' जाणून घ्या ‘गोल्डन मिल्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दुधाचे ७ फायदे! – InMarathi

जाणून घ्या ‘गोल्डन मिल्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दुधाचे ७ फायदे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागील वर्षीपासून कोरोनाने जगभरात भयंकर धुमाकूळ माजवला आहे. प्रत्येक जण या भयानक आजारापासून स्वतःला आणि परिवाराला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतांना दिसतो. आपल्या देशात तर कोरोनाने एन्ट्री केल्यानंतर अनेक घरगुती उपचारांनी कोरोनापासून बचाव करण्याचे प्रयत्न सुरु झाले.

यातलाच एक महत्वाचा घरगुती उपाय ठरला किंबहुना ठरत आहे हळदीचे दूध. अनेकांना रोज रात्री झोपताना दूध पिऊन झोपायची सवय असते. याच सवयीत थोडा बदल करत लोकांनी साधे दूध न पिता दुधात हळद घालून प्यायला सुरुवात केली.

 

golden milk in marathi

 

‘गोल्डन मिल्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुधाचे असंख्य फायदे आहे. दुधात मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असते, तर हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. कोरोनाकाळात अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या या दुधाचे महत्व जाणून घेऊया.

सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त :

सर्दी खोकल्याने त्रासले असाल, घसा खवखवत असेल तर अशावेळी गरमागरम दुधात हळद टाकून प्यायल्याने घशाला आराम मिळतो. हळदीमध्ये जंतूनाशक गुणधर्म असल्याने घशातील खवखव कमी करते.

===

हे ही वाचा जखम झाल्यास नुसती हळद न लावता करा हा उपाय… भारतीय शास्त्रज्ञाचा भन्नाट शोध!

===

दुधामुळे श्वसनमार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होते. नाक चोंदले असेल अशावेळीही हे दूध प्यायल्याने आराम पडतो. खूप डोके दुखत असेल तर हळदीचे दूध प्यावे. हळदीच्या दुधामध्ये अॅन्टीऑक्सिडेण्ट गुणधर्म अधिक असल्याने आराम मिळतो.

 

golden milk 2 in marathi

रोगप्रतिकारशक्ती वाढते:

हळदीच्या दुधामध्ये अॅन्टीवायरल गुणधर्म असल्याने शरीरातील जंतूंचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रतिबंध होतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारून यकृतावर होणारा जंतूंचा आघात कमी होतो.

Immunity-inmarathi

 

शांत झोप येण्यासाठी :

घरातील वयस्कर मंडळींना रात्रीची झोप येत नाही. त्यामुळे अनेकदा अपुऱ्या झोपेचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होतो. अशावेळी रात्री झोपण्याआधी ग्लासभर दूध प्यायल्याने शांत झोप लागते. दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करून शांत झोप मिळण्यास मदत करतात.

 

golden milk 4 in marathi

 

हाडे मजबूत होऊन सांधेदुखीत आराम :

दूध आणि हळदीने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. विशेष म्हणजे हळदीच्या दुधात दाहशामक गुणधर्म असतात त्यामुळे वेदना कमी झाल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते.

बहुतेक ज्येष्ठ मंडळींना सांधेदुखीची समस्या सतावत असते. अशावेळी हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील सांध्यांना बळकटी मिळते.

 

golden milk 5 in marathi

 

चरबी कमी होण्यास मदत :

हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.

 

weight loss inmarathi

 

पचन विकारात आराम:

हळद युक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. अल्सर आणि कोलाइटिस बरे करण्यास मदत करते. अल्सर, डायरिया आणि अपचन समस्या दूर होतात.

===

हे ही वाचा ‘फॅशन स्टेटमेंट’ असणारा काळा चहा कोरोना काळात ठरू शकतो महत्त्वपूर्ण….

===

digestive system inmarathi

 

शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी :

जर मधुमेहग्रस्त व्यक्तींनी नियमितपणे हळदीचे दूध घेतले तर मधुमेह बरे होण्यास मदत होते. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.

 

golden milk 8 in marathi

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?