Site icon InMarathi

तुमच्या रिपोर्टमधील ct value वरून गोंधळलात??!! मग हे वाचा…

ctv final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या कोरोना आणि त्या संबंधीचे सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याभोवती गुरफटलेल्या आहेत. त्यातून अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. मग टेस्ट करावी की नाही, की दोन दिवस वाट पाहावी अशा संभ्रमातही लोक आहेत.

काहीजण तर टेस्ट करतात आणि पॉझिटिव्ह आल्यावर उपचारही चालू करतात पण आपल्याला झालेला कोरोना कितपत धोकादायक आहे, हे आपल्याला रिपोर्ट मधून कळतो आणि त्यानुसार काळजी घेणे सोपे जाते.

 

 

कोरोनासाठी सध्या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. एक म्हणजे अँटीजेन चाचणी, ज्यामध्ये केवळ अर्ध्या तासाच्या आत तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह तुम्हाला कळतो. परंतु कधीकधी अँटीजेन चाचणीचे रिपोर्ट फसवे असू शकतात. म्हणजे रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसत असतात परंतु रिपोर्ट निगेटिव्ह येतो त्यामुळे ही चाचणी फारशी विश्वासार्ह मानली जात नाही.

कोरोनासाठी सगळ्यात महत्त्वाची चाचणी जी आहे ती म्हणजे rt-pcr चाचणी. यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे तर कळतच, पण त्याचा कोरोना कितपत धोकादायक आहे हे मात्र त्यातल्या सिटी व्हॅल्यू वरून समजून येतं.

बऱ्याच लोकांची यामध्ये गफलत होते, की सिटी व्हॅल्यू आणि सिटी स्कोर म्हणजे काय? तर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

सिटी व्हॅल्यू ही rt-pcr चाचणीमध्ये कळते. तर सिटी स्कोर हा एचआरसीटी (hrct) म्हणजे हाय रिझोल्युशन सिटीस्कॅन केल्यावर समजतो. यामध्ये छातीचा स्कॅन केला जातो आणि त्यावरून इन्फेक्शन किती प्रमाणात पसरले आहे याचा स्कोर काढला जातो.

 

हे ही वाचा – कोरोनासह अनेक दुर्धर आजारांवर ही ७ झाडं जो परिणाम साधतात तो सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे

आता सिटी व्हॅल्यू म्हणजे काय तर सायकल थ्रेशोल्ड.. म्हणजे कितव्या चक्रामध्ये व्हायरस सापडला. जर तो पस्तीसच्या पुढे असेल तर ती व्यक्ती कोरोना निगेटिव्ह समजली जाते. परंतु 35 च्या आतील सगळेजण पॉझिटिव्ह समजले जातात.

आता थोड्या टेक्निकल बाबी यामध्ये आहेत. आता rt-pcr म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहू.

Rt-pcr म्हणजे रिव्हर्स ट्रान्सफॉर्म पॉलिमर चेन रिॲक्शन या चाचणी मधून आपल्याला सिटी व्हॅल्यू समजते. आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने सिटी व्हॅल्यूचा कट ऑफ हा आता 35 निश्चित केला आहे.

आत्तापर्यंत हा कट ऑफ 24 ते 35 दरम्यान धरला जायचा. परंतु त्यामुळे चुकीचे निष्कर्ष काढले जाऊ लागले म्हणूनच आता तो 35 असा निश्चित केला आहे. ज्यामुळे चाचण्यांच्या निदानामध्ये अचूकता येईल.

 

 

Rt-pcr चाचणी करण्याकरिता रुग्णाच्या नाकातून किंवा तोंडातून सॅम्पल्स घेतले जातात. त्यात अडचण ही असते की, कोरोनाचे विषाणू असतात ते आरएनए स्वरूपात आढळतात. पण आपल्या शरीरात डीएनए असतात. म्हणून आरटीपीसीआर चाचणीमध्ये आरएनए स्वरूपात असलेल्या कोरोना विषाणूंच्यात वाढ करून डीएनए विकसित केला जातो. म्हणजेच आरएनएच्या प्रती काढण्याकरिता पॉलिमर चेन रिएक्शनचा वापर केला जातो.

त्यानंतर या डीएनएच्या रेणूच्या आधारे कोरोनाचे निदान होते. विषाणूच्या आरएनएपासून हा रेणू विकसित करण्यासाठी किती ‘चक्रां’चा अवलंब करावा लागला ती किंमत म्हणजे ‘सीटी व्हॅल्यू’.

सिटी व्हॅल्यू जितकी कमी तितका व्हायरल लोड अधिक तर सिटी व्हॅल्यू जितकी जास्त तितका व्हायरल लोड कमी.

आता ही सिटी व्हॅल्यू जर 35 तिच्या पेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती कोरोना निगेटिव असते. पण जर सिटी व्हॅल्यू 35 ज्या खाली असेल तर ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह समजली जाते.

तुमची सिटी व्हॅल्यू जितकी कमी तितका व्हायरसचा धोका अधिक असतो. त्यामुळे रुग्णाची अवस्था बिकट होऊ शकते. जर तुमची सिटी व्हॅल्यू 11- 12 असेल तर त्याचा त्रास होऊ शकतो. काही काही रुग्ण तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या गोष्टी आवश्यक होतील तितके सिरीयस होतात.

 

 

पूर्वी भारतात सिटी व्हॅल्यू 24 ही ग्राह्य धरली जायची. चोवीसच्या पुढचे रुग्ण हे कोवीड निगेटिव्ह समजले जायचे. पण त्याचा धोका जास्त होता कारण सिटी व्हॅल्यू 24 म्हणजे निगेटिव्ह. म्हणून ते रुग्ण समाजामध्ये आरामात फिरायचे आणि त्यांच्यापासून इतरांना कोरोनाची लागण व्हायची.

अगदी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने देखील रुग्णाची सिटी व्हॅल्यु 24 ही ग्राह्य धरली जावी असा आग्रह आयसीएमआरला केला होता. मात्र आयसीएमएमआरने नवीन अभ्यासानुसार आता 35 हीच व्हॅल्यू निश्चित केली आहे. कारण व्हायरल लोड असलेले लक्षणे न दिसणारे रुग्ण यातून सुटत होते.

जर एखाद्या रुग्णाने लवकर rt-pcr टेस्ट केली तर त्यावरून त्याची सिटी व्हॅल्यू बघून डॉक्टरांना उपचार करणे सोपे होणार आहे. त्या रुग्णाला ऑक्सीजनची आवश्यकता लागू शकेल का याचादेखील अंदाज डॉक्टरांना येईल. लवकर उपचार चालू केल्याने संभाव्य मृत्युदर कमी करण्यात याची मदत होईल.

अर्थात कोरोनाच्या रुग्णाला कोणत्या प्रकारचा त्रास होईल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. अगदी सिटी व्हॅल्यू 14 – 15 असली तरी तो रुग्ण asymptomatic (असिम्पटोमॅटिक) असू शकतो. म्हणजे त्या रुग्णाला काहीही त्रास होणार नाही पण त्याच्यापासून इतरांना कोरोना होण्याचा धोका आहे. याच्या उलट 25 – 26 सिटी व्हॅल्यू असली तरी त्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता देखील पडू शकते.

 

हे ही वाचा – डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅनला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच

अर्थातच लक्षणे दिसल्यापासून कितव्या दिवशी टेस्ट केली हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. सॅम्पल घेणाऱ्याने ते व्यवस्थित घेतलं का? त्याचं नीट स्टोरेज झालं का या देखील गोष्टी या बाबतीत खूपच सेंसिटिव आहेत.

लोकांच्या याबाबतीत अनेक गैरसमजुती देखील आहेत. म्हणूनच जर rt-pcr चाचणी करायची वेळ आली तर त्यातील सिटी व्हॅल्यू काय आहे हे नक्की बघायला हवे. जरी सिटी व्हॅल्यू तीस असली तरी घरीच होम आयसोलेशन मध्ये राहणे योग्य ठरेल.

rt-pcr चाचणीचे निदान व्हायला सध्या दोन-तीन दिवस लागत आहेत. यावेळी rt-pcr चाचणीसाठी सॅम्पल तर द्यावेतच. पण त्याचबरोबर एचआर सिटी टेस्ट सुद्धा करून घ्यावी. एचआरसीटीचा स्कोर किती आहे हे पाहून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे औषध उपचार चालू करावेत.

मुळात कोणतीही लक्षणे दिसली की लगेच rt-pcr चाचणी करून घ्यावी. ज्यामुळे रुग्णावर लवकरात लवकर इलाज केला जाईल. तसेच आपल्या मुळे देखील इतरांना त्रास होऊ नये याची काळजी देखील घेणे जरुरीचे आहे. कारण आपला निष्काळजीपणा आपल्या घरातल्या प्रिय व्यक्तींनाही भोवू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version