आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेली दीड वर्ष जगभर आलेल्या कोरोनामुळे सगळेच हैराण झाले आहेत. कोरोनाची महामारी आली आणि आणि जगाचे रूपच पालटले. लॉकडाउन लावले गेले. रस्ते बंद , काम बंद, वाहतूक बंद आणि सगळ्यांना घरात बसायची वेळ आली.
बाहेर फिरायचं असेल तर तोंडावर मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली, कारण कोरोना हा नाकातोंडातूनच शरीरात जातो आणि नाकातोंडातूनच बाहेर पडतो आणि लोकांना बाधित करतो.
डब्ल्यूएचओच्या नियमानुसार तोंडावर मास्क, सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळलं तर कोरोनाचा संसर्ग व्हायची भीती कमी असते.
त्यामुळे जगभरातले सगळेच लोक आता तोंडावर मास्क लावून फिरत आहेत. कोरोनाची पहिली लाट संपूर्ण जगात येऊन गेली आहे. आता अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट देखील येऊन गेली.
===
हे ही वाचा – कोरोनासह अनेक दुर्धर आजारांवर ही ७ झाडं जो परिणाम साधतात तो सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे
===
सध्या आपल्या देशातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे लोकांनी मास्कचा वापर नीट केला नाही.
काही लोकांच्या तोंडावर मास्क असतो, पण तो खाली ओढलेला असतो. कुणाचा कपाळावर बसलेला असतो. कोण रूमालच चेहऱ्याला लावतो, तर कुणी ओढणी, मफलरने तोंड झाकतो.
अनेकजण तर बोलताना मास्क खाली घेतात. काहीजण चेहऱ्यावर कपड्याचे धूवून वापरता येईल असे मास्क लावतात. तर काही लोक सर्जिकल मास्क लावतात. काही प्रामाणिकपणे डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार सांगितलेले N-९५ मास्क वापरतात.
आता या दुसऱ्या लाटेत भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्याही वाढते आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. काही ठिकाणी आरोग्यव्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे आणि त्यामुळेच होणारी जीवित हानीदेखील मोठी आहे.
यासाठीच विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत कोरोनाविषाणूमध्ये बदल होत आहेत आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत आहे.
भारतातील बहुसंख्य लोकांना कोरोनाची लागण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने आता दोन मास्कचा वापरा करावा असे सुचवले आहे.
सध्या वापरण्यात येणारे मास्कचे प्रकार…
१) साधा कॉटनच्या कपड्याचा
२) सर्जिकल मास्क
३) N ९५ मास्क
===
हे ही वाचा – कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणं धोक्याचं आहे का? जाणून घ्या!
===
का वापरावे लागणार दोन मास्क
यापुढच्या काळात दोन मास्क वापरणं गरजेचं झालं आहे, असं तज्ज्ञांचं मत झालं आहे. याची अशी कारणं सांगितली जात आहेत.
कोरोना व्हायरसमध्ये बदल होत आहे. सुरुवातीच्या काळात बदल झालेला कोरोना व्हायरस तितका घातक नव्हता. अगदी सामान्य लक्षणं दिसायची आणि माणूस बरा व्हायचा. पण आता त्यात आणखीही बदल झाले आहेत, आणि आता हा व्हायरस सामान्य लक्षणांकडून घातक लक्षणांपर्यंत आला आहे.
व्हायरस पसरण्याचा वेग वाढला आहे. पूर्वी घरातील एखादीच व्यक्ती बाधित व्हायची, पण आता मात्र संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित होत आहे. त्यातील एखाद-दुसऱ्या माणसाची प्रकृती गंभीर होत आहे. काही घरांमध्ये संपूर्ण कुटुंब व्हायरसचा बळी ठरलं आहे.
नवीन अभ्यासानुसार हा व्हायरस आता हवेत देखील दोन ते तीन तास रहात असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट अधिक भयानक झाली आहे. हवेत राहणारा व्हायरस हीच गोष्ट सध्या शात्रज्ञांच्या चिंतेचं कारण बनली आहे.
म्हणूनच आता दोन मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. हा धोका असाच वाढला, तर घरातही आपल्याला दोन मास्क लावून बसावे लागेल. असंही म्हटलं जात आहे.
दोन मास्क कसे वापरायचे
दोन तीन प्रकारचे मास्क आजकाल सगळ्यांकडेच आहेत, परंतु त्यातही कॉटनचे मास्क वापरण्याकडे लोकांचा कल आहे. पण त्या मास्कने कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
म्हणजेच दोन मास्क कॉटन कपड्याचे वापरले, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. तसेच एक सारखेच दोन मास्क एकावर एक लावून उपयोगाचे नाही. कारण एक मास्क संपूर्ण तोंड आणि नाक झाकत नाही, थोडीशी फट पडते आणि त्यातून हवा आपल्या श्वासोश्वासाद्वारे शरीरात जाऊ शकते, आणि कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतोय.
जर N ९५ मास्कसारखा नाकाच्या जवळ तार असलेला मास्क लावला तर त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल. पण जर सर्जिकल मास्क आणि त्यावर कॉटनच्या कपड्याचा मास्क वापरला तर तेदेखील फायदेशीर असेल. यामुळे नाक आणि चेहऱ्याचा भाग पूर्णपणे झाकला जाईल.
N ९५ मास्क सुरक्षित आहेतच, पण त्याच्या आत जर कॉटनचा मास्क असेल तर ते जास्त संरक्षण देऊ शकतात. दोन N ९५ मास्क वापरणे देखील बरोबर नाही. तसेच दोन सर्जिकल मास्क लावणेदेखील फायदेशीर नाही.
काही जणांना एकाच मास्कमध्ये गुदमरल्यासारखं होतं ते लोक दोन मास्क लावतील का? याचं उत्तर म्हणजे जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाणार असाल म्हणजेच बाजारपेठेत, मॉलमध्ये, बँकेत, डॉक्टरांकडे, रेल्वेमध्ये, बसमध्ये जाणार असाल तर तिथे दोन मास्क लावणं गरजेचं असेल.
गर्दीच्या ठिकाणी हवेत कोरोनाचे विषाणू असू शकतात. हे दोन मास्क लावतानाही काळजी घ्यावी, की श्वास सोडायला आणि श्वास घ्यायला मास्कमधे थोडी जागा असावी. म्हणजे गुदमरल्यासारखे वाटणार नाही.
===
हे ही वाचा – मास्क वापरताना लोक या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेकांना संसर्ग होतोय…
===
जागतिक आरोग्य संघटनेने सांगू दे किंवा इतर कोणीही, पण आता कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेपासून किंवा पुढे येऊ शकणाऱ्या लाटांपासून आपल्याला वाचायचे असेल, तर विशेष काळजी घेतली पाहिजे आणि दोन मास्कचा वापर केला पाहिजे.
जर आपल्याला आपली आणि आपल्या घरातल्या लोकांचे काळजी असेल, आपल्याला कोविड सेंटरमध्ये जायचे नसेल, ऑक्सिजनसाठी धावपळ करायची नसेल, घरात आयसोलेट व्हायचे नसेल, तर दोन मास्क लावावेत. आताच्या घडीची ही अनिवार्य गोष्टच झाली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.