Site icon InMarathi

‘या’ उपायांनी कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी काही काळापुरती राहू शकते सामान्य

oxi final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

२०२१ च्या सुरुवातीला कोरोना कमी झाल्याने सर्वांची नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने झाली. कोरोनाचे संकट कमी होत असतांनाच अचानक कुठे तरी माशी शिंकली आणि कोरोनाने अधिक ताकदीने फणा काढला.

 

 

कोरोनाच्या या नवीन लाटेमधे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ऑक्सिजनची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. किंबहुना केवळ ऑक्सिजन मिळत नाही म्हणून अनेक रुग्णांचा दुर्दैवी अंत देखील झाला.

 

 

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशातील रुग्णालयांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक कोरोनापीडित रुग्ण दम तोडत असल्याने आता सरकार, अनेक डॉक्टर्स आणि मेडिकल फिल्डमधील जाणकारांनी फक्त ऑक्सिजनच्या कमीमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी काही घरच्याघरी होतील असे सोपे आणि साधे उपचार सांगितले आहे.

 

 

रुग्णाला ऑक्सिजनची पातळी ९० च्या खाली गेल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार श्वास घ्यायला त्रास झाल्यावर लगेचच दवाखान्यात येण्याची घाई करू नये.

 

 

ऑक्सिजनची पातळी जपण्यासाठी किंवा योग्य पातळी मिळवण्यासाठी पुढील सोपे उपाय नक्कीच करता येतील.

घरात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येऊ द्या. यासाठी घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडा.

 

हे ही वाचा – कोरोनासोबत जगण्याची तयारी करायची आहे? मग या १२ सवयी आजपासूनच लावून घ्या!

घरात झाड असतील किंवा गार्डन असेल तर तुमचा जास्तीत जास्त वेळ तिथे घालवा.

 

 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य व्यायाम आणि मेडिटेशन करा. व्यायामाने श्वसन क्षमता प्रभावी राहण्यास मदत होते.

 

 

 

स्वतःला डिहायड्रेट होऊ देऊ नका, जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

 

 

 

ताज्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

 

 

प्रोनिंग करून देखील ऑक्सिजनची पातळी वाढवली जाऊ शकते.

प्रोनिंग म्हणजे काय?

शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली तर प्रोनिंग केल्यास फायदा होऊ शकतो. डॉक्टरांनीही ऑक्सिजनची योग्य पातळी राखण्यासाठी प्रोनिंग फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.

होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांनी, श्वसनाचा विकार असलेल्या रुग्णांनी आणि शरीरातील ऑक्सिजनचा स्तर ९४ च्या खाली गेलेल्या रुग्णांनी प्रोनिंग केले तर फायदेशीर ठरू शकते. कृत्रिम ऑक्सिजन उपलब्ध होईपर्यंत प्रोनिंग करुन रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो.

 

 

प्रोनिंग कसे करतात?

प्रोनिंग म्हणजे पोटावर झोपणे. प्रोनिंग करण्यासाठी सर्वप्रथम रुग्णाला पोटावर झोपवा. त्याच्या पोटाखाली आणि पायाच्या खाली दोन-दोन उशा आणि मानेखाली एक उशी ठेवा.

अशा स्थितीत रुग्णाला सतत श्वास घ्यायला सांगावे. यामुळे ऑक्सिजनची पातळी सामान्य होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल.

 

 

प्रोनिंग कोणी करू नये

प्रोनिंग अर्धा तासापेक्षा जास्त करू नये. जेवल्यानंतर लगेच प्रोनिंग करु नये, गर्भवती महिलांनी प्रोनिंग अजिबात करु नये. अशा सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.

 

 

 

 

यासोबतच काही गोष्टींपासून स्वतःचा बचाव देखील करा.

WEBMD च्या एका माहितीनुसार शरीरात ऑक्सिजनची कमतरता झाल्यास मेणबत्ती, गॅस, स्टोव्ह, फायरप्लेस गॅस हीटर अशा ज्वलनशील वस्तूंपासून कमीतकमी ५ फूट अंतर तरी राखले पाहिजे.

 

 

एयरोसोल स्प्रे, क्लीनिंग फूल, पेंट थिनर यांसारख्या ज्वनलशिल पदार्थांचा उपयोग करू नये.

 

 

 

पेट्रोलियम, ऑईल, ग्रीस बेस्ड क्रिम किंवा वॅसलिन असे काहीही रुग्णाच्या छातीला लावू नये.

 

 

सिगारेट बीडी पिणाऱ्यांपासून लांब राहा. स्वतःही धुम्रपान करू नका. सोबतच सुगंधित अगरबत्ती किंवा धूप यांच्यापासून देखील लांब राहा.

 

===

हे ही वाचा – ज्या लसीमुळे कोरोनाचं संकट दूर होणार, ती लस शरीरात नेमकी काय जादू करते? वाचा

 

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version