' बंगालमधील सुखावह उदाहरण : झोपडीवजा घर ते आता आमदार निवास…! – InMarathi

बंगालमधील सुखावह उदाहरण : झोपडीवजा घर ते आता आमदार निवास…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एकदाचे निवडणुकांचे निकाल लागले, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनासारखे महाभयंकर संकट बाजूला ठेवून आपला राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे निवडणूका ह्यातच सर्वपक्ष व्यस्त होते. काही महिने, वर्षांच्या परिश्रमाचे काही ठिकाणी सार्थक झाले तर काही ठिकाणी अपयश पत्करावे लागले.

निडणूक आल्या म्हणजे उमेदवार आले, प्रत्येक पक्ष आपला उमेदवार अगदी पारखून घेतो म्हणजे त्याचे समजत काय स्थान आहे लोकहिताची कामे किती केली आहेत, सामान्य ज्ञान किती आहे या सर्व गोष्टींचा विचार करून तिकीट दिले जाते. बाकी घराणेशाही, गुंड प्रवृत्तीचे लोक नियमाला अपवाद असतात.

 

chand inmarathi

 

साध्या नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेकवेळा पैशाच्या जीवावर उमेदवार उभे केला जातात. तसेच एकीकडे वर्षानुवर्षे पक्षाला जिंकवणाऱ्या उमेदवाराचे तिकीट कधी कधी कापले जाते.

इतकी वर्ष ज्या पक्षाला आपण निवडून दिले त्याच पक्षाने आपले तिकीट कापले त्यामुळे साहजिकच स्वाभिमान दुखावणार मग ह्याचाच फायदा विरोधी पक्ष घेतो आणि त्याच उमेदवाराला तिकिटाचे आमिष देऊन आपल्या पक्षात घेतो. बाकी पक्षाची विचारधारा हा दुय्यम भाग झाला.

 

Tripura_Assembly_Election_inmarathi

हे ही वाचा – लॉकडाउन : घरोघरी स्वयंपाकाचं काम करणारी महिला मालकाच्या मदतीने झालीये “बिझनेस वुमन”

 

निवडणुकांचे पडघम गेल्या चार पाच महिन्यांनपासून वाजत होते. सगळीकडे चर्चा होती ते उमेदवारांची अगदी दक्षिणेत देखील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही पक्षांनी अतरंगी उमेदवार उभे केले होते. असाच एका उमेदवार होता ज्यांनी लोकांना अव्वाच्यासवा आश्वासने दिली होती. केरळमध्ये सुद्धा घराणेशाही दिसून आली

पश्चिम बंगालमध्ये अशीच एक उमेदवार भाजप कडून उभी करण्यात आली जिच्या मागे कोणताही जनसमुदाय नाही, ना कोणते आर्थिक पाठबळ ना विकासकामे ना कोणत्या पक्षाशी जवळकीचे संबंध. एका रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसाची ती पत्नी आहे.

कोण आहेत चंदना बाउरी

पश्चिम बंगाल मधील सालतोरा विभागातून भाजप कडून चंदना उभी होती. आज पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल पक्षाला जरी बहुमत मिळाले असले तरी सालतोरमध्ये त्यांचा प्रभाव झाला आहे.

 

 

चंदानाची कौटुंबिक पार्शवभूमी फारशी बरी नाही. तिचा नवरा इतरांच्या घरातील फर्निचर बनवून घर सुशोभित करतो मात्र तोच नवरा आपले स्वतःचे घर सुशोभित करण्यात अपयशी पडला आहे. चंदनाचे उत्पन्नाचे साधन म्हणजे तीन गायी आणि तीन बकऱ्या आणि झोपडीवजा घर हीच तिची संपत्ती.

झोपडीवजा घर असले तरी चंदनाने १२ पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. निदान आर्थिक बाजू भक्क्म नसली तरी शिक्षणची बाजू भक्क्म नसली तरी उमेदवार होण्याइतपत नक्कीच तिची क्षमता आहे.

विजयी होण्यामागचे कारण :

कोणतंही निवडणुकीची पार्शवभूमी नसताना समोरच्या तंगड्या उमेदवाराला ते पण एका स्त्री उमेदवाराने हरवणे सोपे नाही. तिला विजयी करण्यामागे पक्षाचा आणि तिकडच्या स्थानिक जनतेचा मोठा सहभाग आहे.

 

chand 2 inmarathi

 

अनेक मदतीचे हात पुढे आले कोणतीही त्याबदल्यात अपेक्षा न ठेवता. पक्षाने देऊन केलेल्या गाडीतूनच तिने प्रचार केला, स्थानिकांचे यामध्ये मोठा सहभाग होता.

‘भ्रष्ट आणि निवडणुकांनंतर जनतेला विसरणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्यापेक्षा, सामान्य जनतेतल्याच एखादया माणसाला निवडून देऊ’, अशी कदाचित मानधारण तिकडच्या स्थानिकांची असू शकते.

एकीकडे भाजपने अनेक आमदार फोडले, पैसे ओतले, सगळी ताकत लावली असे आरोप होत असताना दुसरीकडे एका झोपडीवजा घरातील महिलेला आमदार बनवले.

 

chand 3 inmarathi

हे ही वाचा – इथून, तिथून शेवटी मिथुन भाजपमध्ये: नक्षलवादी ते नेता, वाचा एक भन्नाट राजकीय प्रवास

आजकाल पक्षांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी अनेकवेळा चढाओढ सुरु असते, मग कोणाला उमेदवारी द्यायची याचे निकष लावले जातात त्यात  पक्षासाठी किती काम केले आहे, पक्षामध्ये सिनियर जुनियर अशा अनेक बाबींचा विचार करून पक्षश्रेष्टी उमेदवार ठरवतात.

आज चंदना सारख्या व्यक्तींना तिकिटे दिले गेले पाहिजे जेणेकरून सामन्यांचे प्रश्न सरकार पर्यंत पोहचू शकतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?