश्ड अल्युमिनी पुरस्कार
– २००८ मध्ये भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात आलेला बेस्ट टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पुरस्कार
काही लोकांचा असा समज असतो, की स्वस्त लस म्हणजे कमी दर्जाची लस असते. पण, सर्वांना लस घेता यावी म्हणूनच भारत बायोटेकसारखी कंपनी प्रत्येक लस अधिकाधिक स्वस्त ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असते.
७३ वर्षीय डॉक्टर कृष्णा एल्ला आणि भारत बायोटेकच्या पूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं चीज करूया आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण करून घेऊयात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.