Site icon InMarathi

प्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारी ही तारीख का निवडली होती? वाचा

26 jan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण भारतीय उत्सवप्रिय माणसे आहोत, म्हणूनच इतर धार्मिक सणांप्रमाणे आपण राष्ट्रीय सण आणि उत्सव साजरे करतो. तसाच २६ जानेवारी- आपला प्रजासत्ताक दिन! आपल्या या राष्ट्रीय सणाचं महत्व प्रत्येक भारतीयाला माहित असल्याने एखाद्या पारंपरिक सणाप्रमाणेच हा दिवस साजरा केला जातो.

 

 

दिल्ली मध्ये तर या दिवशाची वेगळीच शान असते, पण भरतातील मुंबई, नागपुर, कोल्हापुर, जळगाव या शहरांमध्येही प्रजासत्ताक दिन वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. कुणी मिठाई वाटुन हा दिवस साजरा करतो, तर शाळा महाविद्यालयांमध्ये होणा-या कार्यक्रमातून देशाची नवी पिढी देशाचं कौतुक करते.

 

rockswallpaperhd.com

 

या दिवसाशी निगडीत आपल्या शाळेच्या दिवसाच्या खूप आठवणी असतात. आपण शाळेत झेंडावंदनासाठी पांढरा गणवेश, पांढरेशुभ्र शूज घालून जायचो, देशभक्तीपर गीतांवर नाच करायचो, समूहगीते म्हणायचो. काही उत्साही कार्यकर्ते भाषण द्यायचे.

सगळा कार्यक्रम झाला की शाळेतून तिळगुळाची वडी मिळायची. मग घरी आल्यावर टीव्हीवर आपण पंतप्रधानांचे लालकिल्ल्यावरचे झेंडावंदन आणि भाषण बघायचो.

 

 

मग २६ जानेवारीची राजपथावरील भव्य दिव्य परेड बघायचो. सेनेची अद्भुत प्रात्याक्षिके बघायचो. टीव्हीवर देशभक्तीपर चित्रपट आवर्जून दाखवला जायचा. तर एकूण २६ जानेवारी हा दिवस निदान लहानपणी तरी मस्त जायचा.

पण मोठे झाल्यावर मात्र आपण २६ जानेवारी ह्या दिवसाकडे एक सुट्टी ह्याच दृष्टीने बघतो. २६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन, ह्या दिवसापासून भारताची राज्यघटना अंमलात आली इतकेच आपल्याला माहित असते.

या सगळ्या उत्सवात आपण उत्साहाने सहभागी होतो, मात्र हा उत्सव नेमका याच दिवशी का साजरा केला जातो, या तारखेचं महत्व काय ही माहिती अनेकांना नसते.

पण २६ जानेवारी हि भारतासाठी एक ऐतिहासिक तारीख सुद्धा आहे हे देखील अनेकांना ठाऊक नसतं..

 

 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य तर मिळाले पण देशाचा कारभार अजूनही ब्रिटीशांच्याच नियमानुसार चालत होता. ह्या आधी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या भगत सिंग ह्यांनी १९२७ मध्येच कॉंग्रेसच्या अधिवेशनामध्ये वक्तव्य केले होते की

देशाला जर पूर्ण स्वराज्य हवे असेल तर देशाचे स्वत:चे संविधान असायला हवे.

भगत सिंग ह्यांचे हे विचार कॉंग्रेसचे युवा नेते नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनाही पटले.

म्हणूनच कॉंग्रेसने ब्रिटीश सरकार समोर पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि देशाचे संविधान लागू करण्याविषयी सूचना केली.

पण १९२८ मध्ये ब्रिटीश सरकारने हे अमान्य केले व ह्याचे कारण असे दिले की हिंदुस्थान हे सध्या स्वातंत्र्य मिळण्यायोग्य झाले नाही.

 

pinterest.com

 

१९२९ रोजी पंडित नेहरू यांना  कॉंग्रेसच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष घोषित करण्यात आले. तेव्हा त्यांनी परत पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि १९३० मधील जानेवारीच्या एका रविवारी लाहोरच्या रावी नदीच्या तटावर तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि योगायोगाने तो दिवस २६ जानेवारी हा होता.

हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्यदिनासारखा साजरा करण्यात आला.

 

india.com

यानंतर ब्रिटीशांची मनमानी आणि दुसरे महायुद्ध यामुळे भारताला स्वातंत्र्यासाठी जास्त काळ लढा द्यावा लागला आणि अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्याच्या मागणीसोबतच स्वाधीनतेची मागणी सुद्धा ब्रिटिशांनी मान्य केली आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान तयार झाले.

पण ते अंमलात कधीपासून आणायचे यावर नेत्यांची चर्चा झाली आणि त्यांच्या मनात २६ जानेवारी ही तारीख आली, कारण पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोरच्या अधिवेशनामध्ये लाहोरच्या रावी नदीच्या तटावर तिरंगा फडकवला होता तसेच तेव्हाच त्यांनी पूर्ण स्वराज्याची घोषणा सुद्धा केली होती.

 

goaprism.com

त्या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हाच दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडला आणि २६ जानेवारी १९५० पासून भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले.

यंदाचा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करुया, आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणा-या जवानांचे स्मरण करुया, सध्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करुया, मात्र या हा राष्ट्रीय उत्सव साजरा करताना या दिवसाचं महत्व जाणुन घेणंही तितकंच महत्वाचं आहे,

आपल्याला समजलेली ही माहिती अधिकाधिक भारतीयांपर्यंत पोहचणंही गरजेचं आहे हे विसरु नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version