Site icon InMarathi

चीनच्या सर्वात गूढ आणि अद्भुत पर्वतावर आहे ‘स्वर्गाचे दार’!

china gate im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वर्ग म्हणजे मनुष्य प्राण्याने आजवर रंगवलेली सर्वात मोहक कल्पना होय. साक्षात देवांचे निवासस्थान म्हणजे स्वर्ग! या कल्पनेमध्ये सगळी सुखं आहेत. इथे दुःखाचा लवलेशही नाही, मृत्यूनंतर केवळ स्वर्गातच आपले स्वागत व्हावे, ही इच्छा प्रत्येकाच्या मनात फुलवणारी अशी ही रमणीय कल्पना.

खरोखर स्वर्गासारखं एखादं ठिकाण अस्तित्वात की नाही यावर बराच वाद-विवाद होऊ शकतो. शेवटी तो वेगळा मुद्दा झाला, त्यात न पडलेलंच बरं.

असो, याच संकल्पनेशी निगडीत, आज आम्ही तुम्हाला जगातील अश्या एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जेथे स्वर्ग नाही, पण त्याला Heaven’s Gate Mountain ‘ अर्थात स्वर्गाचे दार असणारा पर्वत असे म्हटले जाते. चला जाणून घेऊया या अद्भुत ठिकाणाबद्दल!

 

 

हे ठिकाण मध्ये चीन मध्ये आहे. या पर्वताचे नाव आहे- Tianmen Mountain! चीनमधील सर्वात प्रमुख टुरिस्ट अॅट्रेक्शन म्हणजे हे ठिकाण होय. अहो कारण स्वर्ग राहू द्या, पण स्वर्गाचे दार तरी बघून घेऊया या आशेने दरवर्षी लाखो पर्यटक या जागेला भेट देतात.

हा पर्वत जवळपास ५००० फुट उचं असून त्याच्या सर्वोच्च माथ्यावर एक गुहा आहे. या गुहेलाच ‘स्वर्गाचे दार’ म्हणतात.
असं सांगितलं जातं की फार पूर्वी या पर्वताचा काही भाग कोसळला , ज्यामुळे गुहा निर्माण झाली. ही गुहा १९६ फुट लांब, ४३१ फुट उंच आणि १८७ फुट रुंद आहे.

तब्बल ५ हजार मीटर उंचीवर असल्याकारणाने ही गुहा नेहमीच ढगांनी वेढेलेली असते, ज्यामुळे असा भास होतो की जणू की त्या गुहेपलीकडे आणि ढगांच्या पार स्वर्गचं आहे, म्हणूनच या गुहेला ‘स्वर्गाचे दार’ हे नाव पडले.

 

 

येथे पोचण्यासाठी रस्त्यावरून चालत जाता येते किंवा केबल प्रवासाची देखील सोय आहे. जगातील सर्वात लांब आणि उंच या केबलचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे हे विशेष! यासाठी राबलेल्या इंजिनियर लोकांचे देखील कौतुक करावे तेवढे कमी आहे.

 

 

केबल पर्यटकाला थेट गुहेपर्यंत घेऊन जाते असेही नाही, केबल मधून उतरल्यावर एकूण ९९९ पायऱ्या चढून पर्यटक गुहेपर्यंत पोचू शकतो. बरोब्बर ९९९ पायऱ्या यासाठी की चीनच्या ताओ फिलोसॉफीनुसार ९९९ ही संख्या पवित्र आहे तसेच राजघराण्याचे प्रतिक आहे.

 

 

पूर्वी येथे एक धबधबा देखील होता. हा धबधबा यासाठी विशेष होता कारण तो केवळ १५ मिनिटांसाठीच दिसायचा, म्हणजे १५ मिनिटांनंतर धबधबा अदृश्य व्हायचा. धबधब्याचे पाणी तब्बल १५०० मीटर उंचीवरून कोसळायाचे. असा जलप्रपात सगळीकडेच पाहायला मिळतो असे नाही.

 

 

चीनमध्ये हा पर्वत अतिशय रहस्यमयी पर्वत म्हणून देखील ओळखला जातो. या पर्वतावर अनेक खजिने असल्याचे ऐकायला मिळते. आजवर अनेकांनी हे खजिने शोधण्यासाठी जीवाची बाजी लावली, परंतु अजूनही यश मात्र कोणाच्याच हाती लागले नाही.

 

 

काय मग? जाणार का स्वर्गाचे दार पाहायला???

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version