कोरोनामधून बरे झालात तरी या टेस्ट करायला विसरू नका…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
२०२१ ची सुरुवात होतांना ‘कोरोना कधी जाईल?’ हा प्रश्न सर्वांना सतावत होता. फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे आकडे वाढू लागले आणि आपल्या लक्षात आलं की, कोरोना ला यावर्षी सुद्धा हलक्यात घेऊन चालणार नाही.
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयंकर आहे हे आपण सगळेच सध्या अनुभवत आहोत. वाढलेला मृत्युदर आणि अपुऱ्या पडणाऱ्या वैद्यकीय सुविधा, सतत ऐकू येणारे अँब्युलन्सचे आवाज यामुळे यावर्षी कोरोना ची भीती सामान्य माणसांच्या मनात नक्कीच वाढली आहे.
लसीकरणाचा वेग वाढला तरच कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल हे आता स्पष्ट झालं आहे. कोरोनावर मात केलेल्या लोकांनी इतर रुग्णांना प्लाझ्मा दिल्याने कित्येक रुग्णांना ही लढाई जिंकण्यासाठी मदत होत आहे. कोरोना बद्दल सध्या खूप माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही काही प्रश्न अजूनही लोकांना असू शकतात.
–
हे ही वाचा – कोरोनाचा थेट हृदयावर हल्ला!! कोविडमुळे अशाप्रकारे होऊ शकतो हृदयविकार…
–
जसं की, कोरोना एकदा होऊन गेल्यावर परत कोरोना होऊ शकतो का ? कोरोनातून बाहेर पडल्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे ? कोरोना वर यशस्वीपणे मात केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणत्या चाचण्या त्या व्यक्तीने करणं गरजेचं आहे ? त्याबद्दल जाणून घेऊयात.
कोरोना मधून बाहेर पडल्यानंतर तुमचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला तरीही तुमच्या शरीराला पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं असतं. तुमच्या शरीरातून वायरस जरी निघून गेलेला असला तरीही तुमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती सध्या किती आहे ? हे तपासण्यासाठी या टेस्ट करून घेण्याचा सल्ला सर्व तज्ञ डॉक्टर सध्या सल्ला देत आहेत :
१. अँटिबॉडी igG टेस्ट:
आपल्या शरीरात अँटिबॉडी म्हणजेच प्रतिद्रव्य तयार होण्यासाठी साधरणपणे १ ते २ आठवड्यांचा कालावधी लागतो. तुमच्या शरीरात प्रतिद्रव्याचं प्रमाण किती आहे ? हे तपासण्यासाठी igG टेस्ट करून घेणं गरजेचं आहे.
तुमच्या शरीराच्या मजबुती सोबतच तुम्ही इतरांना प्लाझ्मा देण्यासाठी योग्य आहात की नाही ? हे सुद्धा या टेस्ट नंतर स्पष्ट होतं. तुम्ही जर प्लाझ्मा देण्याचा विचार करत आहात तर कोरोनावर मात केल्यानंतर १ महिनाच्या आत ही टेस्ट करायला पाहिजे.
२. कम्प्लिट बॉडी टेस्ट (CBC) :
तुमच्या शरीरातील लाल, पांढऱ्या पेशींचं, प्लेटलेट्स चं प्रमाण किती आहे ? हे तपासण्यासाठी सीबीसी टेस्ट करायला पाहिजे. ही टेस्ट ठरवते की, तुम्हाला पुन्हा कोरोना चं ‘इन्फेक्शन’ होऊ शकतो की नाही. यापैकी कोणत्याही गोष्टीची शरीरात कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी राहून सुधारणा करणं शक्य आहे.
३. ग्लुकोज, कोलेस्ट्रॉल टेस्ट:
कोरोना होऊन गेल्यानंतर काही लोकांच्या रक्तात गाठी होण्याची शक्यता असते. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होणे, रक्तदाब कमी जास्त होणे हे लक्षणं सुद्धा कोरोना झालेल्या लोकांमध्ये बघायला मिळतात.
कोरोना होण्याआधी तुम्हाला जर डायबिटीस झालेला असेल तर तुमच्या शरीरात हे बदल जास्त प्रमाणात होऊ शकतात. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर जास्तीत जास्त वेळेस ग्लुकोज, कोलेस्ट्रॉल ची तपासणी करण्याचा डॉक्टर सल्ला देत असतात.
४. न्यूरो फंक्शन टेस्ट:
कोरोना हा फक्त शरीरालाच नाही तर मानसिक खच्चीकरण सुद्धा करत असतो हे आपण बघतच आहोत. सलग कोरोनाच्या बातम्या बघून सुद्धा कित्येक लोकांना हा त्रास होत आहे. कोरोनावर मात केल्यानंतर १ महिन्यापर्यंत तुमच्या मेंदूमध्ये त्या प्रवासात झालेल्या बदलांची नोंद असते.
–
हे ही वाचा – डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅनला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच
–
शरीरातील इतर अवयवांप्रमाणे तुमची ‘स्ट्रेस लेव्हल’ किती आहे हे सुद्धा तपासून घेणं कधीही चांगलं आहे. कोरोना वर मात केलेल्या ४० वर्षांवरील स्त्रियांमध्ये हा जास्त दिसून आल्याचं मध्ये स्पष्ट झालं आहे. सतत येणारी अस्वस्थता, सुस्ती, निराशा हे पुढे होणाऱ्या मोठ्या त्रासाची लक्षणं असू शकतात हे मान्य केलं पाहिजे.
५. व्हिटॅमिन डी टेस्ट:
तुमच्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी चं प्रमाण अधिक असणं अत्यंत आवश्यक आहे. कोरोना वर इलाज करत असतांना आणि मात केल्यानंतर शरीरातील व्हिटॅमिन डी चं प्रमाण तपासणं आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी असलेले औषधं, गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं कधीही चांगलं आहे.
६. छातीचा एक्स रे :
कोरोनावर मात केल्यानंतर ३ ते ६ महिन्यांच्या कालावधीत सीटी स्कॅन तपासणी करायचा सल्ला डॉक्टर देत आहेत. कोरोनाच्या वायरसने तुमच्या शरीरावर किती प्रमाणात बदल केला आहे हे सीटी स्कॅन तपासणी, फुफ्फुस तपासणीमधून स्पष्ट होत असतं.
या तपासणी नंतर शरीरातील ऑक्सिजन चं प्रमाण सुद्धा कळतं त्यामुळे पुढील काळात घ्यायची काळजी सुद्धा आपल्याला डॉक्टरांकडून कळू शकते.
७. हृदयाची तपासणी:
कोरोना काळात शरीराच्या वाढलेल्या तापमानामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या काही पेशींना इजा पोहोचलेली असू शकते. या त्रासाला ‘मायोकार्डिटीस’ असं म्हणतात. कोरोना वर मात केल्यानंतर हा त्रास बऱ्याच लोकांना झाल्याचं समोर आलं आहे.
कोरोना झालेल्या लोकांना जर आधीपासून हृदयाचा काही त्रास असेल तर हे प्रमाण अधिक असू शकतं. हे तपासून घेण्यासाठी इमेजिंग स्कॅन्स आणि हृदयाच्या कामाची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. कोरोनावर मात केल्यानंतर जर काही दिवसांनी छाती दुखण्याचे लक्षणं समोर येत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
‘सार्स-कोव्ह 2’ चं प्रमाण हे शरीरातून कमी होण्यासाठी शरीराला थोडा वेळ द्यावा लागतो. हा वेळ देत असतांना, शरीराला नेमक्या कशाची आवश्यकता आहे हे या टेस्ट आपल्या सांगत असतात.
स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना वर मात करणाऱ्या सर्व योद्ध्यांनी ह्या तपासणी करून घेऊन स्वतःला अजून स्ट्रॉंग करून घेणं इतकाच ही माहिती देण्यामागचा आमचा उद्देश आहे. तसेच टेस्टिंगच्या आधी आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा कोरोना तज्ञांचा सल्ला घ्या.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.