Site icon InMarathi

वापरलेल्या मास्कमधून उगवणार ऑक्सिजन देणारे झाड, भारतीयाची भन्नाट कल्पकता

eco friendly mask inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागच्या वर्षभरापासून आपण कोरोना नावाच्या एका अशा विषाणूसोबत लढतोय जो दिसत तर नाही मात्र त्याच्या प्रादुर्भावाचा वेग फार जास्त आहे. या कोरोनापासून वाचण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे मास्क घालणे.

 

 

कोरोनाने आपल्या आयुष्यात एन्ट्री केली आणि मास्कची मागणी वाढली. मास्क तयार होण्याचाही वेगापेक्षा अधिक जास्त वापरलेल्या मास्कचा फेकण्याचा वेग आहे.

 

 

या फेकलेल्या मास्कमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढण्यासोबतच कोरोना पसरण्याची देखील मोठी भीती निर्माण होत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेकांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडत आहे. अशावेळेस वापरलेल्या मास्कचाच वापर जर ऑक्सिजन वाढवण्यासाठी केला तर?

आता तुम्ही म्हणाल, मास्कचा वापर करून ऑक्सिजन कसा वाढवणार? याबद्द्ल बंगळुरूच्या एका माणसाने अतिशय सुंदर आणि विचारपूर्ण असे एक अनोखे मास्क तयार केले आहे. या मास्कच्या वापरानंतर तुम्ही जेव्हा ते फेकाल तेव्हा त्यातून एक झाड उगवणार आहे.

प्रदूषण रोखण्यासोबतच पर्यावरणाचे उत्तम संतुलन राखण्याची ही कल्पक आयडिया आली आहे नितीन वास यांना! कर्नाटकच्या बंगळुरूमधील पेपर सीड कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या नितीन वास यांनी एक अनोखा मास्क तयार केला आहे.

हा मास्क फेकून दिल्यानंतर त्यातून चक्क झाड उगवणार आहे. याबद्द्ल नितीन यांनी स्वतः माहिती दिली आहे. त्यांनी तयार केलेले मास्क हे पूर्णपणे इकोफ्रेंडली असल्याचे सांगितले आहे.

 

 

मास्कबद्दल अधिक माहिती देतांना नितीन सांगतात की, अशा प्रकारचे मास्क तयार करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यातूनच एक इकोफ्रेंडली कॉटनचे मास्क तयार झाले आहेत.

हे मास्क तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रॅप मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. या मास्कच्या बाहेरचा संपूर्ण भाग हा कॉटनच्या पल्‍पपासून तयार केला असून, मास्कच्या आतल्या बाजूला मऊ कॉटनच्या कपड्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा मास्क आपल्याला कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित ठेवतो.

 

 

हा मास्क लोकांना एकदाच वापरता येणार आहे. याची किंमत २५ रुपये असणार असून, या मास्कचा उपयोग झाला. की तो कुठेही न फेकता एक कुंडीत किंवा घराजवळील जमिनीत पुरावा लागेल. त्यानंतर काहीदिवस त्याला रोज पाणी घातल्यानंतर त्यातून एक रोप तयार होईल.

हे ही वाचा – मास्क वापरताना लोक या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेकांना संसर्ग होतोय…

 

हे पर्यावरणपूरक मास्क तयार करण्यासाठी नितीन आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आठ तासांचा कालावधी लागत आहे. मास्क तयार झाल्यानंतर तर पूर्णपणे कोरडे होण्यासाठी जवळपास १२ तास लागतात.

या मास्कमध्ये झाडांच्या बिया असल्याने या मास्कची साठवणूक केली जाऊ शकत नाही. त्यामुळे आता सध्या नितीन वास हे फक्त तीन हजार मास्कचे उत्पादन घेत आहेत. मात्र त्यांच्या या अनोख्या मास्कच्या संकल्पनेची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version