Site icon InMarathi

लसीच्या किंमतीवर मत मांडणारा फरहान अख्तर होतोय ‘तुफान’ ट्रोल

farahan final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मीडिया आणि ट्रोलिंग  हे आता काही नव राहिले नाही रोज कोण ना कोणतरी प्रसिद्ध व्यक्ती सोशल  मीडियावर ट्रोल होताना दिसून येते. खुद्द आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील अनेकवेळा फेसबुक लाईव्ह वरून ट्रोल केले जाते असते.

आपली मत परखडपणे  मांडताना लोक नक्की कशाप्रकारे अर्थ काढता येईल सांगता येत नाही. त्यामुळे अनेक कलाकारांनी सोशल मीडियाला राम राम  ठोकला आहे. कलाकार हे तर ट्रोलर्सचे  टार्गेट्स असतातच एकीकडे देशात वाढणारांना कोरोना तर दुसरीकडे कलाकारांचे मालदीव व्हेकेशनचे फोटो यावरून कलाकरांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

देशात सध्या एकमेव चर्चेचा विषय म्हणजे लसीकरण. लसीकरणला सुरवात झाल्यापासून समाजमाध्यमात विविध चर्चा होताना दिसून येतात. सुरवातीला अनेक जण लस घेण्यासाठी घाबरत होते. पण दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी लस घेतली, सिरम इन्स्टिटयूटचे मुख्य अदर पुनावाला तसेच आपले मुख्यमंत्री यांनी देखील लस घेतली आहे.

 

 

सध्या अनेक जण लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची वाट बघत आहेत. एकावेळी अनेकजण लस घेत असल्याने लशींचा साठा कमी पडत आहे. तर दुसरीकडे लसीची होणारी निर्यात यावरून पंतप्रधानांवर देखील टीका होत आहे.

तरुणाईचे प्रश्न, त्यांचं भावविश्व् मांडणारा कलाकार म्हणजे फरहान अख्तर, मधून मधून त्याला ही ट्रोल करण्यात येते. सध्या त्याच्या एका ट्विटमुळे तो चांगलाच ट्रोल होत आहे. नेमके काय ट्विट त्याने केलं आहे बघुयात

अदर पुनावाला यांनी घोषित केले की लसीचे दर हे सरकारी हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल यामध्ये फरक असेल त्यासंदर्भात फरहानने मांडलेले हे मत :

 

 

हे ही वाचा – ‘‘माझे वजन हा राष्ट्रीय मुद्दा झाला होता”, उलाला गर्ल विद्या उखडली ट्रोलर्सवर

 

 

बार मध्ये बसल्या बसल्या १००० दारू पिता १००० तिकीट काढता तुम्हाला ४०० नाही परवडत, असा थेट सवालच ट्रोलर्सने  केला आहे.

 

 

बाहेरच्या लसीसाठी आपण हजारो रुपये देणारच  मग आपल्या लसीला ४०० रुपये नाही देऊ शकत?  असे बहुदा त्यांचे म्हणणे असावे.

 

 

जावेद अख्तरचं मुलगा आहे, ह्यावरून  देखील ट्रोल केले जात आहे.

 

 

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या किंमतीत  होणाऱ्या दुजाभावावरून  सिरम इस्न्टिट्यूटचे मालक आदर पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्या  ही प्रकारचा भेदभाव केला जात नाहीये. दोघांना ४०० रुपये द्यावे लागतील अशी माहिती त्यांनी सीएनबीसी टीव्हीला  दिली आहे.

सोशल मिडिया हे माध्यम न संपणारे आहे. इथे चर्चा न होता कायमच एखाद्या मुद्द्यवरून वाद होताना दिसून येतो. प्रत्येकाला आपापली मते असतात , जो तो ती मांडतो त्यावर  होणारे वाद वाढवावेत  की टाळावेत हे ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर आहे.

===

हे ही वाचा – ‘मामी जोमात, ट्रोलर्स कोमात’ : अमृता फडणवीसांचं ट्रोलर्सना खुलं आव्हान

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version