Site icon InMarathi

वेळेला चहा लागतो हे मान्यच पण ही गोष्ट देखील त्यासोबत करत जा….

tea final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोबाईल सोडला तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला काही आठवत असेल तर तो म्हणजे मस्त आल्याचा चहा. चहा आपल्या सगळ्यांना इतका जास्त प्रिय आहे की चहा घेतल्याशिवाय तर आपला दिवस सुरु होत नाही व काही लोकांची संध्याकाळही  होत नाही.

चहाची वेळ अर्ध्यातासाने जरी चुकली तरी आपण कासावीस होतो, चहाची चव अगदी तोंडात रेंगाळू लागते आणि कधी एकदाचा गरम गरम चहा पोटात जातोय असं व्हायला होतं. बरोबरही आहे.

गरमागरम वाफाळलेला चहाची मजाच काही और असते! पण तुम्ही चवीपलिकडे कधी गेला असाल तर तुम्हाला चहा प्यायल्यावर पोटात विचित्र उष्णता जाणवते का? किंवा चहा प्यायल्यावर ऍसिडिटीचा त्रास वाढल्याचं जाणवतं का? तुमचं उत्तर जर हो असेल तर हा लेख तुम्ही नक्की पूर्ण वाचला पाहिजे.

 

 

तुम्ही जर थोडं निरीक्षण केलं असेल तर पूर्वीची माणसं, जसे आपले आजी आजोबा, किंवा आई बाबा हे चहाचा कप हातात मिळताच पाण्याचा एक ग्लास सुद्धा मागायचे. आणि चहा पिण्याआधी पाणी प्यायलच गेलं पाहिजे असा काहीसा तेव्हाच नियमच होता. पण का प्यावं चहा घेण्याआधी पाणी, त्याचे फायदे काय आज आपण ते पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही ह्याहून पुढे कधीही नुसता चहा घेणार नाही, तर त्या आधी नक्की एक ग्लास भरून पाणी प्याल.

हे ही वाचा – चहा आणि बन मस्का – आजही जीभेवर रेंगाळणारी चव देणाऱ्या इराणी कॅफेचा इतिहास…

१) शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी –

तुम्हाला जर वाटत असेल की चहा आणि कॉफी हे सुद्धा प्येयच आहेत, त्यातही काही मात्रेत का होईना पाणी आहे, आणि ह्याने आपल्या शरीरातील पाण्याच्या पातळीला काही होणार नाही, ती व्यवस्थित मेंटेन केलेली राहील तर तसं नाहीये.

 

 

सकाळी सगळ्यात आधी चहा आणि कॉफी घेतल्याने शरीरातील हायड्रेशन लेव्हल कमी होते. त्यामुळे कधीही चहा घेण्यापूर्वी कमीत कमी 1 ग्लास पाणी प्यावे.

 

२) ऍसिडिटी वर नियंत्रण –

चहा हा ऍसिडीक असतो त्याचा pH 6 असून कॉफीचा pH 5 इतका असतो. त्यामुळे चहा घेतल्यावर पोटात उष्णता जाणवू लागते व छातीत जळजळहुन  ऍसिडिटी वाढलेली असते. पण पाण्याचा pH 7 असतो म्हणजे न्यूट्रल. त्यामुळे चहाच्या आधी पाणी प्यायल्याने पोटात एक बेस तयार होतो, ज्यामुळे चहा पोटात गेल्यावर ऍसिडिक होत नाही.

 

 

काही लोकांची चहा प्यायल्यानंतर पोटात उष्णता वाटण्याची आणि छातीत जळजळ होण्याची जी समस्या असते तिच्यावरचा एकमेव उपचार म्हणजे चहा घेण्यापूर्वी पाणी पिणे.

 

३) अल्सर होत नाही –

चहाच्या ऍसिडीक तत्वांमुळे पोटातील नाजूक त्वचेला इजा होते व तिथे अल्सर निर्माण होण्याचा धोका वाढतो. पण चहाच्या आधी पाणी प्यायल्याने ही ऍसिडिटी शमते व आपल्याला अल्सरचा त्रास होत नाही.

 

 

४) दातावर पिवळी परत तयार होण्यापासून बचाव –

चहात टॅनिन हे केमिकल अत्युच्च प्रमाणात आढळते. म्हणूनच म्हणतात चहा प्यायल्याने त्वचा काळवणते. तर ह्याच टॅनिनचा आपल्या दातांना डायरेक्ट स्पर्श झाला की ते दातांवर चिकटून बसते व अपल्या दातांवर एक पिवळी परत तयार होते जी दिसायला अजिबात चांगली वाटत नाही.

 

 

आपल्या पर्सनॅलिटीला डाउन करण्याचे काम ही परत करते. पण ह्यावरचा एक उपाय म्हणजे चहाच्या घेण्याच्या 15 मिनिटांपूर्वी 1 ग्लास पाणी पिणे. ह्याने तुमची दात पिवळे होण्याची समस्या कायमची संपेल.

 

५) साईड- इफेक्टस पासून बचाव –

चहाचे अनेक साईड -इफेक्टस पण असतात जसे अन्नातून मिळणारं लोह शरीराला शोषता येत नाही, अति चहा प्यायल्यामुळे मळमळ होते, प्रेग्नेंसी मध्ये कॉम्प्लिकेशन येतात, इत्यादी . पण तरीही आपण चहासाठी वेडे असतो. हेच सगळे साईड  इफेक्टस चहाच्या पूर्वी पाणी प्यायल्याने बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतात.

 

 

६) गॅसेस पासून सुटका –

काही लोकांना चहा घेतल्यानंतर प्रचंड गॅसेस होतात. ह्यामुळे त्यांचं पोट जड वाटू लागतं, भूक कमी होते, गॅसेस मुळे पोटदुखी सुद्धा होते. आवडीचा असूनही त्यालोकांना चहा सोडावा लागतो. पण तुम्ही चहा पिण्यापूर्वी १ ग्लास पाणी प्यायला तर तुमचा हा गॅसेस होण्याचा त्रास हळू हळू करून पूर्ण पणे नाहीसा होईल. त्यामुळे चहा घेण्याआधी १ ग्लास पाणी पिण्याची सवय आजपासूनच लावा.

 

हे ही वाचा – गल्लोगल्ली पाहायला मिळणाऱ्या ‘अमृततुल्य’ चहाचं मूळ महाराष्ट्रातील नाहीच!

आपल्या शरीरासाठी इतका उपयुक्त असूनही आपण हा सल्ला कधी ऐकला नाही कि मोठ्यांच अनुकरण केलं नाही. पण आता आपल्याला चहापूर्वी पाणी पिण्यामागची शास्त्रीय करणं माहिती आहेत. त्यामुळे आजच स्वतःला हि चांगली सवय लावून घ्या आणि गरम गरम चहाचा मनमुराद आनंद घ्या.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version