Site icon InMarathi

ब्रिटिशांनी चक्क दाढी करण्यापासून टोपी वापरण्यापर्यंत या ९ गोष्टींसाठी कर लावला होता!

beard tax featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“आम्ही टॅक्स भरतो म्हणून देश चालतो” हे वाक्य आपण कित्येक लोकांकडून ऐकलं असेल. सध्या सुरू असलेलं मोफत लसीकरण हे सुद्धा भारताच्या सशक्त करप्रणाली मुळेच शक्य होत आहे असं म्हणता येईल.

सामान्य माणसाचं टॅक्स म्हणजे फक्त इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स आणि टॅक्स फ्री झालेला सिनेमा या टॅक्स कडे प्रामुख्याने लक्ष असतं.

केंद्र आणि राज्य सरकारचं आर्थिक बजेट सादर होत असतांना प्रत्येक व्यक्तीचं लक्ष हे टॅक्समध्ये झालेले बदल बघण्याकडेच असतं. एक्साईझ, व्हॅट सारखे वेगवेगळे टॅक्स असलेल्या आपल्या देशात जनरल सर्विस टॅक्स GST आल्यापासून टॅक्स पद्धत समजणं, राबवणं बऱ्यापैकी सोपं झालं आहे.

 

 

सुरुवातीला कपडा उद्योगातून झालेला विरोध वगळता इतर सर्व क्षेत्रांनी GST चं स्वागतच केलं.

भारताचं हे टॅक्स मॉडेल आता जगातील इतर देश सुद्धा आमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इतकी वर्ष टॅक्स फ्री म्हणून मिरवलेल्या आखाती देशांनी सुद्धा आता ५% व्हॅट आमलात आणून या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

मुघलांच्या काळात ‘जिझिया कर’ हा खूप क्रूर होता असं आपण इतिहासात वाचलं होतं. पण, एक वेळ अशी होती जेव्हा जगात यापेक्षा ही किती तरी क्रूर कर लोकांवर लादले जायचे. अश्याच काही करांबद्दल एक कुतूहल म्हणून माहिती देत आहोत :

१. खाद्यतेल –

 

===

हे ही वाचा पाकिस्तानातील ‘हे’ १० विचित्र कायदे ज्याने बनवले, त्याला साष्टांग नमस्कार रे बाबा!

===

इजिप्तमध्ये अशी पद्धत होती की, “ज्या व्यक्तीकडे सरकारमान्य तेलसाठयापेक्षा अधिक तेल असेल त्यांना सरकारला कर द्यावा लागेल.” हे तपासण्यासाठी संबंधित अधिकारी हे घरोघरी जाऊन घरात किती तेल आहे? हे तपासायचे.

कोणी स्वयंपाकासाठी दुसरं तेल तर वापरत नाहीत हे सुद्धा ते अधिकारी तपासायचे.

 

२. दाढीवर टॅक्स –

 

 

१७०५ मध्ये रशियाच्या राजा किंग पीटरने ज्या लोकांना दाढी करायची आहे त्यांच्यावर टॅक्स लावण्याची पद्धत सुरू केली होती. ज्या लोकांना दाढी करायची आहे त्यांना टोकन घ्यावं लागायचं आणि मगच दाढी करता यायची. अर्थात, यामागे लोकांनी स्वच्छ रहावं हा उद्देश होता.

युरोपच्या लोकांसारखं राहणीमान इजिप्तच्या लोकांनी शिकावं अशी किंग पीटरची इच्छा होती. आज हा टॅक्स लावला असता तर कॉलेज मधील मुलांचा टॅक्स वाचला असता. पण, नोकरदार व्यक्तींना हा मोठा खर्च असला असता.

 

३. चीनच्या लोकांवर टॅक्स –

 

 

१८८५ पर्यंत कॅनडामध्ये चीनच्या लोकांवर टॅक्स लावला जायचा. या टॅक्स ला ‘चायनीज हेड टॅक्स’ हे नाव होतं. चीनच्या लोकांना कॅनडामध्ये जाण्यासाठी हा कर भरावा लागायचा.

१९२३ मध्ये कॅनडाने चीनच्या लोकांवर पूर्णपणे बंदी घातली. कोरोना नंतर प्रत्येक देशाचं असंच मत झालं असेल हे नक्की.

===

हे ही वाचा भारत अजूनही ब्रिटिशांच्या मनाप्रमाणेच चालतोय का? ह्या गोष्टींवरून तसंच वाटतं!

===

४. चिमनी टॅक्स –

 

 

१६६० मध्ये इंग्लंड आणि इतर युरोपियन देशांमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी घरामध्ये एक ‘चिमनी’ म्हणजे सतत थोडं उष्ण वाटण्यासाठी थोडा विस्तव सुरू ठेवण्याच्या जागेचं प्रयोजन केलं जायचं.

ही ‘चिमनी’ आपण बऱ्याच सिनेमांमध्ये पाहिली आहे. सरकारने या ‘चिमनी’वर टॅक्स लावण्यास सुरुवात केली होती.

टॅक्स लागू नये म्हणून लोक आपल्या घरातील चिमनी झाकून ठेवू लागले. कालांतराने लोकांनी या टॅक्सचा खूप विरोध केला आणि १६८९ मध्ये हा ‘चिमनी कर’ सरकारला रद्द करावा लागला होता.

 

५. खिडकी वर टॅक्स –

 

 

इंग्लंडमध्ये काही ठिकाणी उद्भवलेल्या आग लागण्याच्या घटनेमुळे सरकारने घरातील खिडक्यांवर सुद्धा टॅक्स लावला होता. ज्याच्या घराला जास्त खिडक्या, त्यांना जास्त टॅक्स भरावा लागेल असा तो नियम होता.

टॅक्स वाचवण्यासाठी कित्येक लोकांनी घरातील खिडक्या बंद करून टाकल्या होत्या. १६९६ मध्ये सुरू करण्यात आलेला हा टॅक्स १८५१ मध्ये लोकांना होणारे आजार लक्षात घेऊन रद्द करण्यात आला होता.

इंग्लंड मध्ये आजही जुन्या पद्धतीची घरं आहेत जिथे खिडक्यांची जागा बंद करण्यात आली होती.

 

६. साबणावर टॅक्स –

 

 

१७१२ मध्ये युरोपियन सरकारने साबणावर टॅक्स लावला होता. हा टॅक्स वाचवण्यासाठी लोक घरीच साबण तयार करायला लागले होते.

कमालीची गोष्ट म्हणजे हा कर १४१ वर्षांपर्यंत लोकांकडून साबण वापरण्यावर घेतला जायचा. १८३५ मध्ये हा कर रद्द करण्यात आला होता.

 

७. विटांवर टॅक्स –

 

 

मोकळ्या जागेत पडलेल्या विटा जर घराच्या किंवा इतर बांधकामासाठी वापरल्या तर इंग्लंडचं सरकार लोकांना टॅक्स लावायचं. हे टाळण्यासाठी लोक मोठ्या विटांचा वापर करू लागले. सरकारने मोठ्या विटांवर सुद्धा टॅक्स लावायला सुरुवात केली. १७०० साली सुरू झालेला हा कर १८५० पर्यंत सुरू होता.

 

८. टोपी घालण्यावर टॅक्स –

 

 

१७८४ मध्ये इंग्लंड सरकारने माणसांना त्यांच्या टोपी घालण्यावर टॅक्स लावायला सुरुवात केली होती. जितकी मोठी टोपी तितका जास्त टॅक्स लोकांना भरावा लागायचा.

 

९. भीती वर टॅक्स –

 

 

तुम्ही जर इंग्लंडच्या सैन्यदलात आहात तर तुम्ही सदैव युद्धासाठी तयार असले पाहिजे असा एक नियम सरकारने तयार केला होता.

ज्या सैनिकांना युद्धात भाग घ्यायचा नाहीये किंवा काही कारणास्तव ते युद्धात भाग घेऊ शकत नाहीत अश्या लोकांना एक ‘भीती टॅक्स’ लावला जायचा. ११ व्या शतकात सुरू केलेला हा टॅक्स १४ व्या शतकापर्यंत सैनिकांकडून वसूल केला जायचा.

===

हे ही वाचा मजूर म्हणून गेले आणि राज्यकर्ते झाले : भारताबाहेरचा असाही छोटा भारत!

===

भारतावर १५० वर्ष राज्य करणाऱ्या इंग्लंडने फक्त भारतीयांनाच नाही तर त्यांच्या देशातील लोकांना सुद्धा त्रास दिला असं हे या सर्व टॅक्स वरून स्पष्ट होतं.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताने इंग्लंडच्या यापैकी कोणत्याही टॅक्सला आपल्या अर्थकारणात जागा दिली नाही यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांचं कौतुक करायला पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version