Site icon InMarathi

दिवसातून दोनवेळा अदृश्य होतं हे महादेवांचं मंदिर… वाचा यामागची रहस्यकथा…

stam final 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतात अनेक शिवमंदिरं आहेत. काही उंच पर्वतांवर जाण्यास कठीण अशा ठिकाणी तर काही बर्फाच्या कुशीत. मात्र एक मंदिर असंही आहे जे दिवसातून दोनदा गायब होतं आणि मग आपोआप प्रकटही होतं.

भारतातील विविध देवतांची मदिरं हा जगभरातल्या पर्यटकांच्या कुतुहलाचा विषय आहे. याचं कारण म्हणजे या देवळांचं स्थापत्य शास्त्र आणि त्या त्या देवळांशी असलेल्या पुराण कथा.

 

हे ही वाचा – ना सोनं-नाणं, ना अन्नदान…चक्क ‘दगड’ देऊन या मंदिरात नवस फेडला जातो!

आजवर तुम्ही अनेक प्राचिक शिवमंदिरांच्या कथा ऐकल्या असतील  मात्र एक शिवमंदिर असं आहे, जे दिवसातून दोनदा आपोआप गायबही होतं आणि आपोआप प्रकटही होतं. गुजरातमधे असणारं हे मंदिर जगभरातल्या भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं ठिकाणं आहे.

गुजरातचं स्तंभेश्र्वर महादेव मंदिर जगभरात त्याच्या गायब होण्यामुळे प्रसिध्द आहे. भक्तांना दर्श दिल्यानंतर दिवसातून दोनदा हे मंदिर समुद्राच्या कुशीत विसावतं आणि विश्रांती पूर्ण झाली की पुन्हा प्रकट होतं. हा चमत्कार  कोणताही दैवी चमत्कार नसून निसर्गाची किमया आहे.

गुजरातच्या वडोदराजवळच्या कावी-कंबोई गावात हे मंदिर असून अरबी समुद्रामधे असणार्‍या कैम्बे तटावर आहे. हे मंदिर सकाळी आणि संध्याकाळीच प्रकट होतं. भक्तांना दर्शन दिल्यावर ते समुद्रात लुप्त होतं. असं म्हणतात की हे मंदिर कोणाच्यातरी प्रायश्चित्ताचं प्रतिक आहे. शिवपुराणातही या मंदिराचा उल्लेख आढळतो.

 

 

स्कंदपुराणातील कथेनुसार ताडकासूर नावाच्या एका शिवभक्त आसुरानं आपल्या तपश्चर्येनं भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं. प्रसन्न झालेल्या महादेवानं या आसुराला मनोवांछित वरदान दिलं होतं.

या वरदानानुसार ताडकासुराला सिव पूत्राशिवाय कोणिही मारू शकणार नव्हतं. तसेच या शिवपूत्राचं आयुष्य केवळ सहा दिवसांचं असायला हवं.

हे वरदान प्राप्त केल्यानंतर ताडकासूरानं तिनही लोकांत हाहाकार माजवला. त्याच्या त्रासाला वैतागलेले ऋषी मुनी आणि देव भगवान शंकरांकाडे आले आणि त्यांना साकडं घालून ताडकासुराचा बंदोबस्त करण्याची विनंती केली.

भगवान महादेवांनी सर्वांना अश्वस्त केलं आणि त्यानंतर सहा दिवसांनी शिव-शक्तीच्या चेतनेतून श्र्वेत पर्वत कुंडातून कार्तिकेयाचा जन्म झाला.

 

 

सहा मेंदू, चार डोळे आणि बारा हातांच्या सहा दिवसांच्या कार्तिकेयानं ताडकासुराचा वध केला मात्र नंतर त्याला समजलं की ताडकासूर शिवभक्त होता. हे समजल्यावर त्याला खूप लाजिरवाणं वाटू लागलं. आपल्या हातून अपराध झाल्याच्या जाणीवेची बोच लागली.

पश्चत्तापदग्द कार्तिकेय भगवान विष्णूंकडे गेले आणि आपल्या कृत्याबद्दलचं प्रायश्चित्त मागितलं. भगवान विष्णूंनी त्याला जिथे ताडकासूराला मारलं त्या ठिकाणी शिवमंदिर बांधायला सांगितलं.

 

 

कार्तिकेयाने विष्णूंच्या आदेशानुसार तसंच केलं आणि सर्व देवतांनी मिळून महिसागर संगम तीर्थावर विश्र्वनंदक स्तंभाची स्थापना केली. यालाच आज स्तंभेश्र्वर नावानं ओळखलं जातं. असं म्हणतात की कार्तिकेय रोज भगवान शंकराला दोनदा अभिषेक करून आपलं प्रायश्चित्त करतो. याचसाठी मंदिर दोनदा पाण्याखाली जातं.

अशा रितिनं कार्तिकेयानं या ठिकाणी शिवमंदिर बांधलं ज्याला कालांतरानं स्तंभेश्र्वर हे नाव पडलं. हे मंदिर भरतीच्यावेळेस रोज समुद्रात जातं आणि भरती ओसरली की पुन्हा माफीसाठी प्रकट होतं. स्तंभेश्रवर मंदिरात दर अमावस्या आणि शिवरात्रीला जत्रा भरते.

या ठिकाणाचं पर्यटनाच्या दृष्टीने खास महत्व म्हणजे याठिकाणी साबरमती नदी सागराला येऊन मिळते. हा संगम बघायला लाखोंच्या संख्येनं पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात.

===

हे ही वाचा – अनेक तास देवदर्शनासाठी रांगेत उभे राहणारे भाविक मात्र ‘या’ मंदिरात जायला घाबरतात

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version