' हिंदू धर्मद्वेष्ट्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही या मंदिरातल्या बाप्पाला धक्का लावू शकले नाहीत! – InMarathi

हिंदू धर्मद्वेष्ट्यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही या मंदिरातल्या बाप्पाला धक्का लावू शकले नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतात अनेक प्रकारची मंदिरे आहेत. काही काही मंदिरे १००० – २००० वर्ष पुरातन आहेत. बऱ्याच मंदिरांमधून त्या काळातले जीवन कसं होतं याचं दर्शन घडतं. अनेक मंदिरांच्या अनेक कहाण्या देखील आहेत.

काही ठिकाणी निसर्गाच्या प्रकोपाने तर कधी लोकांकडून झालेल्या दुर्लक्षाने मंदिरे नष्ट झाली. तर काही काही मंदिरे भारतावर झालेल्या आक्रमणांमुळे उद्ध्वस्तही झाली आहेत. त्याबरोबरच आपला असलेला ऐतिहासिक वारसा नष्ट झाला आहे.

 

temples inmarathi 2

 

दक्षिण भारत आणि दक्षिणेतील मंदिरं तशी परकीय आक्रमणापासून बऱ्याच प्रमाणात वाचली. म्हणून अनेक पुरातन मंदिरे अजूनही तिथे व्यवस्थित आहेत, जी आपल्या भारताच्या वैभवशाली परंपरेची साक्षीदार आहेत.

परंतु जी मंदिरे राहिली त्यातील काहींच्या कहाण्या मात्र खूपच रंजक आहेत. अशाच एका मंदिराची ही गोष्ट आहे. हे मंदिर आहे पाँडिचेरीतील विघ्नहर्त्या गणेशाचे. त्या मंदिराचं नाव आहे मनाकुला विनयगार.

तसं हे मंदिर पाचशे वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे. सतराव्या शतकात भारतात इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच या युरोपियन लोकांनी प्रवेश केला. त्यापैकी फ्रेंच लोक हे समुद्रामार्गे पाँडेचेरीत आले आणि हळूहळू फ्रेंचांनी तिकडे आपला जम बसवायला सुरुवात केली.

===

हे ही वाचा भगवान विष्णूचे ‘सर्वात मोठे मंदिर’ आहे भारताबाहेर, त्याचा रंजक इतिहास ठाऊक आहे का?

===

आता हे जे मंदिर आहे ‘मनाकुला विनायागार’ हे पाँडिचेरीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. मंदिर परिसर तसा बराच मोठा आहे. फ्रेंचाना त्याजागी त्यांच्यासाठी उपयुक्त काहीतरी बांधायचे होते पण ते मंदिर त्याच्या मध्ये येत होते.

 

manakula temple inmarathi

 

मग फ्रेंचांनी ते मंदिर नष्ट करायचं ठरवलं. पहिल्यांदा त्यांनी जाणलं की, मंदिरातील मुख्य मूर्ती जर मंदिरात नसेल तर त्या मंदिराला काहीही अर्थ राहणार नाही. म्हणून त्यांनी ती गणेश मूर्ती उचलून समुद्रात टाकली. पण ती मूर्ती परत आपल्या जागेवर बसलेली त्यांना दिसली. त्यांना कळेना की हा काय चमत्कार आहे.

त्यांनी अनेक वेळा ती मूर्ती उचलून समुद्रात फेकली पण प्रत्येक वेळेस ती मूर्ती आपल्या जागेवरच दिसायची. शेवटी कंटाळून फ्रेंचांनी ते गणेश मंदिर नष्ट करायचा इरादा सोडला आणि मंदिर आहे त्या अवस्थेत ठेवले.

आजही ते मंदिर तसेच आहे, जसे ते बांधले होते. फ्रेंचांनी मंदिरातील इतर कोणत्याही मूर्तींना धोका पोचवला नाही किंवा त्यांचा विध्वंस केला नाही, पण दररोजच्या पूजेत विघ्न आणण्याचा मात्र प्रयत्न केला. परंतु फ्रेंचांचे कोणतेच प्रयत्न त्या मंदिरात चालले नाहीत. तिथे दररोजची पूजा आरती होतच होती आणि सगळ्या मूर्तीदेखील व्यवस्थित होत्या.

 

ganpati temple inmarathi

 

हे मंदिर आठ हजार स्क्वेअर फूट जागेत आहे. मंदिरांच्या भिंतीवर गणेशाच्या जीवनातील जन्मापासून विवाहापर्यंतची दृश्य चित्रीत केली आहेत.

गणेशाच्या आयुष्यातील गोष्टी त्या शिल्पचित्रांमधून समजतात. गणेशाची सोळा रूपे तिथल्या भिंतींवरती चित्रित आहे. मंदिरातील मुख्य गणपती मूर्ती शिवाय इतर अठ्ठावन्न गणपतीमूर्ती मंदिरात आहेत.

या मंदिराचं मुख् हे समुद्राकडे आहे. म्हणून या गणपतीला पूर्वी भुवनेश्वर असं म्हटलं जायचं. पण आता मात्र त्याचं नाव ‘ मनाकुला विनायागर’ असं आहे. याचं कारण म्हणजे तमिळमध्ये ‘ मनल’ म्हणजे वाळू आणि ‘ कुलन ‘ म्हणजे सरोवर.

विनयागार म्हणजे विनायक/ गणपती. या मंदिराच्या आसपास प्रचंड प्रमाणात वाळू आहे म्हणजे वाळूचा सरोवरच म्हणा ना! म्हणूनच या वाळूच्या सरोवरातील गणपतीला आता मनाकुला विनयागार म्हटलं जातं.

 

temple inmarathi

 

या मंदिरातील गर्भगृह हा सुवर्णजडित आहे. याशिवाय गणपतीच्या अनेक प्रतिमा तिथे आहेत. मंदिराचा एक भव्य असा रथ देखील आहे, जो दहा फूट उंच आहे. रथ तयार करतानादेखील साडेसात किलो सोनं वापरण्यात आलं आहे.

===

हे ही वाचा हवामान खातंही अचंबित…!! मंदिर अचूकरित्या वर्तवते पावसाचा अंदाज…

===

दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी गणपती या रथात बसून आपल्या प्रजेचे कुशल विचारण्यासाठी बाहेर पडतात. म्हणजेच त्या दिवशी विजयोत्सव साजरा केला जातो. जो चोवीस दिवस चालतो. या विजयोत्सवाला तिथे ‘ ब्रह्मोत्सव ‘ असं म्हणतात. त्यावेळेस सकाळी आणि संध्याकाळी भक्तांना बाप्पांचे दर्शन घेता येते.

साधारण तीनशे वर्षांपूर्वी एक तामिळ संत थोलयकात्तू सिद्धर यांनी या मंदिरात समाधी घेतली. त्यांच देखील एक छोटसं मंदिर त्या मंदिरात आहे.

परिसरात जन्मलेल्या नवजात बालकांना पहिल्यांदा या गणेश मंदिरात आणून बाप्पांच्या चरणावर ठेवलं जातं. त्यानंतरच त्याला बाहेरच्या जगाची ओळख होते. दक्षिणेतील इतर मंदिराप्रमाणे या मंदिरातही मंदिर प्रशासनाचा एक हत्ती आहे. त्याचेही दर्शन अनेक भक्तजन घेत असतात.

 

elephant inmarathi

 

मंदिराच्या आसपास समुद्र असून देखील मंदिरामध्ये एक गोड्या पाण्याची विहीर आहे, हे एक आश्चर्यच मानले जाते. त्यामुळे तिथे येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय होते.

चांगल्या सुस्थितीतील हे गणेश मंदिर बघायला एकदा तरी जायला हवं. तिथल्या मूर्ती आणि मुर्तींवरची कलाकुसर बघायला हवी. गणपतीच्या आयुष्यातील नेमक्या कोणत्या गोष्टी तिथे सांगितल्या आहेत हे देखील माहीत करून घ्यायला हव्या.

परदेशात चर्चमध्ये देखील येशूच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रे रेखाटलेली असतात. त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचे चित्रीकरण तेथे असते. त्यांच्याही अशा अनेक कथा अस्तित्वात आहेत आणि ते लोक तो त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणूनच त्याकडे पाहतात आणि त्याचं जतन करतात.

आपल्याकडे तर त्याच्याहीपेक्षा जास्त भव्यदिव्य, तोंडात बोट घालायला लावावी इतकी आश्चर्यचकित करणाऱ्या इमारती, मंदिरे त्यावरील कलाकुसर आहे. अनेक चित्रशिल्पांमध्ये तर प्रचंड बारकावे देखील चित्रित असतात. मोठ-मोठे गड किल्ले आहेत.

 

temples in india inmarathi

 

त्यांचं नुकसान होऊ नये किंवा इतरांनीही करू नये, याची काळजी आपणच घ्यायला हवी. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे, नाही का!?

===

हे ही वाचा ना सोनं-नाणं, ना अन्नदान…चक्क ‘दगड’ देऊन या मंदिरात नवस फेडला जातो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?