' असं काय घडलं की वैतागलेल्या गब्बरने थेट सेटवरच म्हशी आणून बांधल्या… – InMarathi

असं काय घडलं की वैतागलेल्या गब्बरने थेट सेटवरच म्हशी आणून बांधल्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कलाकारांचे विविध मूड आणि त्यांच्या वागण्याचे एक से एक अतरंगी किस्से असतात. असाच एक भन्नाट किस्सा आहे गब्बर सिंग अमजद खानचा. एरवी अगदी गुणी बाळ असणार्‍या अमजदला एक व्यसन होतं आणि या व्यसनापायी घडलेला आहे हा भन्नाट किस्सा.

सिनेमा चाहत्यांमध्ये आपल्या मूळ नावापेक्षाही भूमिकेच्या नावानं कायम ओळखला गेलेला अमजद खान म्हणजेच गब्बर सिंग. अमजदच्या अमिताभबरोबरच्या दोस्तीचे किस्से तर इंडस्ट्रीत मशहूर आहेत.

पडद्यावर खुनशी खलनायक साकारणारा अमजद वास्तव आयुष्यात प्रचंड विनोदी माणूस होता. त्याच्या सहवासात असणारा प्रत्येकजण सतत हसत असायचा.

 

amjad khan inmarathi

===

हे ही वाचा – “शोले”बद्दल खूप चर्चा होतात – पण शोलेबद्दलच्या या पडद्यामागील १५ गोष्टी फार कमी जणांना माहिती असतील!

===

अमजद सेटवर असला की त्याच्या हजरजबाबीपणामुळे विनोदाची कारंजी उडत असत. या गब्बर सिंगला आणखी एका गोष्टीचं म्हणजे चहाचं प्रचंड व्यसन होतं. असं म्हणतात की दिवसभरात तो किमान तीस कप तरी चहा प्यायचा.

शुटिंग दरम्यान चहा नाही मिळाला तर तो बेचैन व्हायचा. येता जाता पाण्यासारखा तो चहा प्यायचा. त्याची ही सवय माहित असल्यानं सेटवर त्याच्यासाठी कायम चहाची सोय केलेली असायची. त्याला इतर कशाचंही नसेल इतकं चहाचं व्यसन होतं.

 

cutting tea cups inmarathi

 

एकदा अमजद पृथ्वी थिएटर्समध्ये एका नाटकाची तालीम करत होता. सवयीनुसार त्याने पहिल्या ब्रेकमधे चहा मागितला. हा चहा आला नाही. असंच दरवेळेस चहा मागितल्यावर होऊ लागल्यावर मात्र अमजद वैतागला. त्याचं तालमीत लक्ष लागेना. चहा न मिळण्याचं कारण त्याने विचारलं तर स्पॉट बॉयनं घाबरत सागितलं, की दूध संपलं असल्यामुळे चहा करता येत नाहीये.

दुसर्‍या दिवशी सेटवर तो एकटाच गेला नाही, तर सोबत दोन पाहुण्या घेऊन गेला. त्या दोघींना बघून सगळे थक्क झाले आणि नंतर हास्याचा फवाराच उसळला. कारण अमजद चक्क सेटवर म्हशी घेऊन गेला आणि चहावाल्याला तंबी दिली की चहा दिवसभर उकळत राहिला पाहिजे.

अमजद खान शोलेनंतर इतका प्रचंड लोकप्रिय झाला होता, की जाहिरातींसाठी त्याची मागणी वाढली होती.

 

gabbar singh inmarathi

 

ब्रिटानिया कंपनीने त्यांच्या ग्लुकोज बिस्किटांच्या जाहिरातीसाठी गब्बर म्हणजेच अमजदला निवडलं आणि जाहिरात जगतात खळबळ माजली. कारण पहिल्यांदा असं घडत होतं, की एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी चक्क खलनायकाला घेतलं जात होतं.

या जाहिरातीची पंचलाईन होती, ‘गब्बर की असली पसंद’. अर्थातच ही जाहिरात लोकप्रिय झाली. याचं कारण पडद्यावर जरी अमजद क्रूर खलनायक असला तरी वास्तव आयुष्यात मात्र त्याच्या अगदी उलट स्वभाव असणारा होता आणि त्याच्या चांगुलपणाचे किस्सेही प्रसिध्द होते.

===

हे ही वाचा – ४०० सिनेमांचा अनुभव गाठीशी असूनही सुरमा भोपाली लोकांसमोर यायला २५ वर्षे लागली

===

दिग्दर्शकाच्या मदतीला धावला अमजद खान

असाच एक किस्सा आहे त्यावेळेस नवख्या असलेल्या एका दिग्दर्शकाचा. झालं असं की त्या काळातल्या फॉर्म्युल्यानुसार मल्टिस्टारर सिनेमा बनत होता आणि त्यात अमजदही होता.

 

amjad khan 1 inmarathi

 

बडे बडे स्टार असणार्‍या या सिनेमाचा दिग्दर्शक मात्र अगदीच नवखा होता. सेटवर या बड्या स्टार्ससमोर त्याचं बिचार्‍याचं काही चालत नसे. ही मंडळी सेटवर शिफ्ट उलटून तासन तास झाले तरीही उगवायची नाहीत.

आल्यावर सुद्धा स्क्रिप्ट हातात घेऊन त्यात बदल करत बसायची. आपल्या सोयीचे सीन, संवाद लिहित बसायची. दिग्दर्शक बिचारा काही बोलू शकत नव्हता आणि सिनेमाचा बट्ट्याबोळ होताना त्याला पहावतही नव्हतं.

या सगळ्याचा मूक साक्षीदार अर्थातच अमजदही होता. बरेच दिवस असे गेल्यानंतर एक दिवस अमजदनं बघितलं, की दिग्दर्शक सेटवर एका कोपर्‍यात हताश होऊन बसला आहे. अमजद त्याच्याकडे गेला आणि त्याच्याशी बोलायला लागला. दिग्दर्शकानं सांगितलं, की तो हा सिनेमा सोडायच्या विचारात आहे कारण त्याचा कोणावरही काहीही कंट्रोल उरलेला नाही.

 

film director chair inmarathi

 

दिग्दर्शक गुणी होता आणि या कारणावरुन त्याने सिनेमा सोडावा असं अमजदला वाटत नव्हतं. त्यामुळे त्यानं एक प्लॅन केला. दुसर्‍या दिवशी सेटवर सगळ्यात उशिरा आला. दिग्दर्शक तयारीतच होता. आल्या आल्याचं त्याने सगळ्या युनिटसमोर अमजदवर राग काढून चांगली खरडपट्टी काढली.

अमजदनंही खाली मान घालून सगळं ऐकून घेतलं. जो त्यांच्या प्लॅनचाच भाग होता. आणि मग शेवटी माफी मागून पुन्हा असं घडणार नाही सांगितलं. हा लेकी बोले सुने लागे प्रकार चांगलाच लागू पडला. त्या दिवसानंतर कोणीही स्टार उशिरा आला नाही की स्क्रिप्टमधे बदल केले नाहीत.

===

हे ही वाचा – अभिनय नव्हे, पॅरालिसिसचा झटका! ‘डेडिकेशन’ कशाला म्हणतात ते दाखवणारा प्रसंग!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?