Site icon InMarathi

बख्तियार खिलजीची ‘भारतीय’ असूया आणि नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी!

khilji nalanda inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नालंदा विद्यापीठाबद्दल तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठ हे जगातील ज्ञानाचे केंद्र होते. जगभरातील विद्यार्थी या विद्यापीठामध्ये येऊन शिक्षण घेत होते. कोरिया, जपान, चीन, तिबेट, तुर्कीस्तान मधील ज्ञानवंत शिक्षक देखील या विद्यापीठाला लाभले होते.

संपूर्ण जगभरात केवळ नालंदा विद्यापीठाचा डंका होता. परंतु बख्तियार खिलजी नावाच्या एका वेड्या सुलतानाने ज्ञानाची ही नगरी जाळून उध्वस्त केली.

यामुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे भयंकर नुकसान झाले सोबतच अतिशय मौल्यवान, दुर्मिळ ग्रंथ संपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि येणाऱ्या पिढ्या त्या पुस्तकातील ज्ञानापासून वंचित राहिल्या.

 

culturalindia.net

 

नालंदा विद्यापीठ केवळ खिलजी ने उध्वस्त केले असे नाही. त्या अगोदर दोन वेळा हे कृत्य झाले होते. स्कंदगुप्ताच्या काळात मिहीरकुलाने नालंदा विद्यापीठावर हल्ला चढवून ते उध्वस्त केले होते.

पण त्या नंतर स्कंदगुप्ताच्या वंशजांनी पुन्हा एकदा उभारले, ते देखील पूर्वी पेक्षा अधिक विशाल! पण त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गौडा राज्यकर्त्यांनी नालंदा विद्यापीठाची वाताहत केली, यावेळी बौद्ध राजा हर्षवर्धन याने विद्यापीठाचे पुन्हा एकदा निर्माण केले.

आणि तिसऱ्यांदा तुर्की सुलतान बख्तियार खिलजीने ११९३ साली नालंदा विद्यापीठाची राख केली ती कायमची, त्या नंतर नालंदा विद्यापीठ आजतागायत पुन्हा कधीही उभे राहू शकले नाही.

चला जाऊन घेऊया या अग्नीकृत्यामागचा बख्तियार खिलजीचा हेतू!

 

magnificentbihar.com

 

पूर्वी भारत म्हणजे सोन्याने-संपत्तीने मढलेला देश म्हणून सर्वदूर प्रचलित होता. त्यामुळे परकीय नेहमीच आपल्या देशावर आक्रमण करून लुटी करायचे. तसेच आपला प्रदेश देखील बळकवायचे. याच परकीय शत्रुंपैकी एक होता इख्तियारुद्दीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी!

त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये त्याचा दबदबा होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. या कालखंडात नालंदा विद्यापीठ राजगिर चे उपनगर होते.

या विद्यापीठामध्ये जगभरातून आलेले १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि त्यांना देशोविदोशीचे २००० शिक्षक शिकवीत होते.

एकदा बख्तियार खिलजी खूप आजारी पडला. कोणत्याच औषधाने त्याला गुण येईना. तेव्हा कोणीतरी त्याला नालंदा विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे प्रमुख राहुल श्रीभद्र यांच्याकडून इलाज करवून घेण्याचा सल्ला दिला.

 

alchetron.com

 

पण खिलजीला एखाद्या हिंदू वैद्यांपेक्षा आपल्या हकीमांवर जास्त विश्वास होता. एखाद्या हिंदू वैद्याकडून इलाज करवून घेणे त्याला अपमानकारक वाटत होते. पण हकीमांना काही त्याची तब्येत सुधारण्यात यश मिळत नव्हते, शेवटी नाईलाजाने खिलजीने राहुल श्रीभद्र यांना आपल्या उपचारासाठी बोलावून घेतले.

 

omnamahashivaya.com

 

पण त्यान राहुल श्रीभद्र यांच्यापुढे एक अट ठेवली ती म्हणजे,

मी कोणतेही भारतीय बनावटीचे औषध घेणार नाही आणि जर मी बरा झालो नाही तर तुम्हाला मृत्युदंड देण्यात येईल.

ही अट ऐकून राहुल श्रीभद्र विचारात पडले, पण त्यांनी खिलजीचे म्हणणे मान्य केलं. काही दिवसांनी ते खिलजी जवळ आले, त्यांनी त्याच्या हातात कुरण दिले आणि सांगितले की,

यातील ठराविक पाने वाचली की त्याच्या प्रकृतीमध्ये फरक पडेल.

आणि आश्चर्य! खिलजीच्या प्रकृतीमध्ये फरक पडू लागला. खरंतर हा कोणताही चमत्कार नव्हता. जी जी पाने राहुल श्रीभद्र यांनी खिलजीला वाचायला सांगितली होती, त्या पानांवर त्यांनी औषधाचा लेप लावला होता, ज्यामुळे बोटाला थुकी लावून खिलजी जेव्हा पान उलटायचा, तेव्हा ते औषध मुखावाटे त्याच्या पोटात जायचं.

खिलजी हळूहळू पूर्ण बरा झाला, पण राहुल श्रीभद्र यांचे उपकार मात्र तो साफ विसरला. एखाद्या भारतीय वैद्याने मला बरे करावे ही भावना त्याच्या अंगाचा तिळपापड करू लागली.

आपले हकीम हिंदू वैद्यांपेक्षा श्रेष्ठ ठरले नाहीत हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना, म्हणून त्याने रागाने संपूर्ण नालंदा विद्यापीठच उध्वस्त करून टाकण्याचे ठरवले. त्याने आपल्या सैनिकांना विद्यापीठाला आग लावून देण्याचा हुकुम सोडला.

 

aniccasight.blogspot.in

 

असं म्हणतात की विद्यापीठामध्ये इतकी पुस्तके होती की आग जवळपास ३ महिने सतत धुमसत होती. एवढं करूनही खिलजीचं मन शांत झालं नाही. ह्या क्रूरकर्म्याने नालंदा विद्यापीठातील हजारो धार्मिक नेत्यांची आणि बौद्ध भिक्षूंची हत्या केली.

अश्याप्रकारे क्रूर बख्तियार खिलजीने केवळ असूयेपोटी, भारतीय आयुर्वेदाला, हिंदू-बौद्ध तत्वज्ञानाला जगातून हद्दपार करण्यासाठी नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी केली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version