Site icon InMarathi

प्लाझ्मा दान करताय, किंवा इतरांना तसा सल्ला देताय? आधी या महत्वाच्या ८ बाबी वाचा!

plasma therapy inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सलग दीड वर्षांपासूम जगभरात थैमान आणि मृत्यतांडव घालत असलेली ही कोव्हिड – १९ ची महामारी काही संपता संपत नाहीये. सध्याच्या परिस्थितीत लस उपलब्ध झाली आहे, अनेक उपचार पद्धतींचा वापर करणे, काळजी घेण्याच्या विविध गाईडलाईन्स जरी झाल्या आहेत, तरीही ह्या महामारीचा वेग कमी होताना दिसत नाही.

कोव्हिड १९ च्या अनेक उपचार पद्धतींपैकी अत्यंत गुणकारी आणि अधिक वापरली जाणारी एक पद्धत म्हणजे “Plasma treatment”. या पद्धतीला वैद्यकीय भाषेत “convalescent plasma therapy” असे म्हणतात.

 

 

ही थेरपी बऱ्याच गंभीर पेशंट्सवरसुद्धा गुणकारी ठरलेली आहे. ज्यामुळे plasma दान करण्याच्या अनेक मोहिमांनी जोर धरलाय. भारत हे एक कुटुंब म्हणून आपण आपलं कर्तव्यसुद्धा पार पाडतोय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी संशोधन होत असलेली ‘ही’ पद्धत यशस्वी ठरली, तर आपण जिंकू हे नक्की

===

हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्वतः plasma दान करायचं असेल किंवा तुमच्या परिचितांना जर याबद्दल माहिती द्यायची असेल तर हा लेख तुम्ही नक्की वाचलाच पाहिजे.

Plasma थेरपी म्हणजे काय?

आपल्या रक्तातील एक पिवळा घटक ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाणी, पोषक तत्व, व्हिटॅमिन, मिनरल्स इत्यादीचा अवयवांना पुरवठा केल्या जातो. हाच घटक शरीरातील दूषित घटक बाहेर काढण्यास सुद्धा मदत करतो.

plasma उपचार पद्धतीत कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या रक्तातून plasma घेऊन, कोरोनाग्रसीत रुग्णाच्या शरीरात तो सोडला जातो. कोरोनातुन बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी झगडण्याचे सेल्स किंवा ‘antibodies’ तयार झालेल्या असतात.

 

 

याची कोरोना असलेल्या रुग्णाला जिवंत राहण्यासाठी गरज असते. या थेरपीने ह्या antibodies रुग्णाच्या शरीरात सोडून त्याला जीवनदान दिले जाते.

कोणती व्यक्ती plasma दान करू शकते?

साध्या रक्तदानात आणि plasma दानात भरपूर फरक असतो. त्यामुळे plasma दान करण्याचे काही नियम असतात. प्रत्येक इच्छुक डोनरला या नियमांमध्ये मोडणे आवश्यक आहे. नियम खालील प्रमाणे आहेत –

१. Asymptomatic कोरोना

या प्रकारच्या कोरोनाचे निदान झाले असल्यास “positive रिपोर्ट” मिळाल्याच्या १४ दिवसांनी आपण plasma दान करू शकता.

२. symptomatic कोरोना

या प्रकारच्या कोरोनाचे निदान झाले असल्यास सगळे symptoms नाहीसे होऊन, तुम्ही ठणठणीत बरे झाल्यावर १४ दिवसांनी तुम्ही plasma दान करू शकता.

३. गर्भवती स्त्रियांना plasma दानाची परवानगी नाही.

 

 

४. कोव्हिडसाठी उपलब्ध असलेली कोणतीही लस घेतल्यावर २८ दिवस तुम्ही plasma दान करू शकत नाही.

५. plasma दान करण्यापूर्वी antibodies समान आहेत की नाही हे तपासण्यासाठी एक चाचणी केली जाते. ह्या चाचणीत antibodies समान असलेल्या व्यक्तीलाच प्रत्यक्षपणे पेशंटला plasma दान करता येतो.

===

हे ही वाचा भारतीय संशोधकांची कमाल….कोरोनावर लसीइतकीच प्रभावी गोळी शोधून काढली

===

plasma दान कारण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

१. आधार कार्ड.

२. कोरोना निगेटिव्ह दर्शवणारा RTPCR किंवा रॅपिड अँटीजन टेस्टचा रिपोर्ट. ह्या रिपोर्टची एक ओरिजिनल प्रत आपल्या सोबत बाळगणे आवश्यक आहे. मोबाईल मधला फोटो, झेरॉक्स, किंवा डाउनलोड केलेली कोणतीही copy स्वीकारली जात नाही.

३. हा रिपोर्ट त्यात नमूद केलेल्या तारखेपासून ४ माहिन्यांपार्यंत वैध असतो. ४ महिन्यांपूर्वीचा जुना रिपोर्ट स्वीकारला जात नाही.

 

 

४. plasma दानासाठी जाहीर केलेली संकेत स्थळं – ह्या संकेत स्थळांवरून आपल्याला कोणत्या दवाखान्यातील कोणत्या रुग्णाला plasma ची गरज आहे हे जाणून घेऊ शकता, व नाव नोंदणी इत्यादी कशी करावी, संपर्क कोणाशी साधावा ह्याबद्दल माहिती प्राप्त करू शकता.

१. covidplasma.online/ २. https://dhoondh.com ३. http://needplasma.in/ ४. www.e-raktakosh.in

ह्या व्यतिरिक्त आपल्या शहरातील ब्लडबँकांशी संपर्क साधूनही आपण plasma दान करू शकता. अनेक NGO, खाजगी संस्थांनी मदतीचा हात पुढे केलाय व अनेक रक्त तसेच plasma दान करण्याचे उपक्रम सुरू केले आहेत.

plasma दानासंबंधी पसरलेले गैरसमज

१) कोरोनामध्ये येतो तसा अशक्तपणा येणे

हा निव्वळ एक गैरसमज असून plasma दान केल्याने कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा येत नाही.

 

 

२) आपल्या शरीरातील अँटिबॉडीज कमी होणे

आपल्या शरीरात जशा रक्तपेशी निर्माण होतात तशाच antibodies सुद्धा निर्माण होतात. त्यामुळे थोडासा plasma दान केल्याने आपल्या शरीरातील antibodies ची संख्या अजिबात कमी होत नाही.

plasma दान एक आयुष्य वाचवून आपल्याला पुण्याचे भागीदार बनवू शकते. आपण ज्या समाजात राहतो त्याप्रति सुद्धा आपली काही कर्तव्ये असतात. plasma दान देखील त्यापैकीच एक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात plasma दान करून कोरोना लढ्यात सहभागी व्हा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा कोरोनाची लस वाया जाते म्हणजे नेमकं काय? ही कारणं आहेत भविष्यातील धोक्याची घंटा

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version