Site icon InMarathi

परिपूर्ण जोडीदार बनायचंय: कामसुत्रातील या १० टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील

saif preity 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्पर्श हा प्रेम दर्शविण्याचा एक अत्यंत सुंदर मार्ग आहे. प्रत्येक नात्यातील स्पर्शाची पद्धत वेगळी असते, त्यातून जाणारे संदेश वेगळे असतात. जेव्हा एक स्त्री आणि पुरुष शारीरिक जवळीक वाढवण्याच्या हेतूने एकमेकांना स्पर्श करतात त्याला आपण सामान्य भाषेत सेक्स म्हणतो.

काम, कामवासना, सेक्स ह्या विषयांकडे आपण नेहमीच संकुचित वृत्तीनेच बघत आलोय. पण त्यानेच जग चालतं, चक्क हि बाबच आपण विसरलो!

चार चौघांत अजिबात शारीरिक संबंधांबद्दल बोलू नये, अविवाहित तरुण मुलांच्यातर कानावरसुद्धा हा शब्द पडू नये ह्याची आपल्या थोरा- मोठ्यांना सतत काळजी लागलेली असते. कारण?

 

 

कारण आहे ह्या सुखद अनुभावाविषयीचं पसरलेलं घोर अज्ञान. ज्ञानाच्या प्रकाशाने हा अंधःकार आपण दूर करूच देत नाही. कारण आपल्याला वाटतं आपली नीतिमूल्ये, प्रतिष्ठा, नियम सगळं मोडीत निघेल म्हणूनच तर शाळांमध्ये sex -education/ लैंगिक शिक्षणावर बंदी आहे.

ह्याच अज्ञानापायी मध्यप्रदेशातल्या खजुराहो मंदिरांच्या सुंदर शिल्पकला आज, ह्या २१ व्या मॉडर्न शतकात, असभ्य वास्तू झाल्या! “कामसूत्र” हा ग्रंथ कोणत्यातरी दर्जा नसलेल्या आंबट गोष्टींच्या पुस्तकांसारखा भासू लागला आणि इथेच आपलं आयुष्याचं विशेषतः वैवाहिक आयुष्याचं कोडंच फिस्कटलं.

आज कितीतरी जोडपी एवढ्या तेवढ्या कारणांवरून काडीमोड घेतात, सोबत राहत असले तरी निव्वळ फॉर्मलिटी म्हणून सोबत असतात. प्रेम, ओलावा, एकमेकांबद्दलचं आकर्षण हे त्यांच्यातून कधीच लुप्त झालेलं असतं.

ह्याच “लाज- शरम- इज्जत” मॉडेल मुळें नवरा बायकोला हवं तसं एकमेकांपुढे कधी व्यक्तच होता येत नाही आणि मग मनं न जुळणं, लैगिंक समाधान न मिळणं, भांडणं, वाद हे सगळं वाढत जातं.

पण ह्या सागळ्यांवरचे उपाय वात्स्यायनाने आपल्या नावाजलेल्या ग्रंथात अर्थात “कामसूत्र” ह्यात दिलेले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा अविवाहित असलेल्या ‘या’ ऋषींनी जगाला दिला कामसूत्राचा मंत्र, विश्वासच बसणार नाही!

===

 

कामसूत्र केवळ लैंगिक शिक्षणासंबंधीचा ग्रंथ नसून स्पर्शाच्या साहाय्याने आपलं जीवन अधिक सुखी कसं बनवावं व आपल्या जोडीदाराला संतुष्ट ठेऊन संतुलित आयुष्य कसं जगावं ह्यावर प्रकाश टाकणारा ग्रंथ आहे.

आज त्यातील १० महत्वाच्या मुद्द्यांबाबल आपण जाणून घेणार आहोत.

 

१) कामुक प्रणय / foreplay –

 

 

संशोधनावरून असे सिद्ध झाले आहे की फोरप्ले स्त्रियांना अधिक उत्तेजित करतो आणि याने दोघा जोडीदारांना लैंगिक संतुष्टी मिळते. कामसूत्रात सुद्धा हेच सांगितलेले आहे.

प्रणयाआधी आपल्या जोडीदाराशी गप्पा मारा, सुगंधी रूम फ्रेशनर्सने वातावरण निर्मिती करून घ्या, मानसिक आणि शारीरिकरित्या आपल्या जोडीदाराला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्या व मग पुढची पायरी गाठा.

 

२) जबरदस्ती करुन चालणार नाही –

 

 

सुखाचा उच्च शिखर गाठायचा असेल तर बळजबरी करून चालणार नाही. तुम्ही मुडमध्ये असलात तरी तुमच्या जोडीदाराची इच्छा आहे का याला महत्व द्या.

ह्याच उलट, आपली सतत इच्छा नसेल आणि जोडीदाराची असेल आणि भरपूर काळापासून तुमच्यात कुठलीच शारीरिक जवळीक झालेली नसेल तर क्रियेत सहभागी व्हा co-operate करा.

 

३) Sexual positions –

 

 

कामसूत्रात ह्या sexual positions ना विशेष महत्व दिलं आहे. कायम तीच कंटाळवाणी प्रणयक्रिया होऊ नये म्हणून ह्या वेगवेगळ्या sexual positions चा उपयोग करावा, याने आपल्या सेक्स लाईफ मधलं नावीन्य टिकून राहतं.

शिवाय प्रत्येक position ने वेगळी अनुभूती होते आणि वेगळी संतुष्टी मिळते. त्यामुळे आपली सेक्स लाईफ रंजक बनवण्यासाठी ह्या positions ट्राय करून पाहण्यास हरकत नाही.

 

४) संतुलित आणि निरोगी जीवनशैली –

 

===

हे ही वाचा प्रत्येक पुरुषाने लग्नाआधी या “१३” गोष्टी समजून घ्यायला हव्यातच..!

===

कामसूत्रात सांगितल्याप्रमाणे, जी व्यक्ती निरोगी असेल व जीची जीवनशैली संतुलित असेल तीच सगळ्या प्रकारच्या सुखांचा आनंद घेऊ शकते.

त्यामुळे श्रम करा, अर्थार्जन करा, दान करा, बचत करा, व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, अराम करा आणि संतुलित जीवनशैली बनवा.

 

५) निसर्गाच्या सानिध्यात रहा –

 

 

मानसिक आरोग्य सुदृढ असेल तरच आपण प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटू शकतो. कामसूत्रपण याच सूत्रावर आधारित आहे आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचा, स्फूर्ती वाढवण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणे.

त्यामुळे जितका वेळ मिळेल तितका निसर्गाच्या सानिध्यात घालवला तर आपलं आयुष्य अजून सुखकर होईल.

 

६) जोडीदाराचा आत्मसन्मान जपणे –

 

 

आपण जोडीदार आहोत, दोघेही बरोबरीचे. कोणी श्रेष्ठ नाही की कोणी तुच्छ नाही अगदी समान आहोत ह्या भावनेने आपल्या जोडीदाराशी वागणे खूप गरजेचे आहे.

एकमेकांची मतं विचारात घेणं, कधी मतभेद झाले तरी चार चौघांत टोचून न बोलता नीट समजावून सांगणं, आपल्या जोडीदाराला स्वातंत्र्य देणं हे सगळे आत्मसन्मान जपण्याचेच मार्ग आहेत आणि प्रत्येयकाने तो जपायलाच हवा.

 

७) जोडीदाराची काळजी –

 

 

आपण एकमेकांवर प्रेम करतो म्हणून सोबत आहोत, आपल्या दोघांनाही एकमेकांच्या सोबतीची गरज आहे हे न विसरता आपल्या जोडीदाराची काळजी घेतलीच पाहिजे.

आजारपणात, अपयशात, जीवनातील नाजूक वळणांवर आपल्या जोडीदाराच्या पाठीशी खंबीर पणे उभं राहून प्रोत्साहन देण्याचं आपलं कर्तव्य आहे हे आपण कायम ध्यानात ठेऊन त्यांची योग्य काळजी घ्यायलाच हवी असं हा ग्रंथ संगतो.

 

८) योग्य जोडीदाराची पारख करणे –

 

 

विवाह ही एक जन्मजन्मांतरीची बांधली गेलेली गाठ असते. त्यामुळे आपण आपलं जीवन कोणासोबत व्यतीत करणार आहोत ह्याची आपल्याला संपूर्ण कल्पना असायला हवी.

स्त्रियांनी आपला जोडीदार – प्रेमळ, खंबीर, आपला व आपल्या पालकांचा आदर करणारा, अर्थार्जन करून उदरनिर्वाह करण्यास सक्षम आहे का, आपले व त्याचे विचार जुळतायत का हे तपासून घ्यावं.

तर पुरुषांनी आपल्या घरात येणारी मुलगी समजूतदार आहे का, ओलावा असलेली, प्रेमळ, काळजीवाहू, आपला व आपल्या आईवडिलांचा आदर करणारी, काटकसरी आहे का हे तपासून घेऊन, तिच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून मगच लग्नाचा निर्णय घ्यावा.

 

९) स्त्रियांनी लग्नापूर्वी वाचावा हा ग्रंथ –

 

 

पुरुषांपेक्षा जास्तकारून स्त्रिया ह्या विषयांवर बोलणं टाळतात. त्यामुळे लग्नापूर्वी हा ग्रंथ वाचल्यास पुरुषाच्या एका स्त्रीकडून काय अपेक्षा असतात हे तिला नीट समजण्यास मदत होते.

===

हे ही वाचा केवळ प्रेम, हँडसम लुक्स यापेक्षा या ९ गोष्टींच्या शोधात असतात मुली!

===

आपलं घर सोडून तिला जायचं असत म्हणून तिथे गेल्यावर आपल्याला कुठल्या अडचणी येऊ शकतात त्यांवरची उत्तरंसुद्धा ह्या ग्रंथात आहेत.

ह्या ग्रंथात असे ६४ आर्टफॉर्म्स आहेत ज्यांच्या साहाय्याने स्त्रिया समाजात आपलं नाव कमवू शकतात आणि त्यांच्या sexual desires जास्त असल्याने त्या स्वतःला तितकं आकर्षक सुद्धा बनवू शकतात.

 

१०) पुरुषाचा अप्रोच कसा असावा? –

 

 

स्त्रियांना कोणत्या पुरुषाचा हेतू चांगला आणि वाईट हे आपोआप समजते. निसर्गाने त्यांची निर्मितीच तशी केलेली आहे.

त्यामुळे कोणत्याही स्त्रीशी ओळख करून घेताना काय करावं काय करू नये, जेणे करून कोणताही चुकीचा संदेश न जाता प्रेम, जिव्हाळा व सकारात्मक संदेश तिच्या पर्यंत पोहचेल ह्याबद्दलही भरपूर टिप्स कामसूत्रात दिलेल्या आहेत. स्वतःला अधिक आकर्षक बनवण्यासाठी पुरुषांनी त्या टिप्स वापरुन पाहाव्यात.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version