Site icon InMarathi

‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ थेट अमिताभला झापणारे नितीन गडकरी…

nitin gadkari amitabh bachchan inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नितिन गडकरी आज केंद्रीय मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचा घटक आहेत. एक शांत, अभ्यासू आणि उत्कृष्ट राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असणारे गडकरीजी यांचं नाव कधीही कुठल्या वादात पुढे आल्याचं सहसा दिसत नाही.

विविध पक्षांमधील राजकारण्यांशी वैचारिक मतभेद असले, तरीही कुणाशी कधी वैयक्तिक पातळीवर वादंग झालेत, त्यात नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश आहे असं कधी सहसा घडत नाही.

 

 

देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आपसूकच नितीन गडकरी यांचं नाव घेतलं जातं. याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे त्यांनी सातत्याने केलेली उत्तम कामं!

आजही भारताचे परिवहन मंत्री म्हणून ते उत्तम काम करत आहेत. काही वर्षांतच भारतातील रस्ते अमेरिका आणि युरोपमधील रस्त्यांसारखे दिसू लागतील असं वक्तव्य मध्यंतरी नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यावेळी सुद्धा त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

===

हे ही वाचा – अंबानींचं महागडं कंत्राट नाकारून गडकरींनी कमी खर्चात एक्सप्रेसवे बांधून दाखवला

===

आपल्या कामातून आपली छाप पाडणारे गडकरी बोलण्याच्या बाबतीत मात्र अत्यंत शांत स्वभावाचे आहेत. जन्म नागपूरमधला असला, तरी नागपुरी खाक्या दाखवणं हा त्यांचा स्वभाव नाही, असं म्हणणं अजिबातच चुकीचं ठरणार नाही.

मग असं  काय घडलं की चक्क नितीन गडकरी, बिग बी अमिताभ बच्चन यांना ‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ असं म्हणाले?

 

 

का केला होता फोन?

ही गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील. तेव्हा शिवसेना-भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्त्वात होतं. नितीन गडकरी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री होते. त्यांच्या या कार्यकालात, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसह ५५ प्रशस्त उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात आली.

अमिताभ बच्चन यांनी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास केला, त्यावेळी ते फारच समाधानी झाले. या कामाचं कौतुक करण्यासाठी, त्यांनी नितीन गडकरी यांना फोन करण्याचं ठरवलं.

गडकरी त्यांच्या कामात व्यस्त असताना अचानक त्यांना फोन आला. फोन उचलल्यावर त्यांनी ‘कौन बोल रहा हैं?’ असा प्रश्न केला. समोरून ‘अमिताभ बच्चन’ असं नाव ऐकून मात्र ते वैतागले. ‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ असं म्हणत त्यांनी फोन बंद केला.

गडकरी यांचा असा समज झाला होता, की कुणीतरी गंमत करण्यासाठी त्यांना फोन केला आहे. अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते असणाऱ्या नितीन गडकरी यांना हे अपेक्षितच नव्हतं, की त्यांना खुद्द बिग बी यांचा फोन येईल.

अमिताभ यांना मात्र गडकरींजीचं कौतुक करायचं होतं. मुंबईत-पुणे एक्सप्रेसवेमधील त्यांच्या प्रवासाचा त्यांचा अनुभव कथन करायचा होता.

 

 

अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा त्यांना फोन लावला. यावेळी त्यांनी फोनच्या सुरुवातीलाच, आपण खरोखरंच अमिताभ बोलत असल्याचं गडकरी यांना सांगितलं.

===

हे ही वाचा – अमिताभ बच्चन यांचं वेगळेपण नेमकं रेखाटणारा अप्रतिम लेख!

===

फोनवर काय झालं बोलणं?

पुन्हा फोन आल्यानंतर नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम अमिताभ यांची माफी मागितली. कुणीतरी मस्करी करत असल्याचं वाटल्याने त्यांनी तसे उद्गार काढल्याची कबुली दिली.

‘बिग बी’ यांचा फोन आलाय म्हटल्यावर, त्यांच्या या चाहत्याने त्यांची तारीफ करण्याची संधी सोडली नाही. त्यांचा ‘आनंद’ हा चित्रपट ५ वेळा, तर ‘दिवार’ आणि ‘जंजीर’ हे चित्रपट ३-४ वेळा पहिले असल्याचं गडकरी यांनी त्यांना सांगितलं.

एक चाहता त्यांच्या चित्रपटांची तारीफ करत असताना, अमिताभ यांच्या मनात मात्र वेगळ्याच गोष्टीचा आनंद होता. 

 

 

ते गडकरी यांना म्हणाले, की आमचे चित्रपट ५-६ महिने लोकांच्या लक्षात राहतात. एखाद्या चित्रपटाचं संगीत सुद्धा उत्तम जमून आलं असेल, तर वर्षभर या चित्रपटाची चर्चा होते. मात्र तुम्ही आज हा उत्तम एक्सप्रेसवे आणि अनेक उड्डाणपूल बांधले आहेत, त्याचं महत्त्व अधिक आहे.

‘आम्ही मुंबईकर आहोत, तुमचे हे काम आम्ही कधीही विसरू शकणार नाही.’ असं म्हणत अमिताभ यांनी मोठ्या मनानं गडकरी यांचं कौतुक केलं.

नितीन गडकरी यांच्या उत्कृष्ट कामाला अमिताभ बच्चन यांनी दिलेली ही मोठी पोचपावती म्हणावी लागेल… अशीच चांगली कामगिरी त्यांच्याकडून होत राहो आणि भारतीय रस्ते आणि वाहतूक यांची भरभराट होत राहो अशी अपेक्षा करूयात…

 

===

हे ही वाचा – गडकरींना भाजपच्या सर्वोच्च स्थानी पोचवण्याच्या मागणीमागे त्यांचं “हे” कर्तृत्व आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version