Site icon InMarathi

…म्हणून तेव्हाच्या सर्वात मोठ्या दिग्दर्शकाने ‘सुपरस्टार काकाच्या’ कानाखाली लगावली!

mehmood kaka inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हिंदी चित्रपटांचा पहिला सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख आहे तो राजेश खन्ना लाडानं फॅन्स त्याला काका म्हणून संबोधत असत. त्यानं त्याचं स्टारडम आवर्जून जपलं आणि हिंदी चित्रपटाच्या इतिहासात खडूस सुपरस्टार म्हणूनही नोंद करून ठेवली.

तमाम महिला वर्ग ज्याच्यावरून जीव ओवाळून टाकायचा तो राजेश खन्ना, अनेक मुली ज्याच्या नावाचा सिंदूर मिरवत असत तो राजेश खन्ना, अंजू महेंद्रूनं आपला मानलेला भाऊ संजीव कुमारशीही ज्याच्या साठी वैर पत्करलं असा राजेश खन्ना म्हणजे चालत बोलतं स्टारडम होतं.

सुपरस्टार कसा असावा? त्याचा दिमाख कसा असावा? तर राजेश खन्नासारखा! राजेश खन्नाच्या स्टारडमचे, त्याच्या खडूसपणाचे अनेक किस्से सांगितले जातात.

===

हे ही वाचा ५० वर्षांनंतरही “आनंद मरा नहीं है!”- आनंदने ५० वर्षांत आपल्याला काय काय दिलंय पहा

===

 

सेटवर पाच पाच सहा तास उशिरा पोहोचणं ही तर त्याची खासियत होती. तो काळ राजेश खन्नाच्या शिखरावर असण्याचा आणि बच्चनच्या संघर्षमय सुरवातीचा होता. अमिताभ नेहमीच सेटवर ठरलेल्या वेळेत पोहोचत असे, सीनची रिहर्सल करत असे आणि नेटका शॉट देत असे.

राजेश खन्ना मात्र सकाळची शिफ्ट असेल तर दुपारी पोहोचत असे, मेकअपसाठी तासनतास घालवत असे, सहकलाकार आणि  युनिट अगदी वैतागून जात असे मात्र राजेश खन्नाला या कशाचीच फिकीर नसायची.

एकदा एका पत्रकाराने अमिताभच्या वक्तशिरपणाचा संदर्भ देत काकाला विचारलं की, तू वेळेत येत नाही याबाबत तक्रारी आहेत, तुझं मत काय? यावर माजात त्यानं उत्तर दिलं होतं, कारकून मंडळी ठरलेल्या वेळेत काम करतात. कलाकार नाहीत आणि सुपरस्टार तर नाहीच नाही.

काका आणि बच्चनची स्पर्धा

माझा वेळ आणि माझं चित्रपटात असणं मौल्यवान आहे त्यामुळे त्याचा रुबाब तर युनिटनं जपलाच पाहिजे. अमिताभनं मात्र अनेकदा विचारूनही कधीही राजेश खन्नावर टिकेचा सूर लावला नाही. उलट तो सतत राजेश खन्नाचं कौतुकच करताना दिसत असे.

 

 

चित्रपटात येण्याची प्रेरणा त्यानं राजेशचे सिनेमे बघून घेतली होती. त्या काळात लाखोंचं होतं तसंच बच्चनचंही ते दैवत होतं आणि आपल्या या दैवताबद्दल त्यानं कधीही कटू शब्द उच्चारले नाहीत.

===

हे ही वाचा बच्चनने ही फिल्म नाकारल्यामुळे चित्रपटसृष्टीत इतिहास रचणारे सलीम-जावेद वेगळे झाले

===

एकिकडे राजेश खन्नाचे नखरे चालूच होते, स्टारडमची पश्चिम गडद व्हायला सुरवात झालेली होती. जाणवत होतं पण जाणवून घ्यायचं नव्हतं अशी परिस्थिती होती.

अशातच आला या दोघांच्या भूमिका असणारा नमक हराम. या चित्रपटाचे रशेस पहायला तो आला तेंव्हा होता तेंव्हा चित्रपट संपल्यावर त्यानं मनात कितीही कटूता भरली असली तरिही ह्रषिकेश मुखर्जींना दिमाखदारपणे सांगितलं की चित्रपट दुनियेतला पुढचा सुपरस्टार उगवला आहे.

 

 

मेहमुदने राजेश खन्नाला सुनावले खडेबोल

त्रास होत असूनही त्याच्या उशिरा येण्याच्या सवयीबद्दल सुपरस्टार अमिताभने त्याबाबत चकार शब्द उच्चारला नसला तरीही दुसर्‍या एका सुपरस्टारने मात्र राजेश खन्नाला खाडकन कानाखाली वाजवून कडक शब्दात समज दिली होती. हा सुपरस्टार होता मेहमूद.

त्या काळात मेहमूद हा हास्यकलाकार असला आणि त्याची चित्रपटात प्रमुख भूमिका नसली तरीही केवळ त्याचं काम पहायला सिनेमाला गर्दी होत असे. चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रिय मेहमूदचे चित्रपट सुपर डुपर हिट असत.

 

 

१९७९ साली मेहमूद निर्मित जनता हवालदारचं चित्रीकरण चालू होतं. या चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होता आणि त्याचं शुटींग मेहमूदच्याच फार्महाऊसवर चाललेलं होतं.

एके दिवशी मेहमूदचा मुलगा फार्महाऊसवर म्हणजेच सेटवर आला. आत आल्यावर समोरच राजेश खन्ना बसला होता. मेहमूदच्या मुलानं त्याला हाय केलं आणि तो आत निघून गेला. झालं, काकाचा पापड मोडला!

कारण तो सतत चाहत्यांच्या गराड्यात असे आणि लोकांनी त्याच्या मागे पुढे केलेलं, सर सर म्हणत त्याची दखल घेतलेलं त्याला खूपच आवडत असे. त्यामुळे मेहमूदच्या मुलानं केवळ फॉर्मली हाय म्हणून पुढे जाण्यानं त्याचा अहंकार दुखावला.

 

===

हे ही वाचा बाहेर येऊन पाहिलं तर तरुणींनी चुंबने घेऊन त्यांची कार गुलाबी करून टाकली होती

===

आधीच सेटवर उशिरा पोहोचण्याची सवय. त्यात हे कारण आलं. आता राजेश खन्ना सेटवर प्रचंड उशीर करु लागला. कधी कधी न सांगताच दांड्या मारू लागला. मेहमूदने बरेच दिवस हा प्रकार सहन केला.

अपरोक्षपणे राजेश खन्नाच्या कानावर त्याची नाराजी जाईल हेही पाहिलं मात्र राजेश खन्नावर याचा काहीही परिणाम झाला नाही.

अखेर एक दिवस मेहमूदचं स्वत:वरचं नियंत्रण सुटलं आणि सेटवर उशिरा पोहोचलेल्या राजेश खन्नाच्या सणसणीत कानाखाली मारून त्यानं सुनावलं, की राजेशची योग्य ती किंमत त्यानं त्याला दिलेली आहे त्यामुळे वेळेत सेटवर येऊन वेळेत चित्रीकरण पूर्ण करणं त्याचं कर्तव्य आहे.

 

 

इतकंच सुनावून मेहमूद थांबला नाही तर त्यानं त्याला एक जहाल वाक्यही सुनावलं, “सुपरस्टार होगा तू ते तेरे घर का”. अर्थात यानंतर राजेश खन्नानं चित्रपटाचं शुटींग गुणी बाळासारखं पूर्ण केलं.

मात्र शेरास सव्वाशेर कधी ना कधी गाठ पडते हे या घटनेनं दाखवून दिलं आणि काकाच्या नखर्‍यांना इंडस्ट्रीतल्या त्रासलेल्यांच्या वतीनं ही थप्पड त्याला बसली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version