Site icon InMarathi

जगभरातील सृजनशील, नामवंत कलावंतांसाठी अहमदनगर ठरतयं आकर्षण! का? वाचा –

film festival InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अहमदनगर फिल्म फाऊंडेशन आयोजित “इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ अहमदनगर” या आंतरराष्ट्रीय महोत्सवाची यंदाची पारितोषिके शनिवार, दिनांक १७ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली. हे या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं तिसरं वर्ष होतं. “द फिशरमन्स डायरी” या कॅमेरून देशातून आलेल्या चित्रपटाने यंदाचा महोत्सव गाजवला.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संकलन यांसह तब्बल ६ पारितोषिके या चित्रपटाने पटकावली. “द फिशरमन्स डायरी” हा चित्रपट कॅमेरून देशाकडून ऑस्कर अवॉर्डसाठी पाठवण्यात आला होता.

जगभरातील नामांकित फिल्म फेस्टिव्हलमध्ये “द फिशरमन्स डायरी” या चित्रपटाचे प्रदर्शन झाले आहे. या पाठोपाठ जर्मनी देशातून आलेल्या “टोप्राक” या चित्रपटाने दोन पारितोषिके पटकावली.

अहमदनगरमध्ये चित्रपट संस्कृती रुजविणे तसेच विकसित करणे, या हेतूने अहमदनगर फिल्म फाऊंडेशन नेहमीच कार्य करत असते. याच अनुषंगाने अहमदनगर फिल्म फाऊंडेशन गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करीत आहे. यावर्षी महोत्सवाकरिता सुमारे 49 देशांतून, 285 एन्ट्रीज आल्या होत्या.

यामध्ये फिचर फिल्म, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज आणि ऍनिमेशन फिल्म्सचा समावेश होता. अत्यंत दर्जेदार आणि उत्तम कलाकृती दरवर्षी या महोत्सवात पाहायला मिळतात. यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे या फेस्टिव्हलचा आनंद रसिकांना घेता आला नाही.

फक्त परीक्षकांसाठी फिल्म्सचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या फिल्म फेस्टिव्हलचे परीक्षण हे श्री. संतोष पाठारे यांनी केले. संतोष पाठारे हे मुंबईतील नावाजलेले सिनेसमीक्षक असून त्यांचा चित्रपटांवर गाढा अभ्यास आहे.

“इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ अहमदनगर” चे यावर्षीचे डायरेक्टर शैलेश थोरात यांनी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे तसेच विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.

फिल्म फेस्टिवलला नेहमीच पाठबळ देणारे मा. श्री. गौतम मुनोत म्हणाले की, यावर्षी जरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव्हलचे आयोजन करता आले नाही, परंतु पुढच्या वर्षी फिल्म फेस्टिव्हल हा आणखी दिमाखात आणि मोठ्या स्वरूपात आयोजित केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच चित्रपटांच्या बाबतीत वेगवेगळ्या कलाकृती घडत राहणं हे फार महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.”

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ अहमदनगर सुरळीत पार पडेल यासाठी नेहमीच तत्परतेने कार्यरत असणारे श्री. विराज मुनोत आणि श्री. प्रशांत जठार यांनी सांगितले की “कोरोनामुळे फेस्टिव्हल आयोजित करता आली नाही, तसेच फेस्टिव्हलमधील फिल्म्स या प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे शक्य झाले नाही.

परंतु यावर्षी ज्या चित्रपटांना पारितोषिके देण्यात आलेली आहेत ते पुढील वर्षीच्या फेस्टिव्हल मध्ये प्रेक्षकांना दाखवण्यात येतील. आणि पुढच्या वर्षी आणखी मोठया स्वरूपात फेस्टिव्हल आयोजित केला जाईल असे आश्वासन दिले.

तसेच गौतम मुनोत प्रो. LLP यांची सतत मिळणारी साथ व प्रेरणा आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून मिळणारी मदत याबद्दल त्यांचे आभार मानले.

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल च्या 2020- 2021 मध्ये मिळालेली पारितोषिके पुढीलप्रमाणे –

इफ्फा सर्वोत्कृष्ट चित्रपट
द फिशरमॅन्स डायरी; देश : कॅमरून

इफ्फा सर्वोत्कृष्ट लघुपट
ॲज द वेव ब्रोक, देश : जर्मनी

इफ्फा सर्वोत्कृष्ट लघुपट (भारत)
दोन जगातला कवी, देश : भारत

इफ्फा सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंटरी
बांबू बॅलड, देश:  भारत

इफ्फा सर्वोत्कृष्ट लघुपट (ॲनिमेशन)
रेनाईडान्स, देश: अमेरिका

इफ्फा सर्वोत्कृष्ट अभिनेता
कांग क्विंटस, फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

इफ्फा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
नडामो डमाराइस, फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

इफ्फा सर्वोत्त्कृष्ट बालकलाकार
फेथ फिडेल, फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

इफ्फा सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक
इनाह जॉनस्कॉट, फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

इफ्फा सर्वोत्कृष्ट कॅमेरामन
ख्रिस हिर्शहॉयझर, फिल्म : टोप्राक

इफ्फा सर्वोत्त्कृष्ट संकलन
डिबा जे. ब्लेर्क, फिल्म : द फिशरमॅन्स डायरी

इफ्फा सर्वोत्त्कृष्ट संगीत
शाउल बुस्टान, फिल्म : टोप्राक

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version