Site icon InMarathi

केशव उपाध्येंनी दिलेल्या शुभेच्छांचा निखिल वागळेंकडून उर्मटपणे अव्हेर…!

nikhil wagle inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

निखिल वागळे हे नाव वादविवादात सापडलंय अशा घटना अनेकदा घडलेल्या पाहायला मिळतात. त्यांचे राजकीय विचार, ते राजकीय प्रपोगंडा करतात असे त्यांच्यावर आरोप होणं आणि अशा अनेक बाबींमध्ये हे नाव वादग्रस्त ठरत असतं.

पत्रकार निखिल वागळे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र आजचा दिवस सुद्धा निराळा ठरला नाही. आज सुद्धा निखिल वागले हे नाव वादात सापडलेलं पाहायला मिळालं. असं नेमकं काय घडलं, की आयुष्यातला हा खास दिवस सुद्धा त्यांच्यासाठी वादग्रस्त ठरला?

त्यांच्या या खास दिवसानिमित्त भाजपचे प्रवक्ते आणि वागळे यांचे वैचारिक विरोधक केशव उपाध्ये यांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्छांचा स्वीकार त्यांनी केला नाही. उलट त्यांच्या खास उर्मट शैलीत निखिल वागळे यांनी या शुभेच्छा अव्हेर केला.

 

 

अर्थात, हे प्रकरण इथवरच थांबलं नाही. या राजकीय आणि वैचारिक विरोधकांचा ट्विटरवरच कलगीतुरा सुरु झाला. निखिल वागळे आणि भाजपचा विरोध हे समीकरण आता जनतेसाठी नवीन राहिलेलं नाही. मात्र, या राजकीय आणि वैचारिक मतभेदाचा परिणाम थेट त्यांना मिळणाऱ्या शुभेच्छांवर सुद्धा कसा झाला आहे, ते या संभाषणातून दिसून येतंय.

चला मग बघूया, ट्विटरवर हा वादाचा फड नेमका कसा रंगला.

===

हे ही वाचा – लसीच्या किंमतीवर मत मांडणारा फरहान अख्तर होतोय ‘तुफान’ ट्रोल

===

 

निखिल वागळे यांचा वैचारिक आणि राजकीय विरोधक असा उल्लेख केशव उपाध्ये यांनी केला. असं असलं तरी ते वैयक्तिक शत्रू नाहीत, असं म्हणत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या ट्विटमधील ‘संवाद’ शब्दावर आक्षेप घेत वागळेंनी नेमकं काय म्हटलं आहे ते बघा.

 

 

संवाद हा ‘सभ्यपणेच’ होऊ शकतो असं म्हणत केशव उपाध्ये यांना वागळेंनी प्रत्युत्तर केलं. त्याआधी शुभेच्छा धन्यवाद द्यायला मात्र ते विसरले नाहीत. ‘खोटंनाटं पसरवणं’ असा शब्दप्रयोग आल्यानंतर यात राजकारण आलं नसतं तरच नवल.

 

 

भाजपच्या विरुद्ध मतं मांडणाऱ्या निखिल वागळेंना सुनावण्यासाठी केशव उपाध्ये यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते सतत करत असलेल्या टीकेचा उल्लेख केला.

वैचारिक विरोधकांचा सन्मान ठेवणं ही आमची संस्कृती असल्याचा उल्लेख या ट्विटमधून करत त्यांनी पुन्हा एकदा वागळेंना शुभेच्छा दिल्या.

 

 

इथे मात्र, आपला विरोध साधार असल्याच्या म्हणण्याला दुजरोरा देऊन, ‘उपचार म्हणून शुभेच्छा नकोत’ या शब्दांत वागळेंनी शुभेच्छा नाकारल्या. हे करत असताना, अपशब्द आणि कठोर शब्द यातला फरक ओळखा अशी सूचना सुद्धा केशव उपाध्ये यांना वागळेंनी दिली आहे.

 

 

‘आम्ही म्हणू तेच सत्य हा आपल्यासारख्यांचा खाक्या समाजाने कधीच फेकून दिलाय’ असं प्रत्युत्तर करत केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरील हा सामना सुरूच ठेवला.

===

हे ही वाचा – शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”

===

 

वागळेंनी आपल्या पुढील ट्विटमधून पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. मात्र, या ट्विटचा शेवट ‘असो’ या शब्दाने करून वागळेंनी हा सामना सुद्धा संपवला.

ट्विटरवरचं हे वाक्-युद्ध टी-२० सामन्याप्रमाणे पटकन संपलं. निखिल वागळेंची राजकीय विचारधारा, प्रपोगंडा या गोष्टींवर इथे अधिक भाष्य करायला नको, मात्र त्यांनी उर्मटपणे शुभेच्छांचा अव्हेर केलाय हे मात्र नाकारता येणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version