Site icon InMarathi

‘कुंभमेळा अकबराने सुरु केला’… असीम सरोदे यांचा हास्यास्पद दावा! ट्विटरवर झाले ट्रोल

kumbhmela inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कुंभमेळा आणि त्यात झालेली गर्दी, कोरोना संक्रमित झालेले भक्त या सगळ्यांमुळे सध्या कुंभची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेच. मात्र सध्या  आणखी एका कारणामुळे कुंभमेळा ट्विटरवर चर्चेत असल्याचं दिसून आलंय.

हे कारण म्हणजे वकील असीम सरोदे यांनी लावलेला जावईशोध…!!

कुंभमेळ्याची सुरुवात अकबराने केली असल्याचा नवा शोध असीम यांनी लावला. त्यांच्या ट्विटमध्ये ते नेमकं काय म्हणाले ते बघा…

 

 

कुंभमेळ्यातील स्नानाला शाही स्नान म्हटलं जाण्याचं एक निराळंच कारण असीम यांनी त्यांच्या ट्विटमधून मांडलं. अर्थातच, यावर प्रामाम्नायत मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आणि अखेर वकीलसाहेबांनी हे ट्विट डिलीट केलं.

कुठीलीही संधी सोडतील, तर ते नेटकरी कुठले? ट्विट डिलीट झालं असल्याचं लक्षात येताच, नेटकऱ्यांनी त्यांच्या स्क्रीनशॉट्सचा खजिना बाहेर  काढला आणि असीम सरोदे यांच्यावर ‘शाही’ हल्ला चढवला.

चला तर मग बघुयात नेटकरी नेमकी काय म्हणालेत ते…

 

 

यशोधरा यांनी ट्विट डिलीट केल्याबद्दल थेट जाब विचारला. हा जाब विचारताना सुद्धा त्यांनी उत्तम शाब्दिक कोटी केल्याचं बघायला मिळतंय. असीम यांच्या नावाचा आधार घेत ‘असीम ज्ञानकण’ असा ट्विटचा उल्लेख करत त्यांनी टोला लगावला.

===

हे ही वाचा – मदरसात मुस्लिम मुलावर मौलवीने जे केलं तेच तो आज इतर बालकांवर करतोय…

===

 

 

शिवशाही या बसमध्ये सुद्धा अकबरच पहिल्यांदा बसला आणि त्यामुळेच गाडीला ‘शिवशाही’ असं नाव देण्यात आलं असं या नेटकाऱ्याने म्हटलं आहे.

शिवशाही या गाडीच्या नावाचा आधार घेत हाणलेला हा टोलासुद्धा अप्रतिम आहे ना मंडळी…!!

 

 

मंगेश राठोड यांनी तर त्यांच्या विनोदात एवरेस्टची पातळी गाठलेली दिसतेय. एवरेस्टच्या ‘शाही’ बिर्याणी मसाल्याच्या नावामागे सुद्धा अकबराचाच हात असल्याची कोपरखळी इथे मारलेली दिसतेय.

 

 

हे सगळं पाहायला अकबर स्वतः हवा होता, असंही म्हटलं गेलंय. असीमजींनी उधळलेली मुक्ताफळं बघून त्यालाही आश्चर्य वाटलं असतं, असंच तर यांना म्हणायचं नाही ना?

 

 

कुंभमेळ्याबद्दल बोललं गेल्यावर गुढीपाडव्याला सोडतील, तर ते नेटकरी कसले… पहिली गुढी सुद्धा अकबरानेच उभारली आहे, असं निषाद म्हणतायत. शाहिस्तेखान सुद्धा पुण्यात चक्क सांस्कृतिक संस्था काढण्यासाठी आला होता असाही टोला इथे हाणलाय.

===

हे ही वाचा – “मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं?” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं

===

 

लोक’शाही’ हा शब्द आणि संकल्पना निवडून आणखी एक शाही विनोद इथे केलेला आहे नाही का मंडळी…!! अर्थात, हे असं व्यक्त होणं फक्त लोकशाहीतच शक्य आहे हेसुद्धा खरं.

 

 

ज्ञानेश्वरीचं लेखन आणि पंढरपूर वारीबद्दल सुद्धा लवकरच नवे शोध लागतील, असं म्हणत असीम यांचं त्यावर मत काय आहे, असा प्रश्न सुद्धा त्यांना विचारला गेलाय.

 

 

ही पोस्ट डिलीट करण्याचं स्पष्टीकरण देताना, अशी ‘शक्यता असलेली पोस्ट’ असा असीम यांनी केला. ही संधी सुद्धा नेटकऱ्यांनी सोडली नाही. या वेडेपणाला थेट ‘नळावरचं भांडण’ अशी उपमा दिलेली दिसतेय.

 

 

हा बघा आणखी एक ‘शाही’ टोला… पुण्यातील बादशाही खानावळ आणि ही अकबर तिथे जेवायला गेला म्हणून या नावाने ओळखली जाते, असं यात म्हटलंय.

मग काय मंडळी, नेटकऱ्यांनी असीम सरोदे यांचा ‘शाही समाचार’ घेतलाय असंच म्हणायचं का?

===

हे ही वाचा – शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version