आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरूच आहे. विरोधी पक्ष मागील वर्षापासून चांगलाच आक्रमक झालेला दिसून येत आहे. कोरोनाचे संकट गेल्या वर्षभरापासून आपल्यावर ओढवलेले आहे मात्र अद्याप ते टळण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीये.
वर्षभरापासून महाविकास आघाडी ही आणि त्यांचे मंत्री कामापेक्षा वादाच्या भोवऱ्यात जास्त अडकलेले दिसून येत आहे. धनंजय मुंढे, संजय राठोड, अनिल देशमुख यासारख्या मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केले गेले.
एकीकडे शिवसेनेशी युती तुटल्याने विरोधी पक्ष शिवसेनना नेत्यांच्या मागे चांगलाच लागला. आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर केलेली ईडीची कारवाई तसेच शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे नेता म्हणजे संजय राऊत. त्यांच्या पत्नीवर देखील ईडीची कारवाई झाली होती.
हा वाद संपतो नाही तर पुन्हा एकदा संजय राऊत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. ह्यावेळचे कारण म्हणजे एका महिलेने हे आरोप केलेलं आहेत. संजय राऊत हे आपल्या मागे माणसे लावत आहेत, गेल्या आठ वर्षांपासून संजय राऊत आणि शिवसेना आम्हाला आणि आमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना त्रास देत आहेत. कोणतेही पोलीस स्टेशन आमची तक्रार घेत नाहीयेत.
असे आरोप एक पत्राद्वारे त्या महिलेने संजय राऊत यांच्यावर केलेले आहेत. भाजपच्या चित्र वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून या घटनेला वाचा फोडली आहे.
नेटकऱ्यांनी यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे असे दिसून येत आहे. संजय राऊत कायमच ट्रोलर्सच्या हाती सापडत असतात.
संजय राऊत कायम त्यांच्या विधानांमुळे अनेकदा विरोधकांच्या निशाण्यावर असतातच. त्याच्यातच एका महिलेने केलेले हे गंभीर आरोप लक्षात घेता विरोधक आणखीनच आक्रमक होतील.
===
हे ही वाचा – गोड गायिका मैथिली संजय राऊतांना भेटली आणि ट्विटरवर एकच हलकल्लोळ माजला…!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.