Site icon InMarathi

लॉकडाऊन ही संकल्पना जगासाठी नवीन नाही! चला थोडे इतिहासात डोकवूयात…

lockdown history inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घातलं आहे. प्रशासन हे आपल्यासाठी काय करू शकतं? आणि काय करू शकत नाही? हे सर्व मागच्या २ वर्षात स्पष्ट झालं आहे.

आज जग जणू काही फक्त जिवंत असणं आणि नसणं या दोन पर्यायांवर येऊन थांबलं आहे. कॉम्प्युटरला जशी ० किंवा १ ही बायनरी भाषाच समजते तसंच काहीसं आपलं सुद्धा झालं आहे.

खूप वर्षांपूर्वी आलेल्या ‘प्लेग’च्या साथीमध्ये सुद्धा लोक असेच हतबल झाले होते. तेव्हा तर वैद्यक शास्त्राने, इंटरनेटने एवढी प्रगती सुद्धा केलेली नव्हती.

लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगसारखे शब्द मागच्या वर्षभराहून अधिक काळात आपण असंख्य वेळा ऐकले आणि वाचले आहेत. तरीही भारतात असलेल्या लोकसंख्येमुळे, सार्वजनिक वाहतूक, लोकांमधील जागरूकतेचा अभाव या सर्व गोष्टींमुळे आपण कोरोनावर मात करू शकलो नाहीत हे सत्य आहे.

 

===

हे ही वाचा – या ६ गोष्टी केल्यात तरच लॉकडाऊन आणि कोविडच्या संकटावर करता येईल मात…!!

===

‘संपूर्ण लॉकडाऊन’ इथून पुढे कधीच होऊ नये असं जवळपास अनेकांचं मत दिसतंय. म्हणजेच अर्थचक्र थांबू नये हा त्यामागचा हेतू आहे आणि तीच व्यवसायिक, सामान्य माणसाची सुद्धा इच्छा आहे, असं पाहायला मिळतंय.

२४ मार्च २०२० ते ३० एप्रिल या काळात झालेला देशव्यापी ‘लॉकडाऊन’ ही घटना पुन्हा होणार नाही असं म्हणायला हरकत नाही. पण, ही अशी परिस्थिती पहिल्यांदा आली आहे का? याआधी इतिहासात कधीच असं घडलं नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे.

कोलिन्स शब्दकोशाने जरी ‘लॉकडाऊन’ या शब्दाला २०२० या वर्षामधील ‘वर्ड ऑफ द इयर’ घोषित केलेलं असलं, तरीही जगात पहिला ‘लॉकडाऊन’ हा १३४६ ते १३५३ मध्ये लागल्याची नोंद आहे.

प्लेगमुळे घोषित करण्यात आलेल्या या ‘लॉकडाऊन’ ला ‘ब्लॅक डेथ’ हे टोपण नाव देण्यात आलं होतं.

 

 

प्लेगच्या आजाराने तेव्हा जगभरातील अडीच करोड लोकांचा जीव घेतला होता. ती जगाने अनुभवलेली पहिली वैश्विक महामारी होती. इटालियन लेखक बोकासीयो यांनी त्यांच्या ‘द डेकामेरॉन’ या पुस्तकात असं लिहून ठेवलं आहे, की ‘१३४६ ते १३५३ या काळात इटलीच्या रस्त्यांवर चालणं अवघड झालं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला या आजाराने त्रस्त लोक दिसायचे. तो जगाचा अंत असेल या विचारात आम्ही जगत होतो, स्वतःला वाचवत होतो.’

इटलीच्या राजघरण्याने तेव्हा जगातील पहिल्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली होती. रस्त्यांवरची रहदारी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. शहराबाहेर जाणाऱ्या लोकांना थांबवलं जायचं.

प्लेगने आजारी असलेल्या लोकांना एक वेगळी जागा करून तिकडे ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आलं होतं. लोकांमधील संवादावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले होते. मध्यम वर्गीय आणि कामगार लोक ‘लॉकडाऊन’मुळे हवालदिल झाले होते.

इटलीची ही घटना तर फार जुनी आहे. पण, चीनमध्ये २००२ मध्ये सार्स (SARS – Severe Acute Respiratory Syndrome) नावाच्या एका आजाराने थैमान घातलं होतं. २००२ मध्ये चीनने पहिल्यांदा ‘लॉकडाऊन’ घोषित केला होता.

सर्व प्रकारचे सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. चीनने तो ‘लॉकडाऊन’ सुद्धा खूप कडक पद्धतीने पाळला आणि सार्सला हद्दपार केलं होतं.

 

===

हे ही वाचा – लॉकडाऊनमुळे सकाळी लवकर उठण्याची सवय मोडतेय? हा अफलातून फॉर्म्युला एकदा ट्राय कराच

===

भारतात ‘लॉकडाऊन’ घोषित झाल्यानंतर खूप लोकांनी याची सुद्धा आठवण करून दिली होती, की असं आयुष्य आपले काश्मीरचे बांधव वर्षानुवर्षे जगत आहेत.

सीमावाद सहन करणाऱ्या काश्मीरच्या लोकांनी अनेक वर्षांपासून नेहमीच ‘लॉकडाऊन’ची परिस्थिती अनुभवली आहे. कधी सरकारी घोषणेमुळे तर कधी अतिरेकी कारवायांमुळे, तर कधी युद्धजन्य परिस्थितीमुळे काश्मीरचे लोक हे नेहमीच धगधगतं आयुष्य जगत आहेत.

ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्या नंतर काश्मीरने परत एकदा खूप मोठा लॉकडाऊन अनुभवला होता. आपण तरी लॉकडाऊनमध्ये एकमेकांशी फोनवर, सोशल मीडियावर बोलू शकत होतो. काश्मीरमध्ये तर या माध्यमांवर सुद्धा बंदी घालण्यात आली होती.

 

 

न्यूयॉर्कमध्ये २००१ साली वर्ल्ड ट्रेड सेंटरला अतिरेक्यांनी पाडल्यानंतर सुद्धा अमेरिका सरकारने ‘सिव्हिल एअरस्पेस शटडाऊन’ची घोषणा केली होती.

न्यूयॉर्क, वॉशिंग्टन या शहरांपुरता हा लॉकडाऊन मर्यादित ठेवण्यात आला होता. ९ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या या घटनेनंतर सतर्कता म्हणून काही काळासाठी लोकांमधील दूरसंचार संवादावर बंदी घालण्यात आली होती.

२०१५ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर फ्रांसच्या शेजारी असलेल्या बेलजीयम देशाने ब्रुसेल्स या शहरात ४ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. हा लॉकडाऊन करण्याचं कारण हे होतं, की फ्रांस सरकारला माहिती मिळाली होती की पॅरिसमध्ये हल्ला करणारी व्यक्ती ही शहरातच लपून बसली आहे. देशांतर्गत वाहतूक रोखण्यासाठी हा लॉकडाऊन लावला होता.

१९८६ मध्ये त्यावेळी सोविएत युनियनमध्ये असलेल्या ‘प्रीपयत’ या भागात २६ एप्रिल रोजी ‘चर्नोबिल न्यूक्लिअर प्लँट’मध्ये एक विचित्र अणु अपघात झाला होता. या घटनेनंतर शेजारच्या देशातील हवेत अणुकण असल्याने लोक आजारी पडत होते. हा आजार ठराविक लोकांपुरता मर्यादित ठेवण्यासाठी प्रीपयत, युक्रेनमध्ये काही भागाला ‘एक्सक्लुझन झोन’ हे नाव देण्यात आलं होतं.

मिल्ट्रीला पाचारण करण्यात आलं आणि त्या भागातील वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले होते. हा लॉकडाऊन कितीतरी वर्षांपर्यंत सुरू होता.

 

 

युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशात, भागात लॉकडाऊन घोषित होतो. पण, तेव्हा सैन्यावर असलेल्या विश्वासामुळे लोक इतके अधीर होत नाहीत.

जगातील इतर देशातील लॉकडाऊनची माहिती ही त्याचं समर्थन करण्यासाठी देण्यात आलेली नाही. लॉकडाऊन हा लष्कराच्या मदतीने जितक्या कडक पद्धतीने पाळला जाईल तितका कोणताही विषाणू आपल्या जाळ्यात लॉक होऊ शकतो असा इतिहास सांगतो. जितका लॉकडाऊन सैल, तितकाच तो निरुपयोगी.

===

हे ही वाचा – लॉकडाऊन, कर्फ्यू , कलम १४४ यामधला फरक प्रत्येकाने नक्कीच समजून घ्यायला हवा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version