Site icon InMarathi

कोरोनासह अनेक दुर्धर आजारांवर ही ७ झाडं जो परिणाम साधतात तो सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे

tulsi featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्याच्या कोवीड काळात ऑक्सिजनची कमतरता हे चिंताजनक लक्षण आहे. अनेक रुग्ण प्राणवायूच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडत आहेत. ऑक्सिजनची कमतरता हा कोरोना काळातला सर्वात काळजीचा मुद्दा बनला आहे.

खरंतर पृथ्वीवर ७१ % पाणी आणि २९ % जमिन आहे. ही जमिन पशू, पक्षी, मानव, वनस्पती यांनी व्याप्त आहे. सागरी जलातही सजीव आहेतच. या सर्वांना जगण्यासाठी आवश्यक आहे प्राणवायू अर्थातच ऑक्सिजन.

 

 

हा ऑक्सिजन तयार करून वातावरणात मिसळण्याचे काम झाडे करतात. सरासरी ताशी ५/१० मिली. ऑक्सिजन झाडे तयार करतात पण त्यातही काही वनस्पती, झाडे अशी आहेत जी मोठ्या प्रमाणावर प्राणवायू तयार करतात. उदा. वड, पिंपळ, उंबर, बांबू, कदंब, जांभूळ, अशोक, आंबा, बकुळ, चिंच, कडूलिंब.

===

हे ही वाचा “रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान? वाचा याचं शास्त्रीय उत्तर

===

आपल्याकडे जागा असेल तर ही झाडे आपण नक्कीच आपल्या अंगणात, घराभोवतीच्या बागेत लावू शकतो. यापैकी वड, पिंपळ, कदंब, उंबर यांचे विस्तार मोठे असतात आणि मुळं खोलवर जातात म्हणून ही झाडे घराभोवती न लावता मोकळ्या जागी लावली जातात.

 

 

ही झाडे सदाहरित असून यांची पानं दाट उगवतात म्हणून ही झाडे जास्त प्रमाणात ऑक्सिजन तयार करतात. वडाचे मोठे झाड तर जवळपास ताशी ७१२ किलो ऑक्सिजन तयार करू शकते आणि पिंपळाचे झाड दिवसभरात २२ तास ऑक्सिजन तयार करू शकते.

ही झाडे मोठी आहेत. त्यामुळे आपण घरात लावू शकत नाही. मग अशी कोणती झाडं आहेत जी जास्त प्रमाणात प्राणवायू तयार करतात आणि जी घरातही लावता येतात. चला जाणून घेऊ.

१) तुळस

 

 

तुळस हवेतील विषारी घटक शोषून घेऊन प्रदुषणाचा स्तर ३० % पर्यंत कमी करते. इतकेच नाही तर दिवसभरातले २० तास प्राणवायू तयार करते. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला पुजनीय मानले गेले आहे ते यासाठीच. प्रत्येक घरी एक तरी तुळशीचे रोप असावेच.

===

हे ही वाचा अनेक व्याधींवर उपयुक्त असणाऱ्या तुळशीचे हे फायदे तुम्हाला बहुतेक माहीत नसतील!

===

२) जास्वंद

 

 

जवळपास २१५ प्रजाती असलेले जास्वंद आयुर्वेदिक दृष्ट्याही महत्वाचे आहे. दाट, लांब आणि पसरट पानांमुळे प्राणवायू मोठ्या प्रमाणात तयार करते. याच्या फुलांचे पेय हे रक्तदाब आणि रक्तशर्करा नियंंत्रीत ठेवायला मदत करते.

३) कोरफड

 

 

आयुर्वेदात जिला कुमारीआसव म्हणून ओळखले जाते ती कोरफड बाष्पीभवनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन तयार करते.

४) अरेका पाम

 

 

हवेतील प्रदुषित घटक शोषून घेऊन वातावरण स्वच्छ करण्याचे काम हे झुडूप करते. हवेतील कार्बनडायॉक्साईड शोषून घेऊन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, हे झाड तयार करते.

५) निवडूंग, ब्रह्मकमळ

 

 

सदाहरित असे हे झुडूप बाष्पीभवनातून मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन तयार करते.

६) जरबेरा

 

 

सदाहरित असे हे फूलझाड हवेतील प्रदुषित घटक शोषून घेऊन प्राणवायू निर्मिती करते.

===

हे ही वाचा अनेक विकारांवर गुणकारी अशा तुळशीच्या बियांचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

===

७) चायनीज एव्हरग्रीन

 

 

तुळशीप्रमाणेच प्राणवायू निर्मितीसाठी हे झुडूप खूपच उपयोगी आहे. हवेतील अँन्टी ऑक्सिडंटस शोषून घेऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम चायनीज ग्रास करते.

यासोबतच स्नेक प्लांट, मनी प्लांट, मोगरा, जुई अशी ईतर झुडपे आणि वेली आपल्या घरातील ऑक्सिजन ची पातळी वाढवायला मदत करतात.

कोवीड काळात घरातली ऑक्सिजनची पातळी वाढवायची आहे? मग ही झाडे घरात लावणं फायदेशीर ठरेल. तुमच्या ओळखीतील इतर मंडळींसाठी सुद्धा ही माहिती उपयुक्त ठरेल. त्यामुळे त्यांच्यासाठी हा लेख शेअर करायलाही विसरू नका.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version