अपुरी शस्त्र, पोटात भूक सोबतीला अनेक जीवघेणे आजार; आझाद हिंद सेनेचा खडतर प्रवास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – स्वप्निल खेर्डेकर
===
१४ एप्रिल ही तारीख आपल्याला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा जयंतीदिन म्हणुन माहीत आहे, पण ह्याच तारखेला भारताच्या इतिहासातली एक अभुतपूर्व घटना घडली होती हे किती लोकांना माहीत आहे?
ही घटना आहे आझाद हिंद सेनेने लढलेली मोईरांगची लढाई आणि पहिल्यांदा भारताच्या भूमीवर डौलात फडकलेला तिरंगा…!
तारीख होती… १४ एप्रिल… वर्ष १९४४…!
हातात जपान्यांनी दिलेली अपुरी शस्त्र, पोटात कित्येक दिवसांची भूक आणि सोबतीला अनेक जीवघेणे आजार घेऊन अत्यंत विपरीत परिस्थितीत हे सैन्य लढलं आणि जनरल स्टीलविल, स्कुन्स सारख्या कसलेल्या सेनानींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सुसज्ज ब्रिटीश-अमेरिकन फौजांना टक्कर देत पहिल्यांदाच ‘आझाद हिंद’ चा तिरंगा भारताच्या भूमीवर फडकवला.
स्वातंत्र्याचं जे स्वप्न मंगल पांडे, भगत सिंग, अशफाकउल्ला खान, सावरकर, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, उधमसिंग, रासबिहारी बोस ह्यांच्यासारख्या कित्येक ज्ञात-अज्ञात वीरांबरोबरच अडतीस कोटी भारतीयांनी बघितलं होतं ते आता दृष्टीपथात यायला लागलं होतं.
कुठून आली इतकी हिम्मत? कोणामुळे पेटत्या आगीत उड्या मारायला तयार झालीत ही लोकं?
ज्या माणसामुळे हे सर्व घडून आलं त्या माणसाचं नाव होतं सुभाषचंद्र बोस.
पराभूत झालेल्या, शरणागती पत्करलेल्या, मनोधैर्य खच्ची झालेल्या ब्रिटीश इंडियन सैन्यातून आणि सिंगापूर, मलेशियात राहणाऱ्या सामान्य भारतीयातून एक नवीन फौज उभी केली ह्या महानायकाने.
आणि ही फौज म्हणजे केवळ कवायती करत पेपरात फोटो छापून घेणारी गर्दी नव्हती. तो होता एक जिवंत लावारस. मोईरांगच्या ह्या घटनेने हेच सिद्ध केलं. जगात असं दुसरं उदाहरण माझ्या तरी बघण्यात नाही.
दुर्दैवाने ब्रिटिशांनी संख्याबळ आणि आधुनिक सैन्याच्या मदतीने मोईरांग पुन्हा जिंकुन घेतलं. मात्र त्यावेळी जरी हे यश अल्पकाळ टिकलं असं वाटलं असलं तरी एक इतिहास नक्कीच घडला होता. भारतीयांना आपल्या सामर्थ्याची जाणीव झाली होती.
२०१३ मध्ये ब्रिटनच्या National Army Museum ने घेतलेल्या तज्ज्ञांच्या एका सर्व्हेमध्ये ब्रिटीश सेनेने लढलेल्या युध्द्धात इम्फाळ आणि कोहीमाच्या लढाईला ब्रिटीश सैन्याने लढलेल्या सर्वोत्कृष्ट लढाई घोषित करण्यात आलं.
विशेष म्हणजे नॉर्मंडीची D-Day ची लढाई आणि Waterloo च्या लढाईच्या तुलनेत ह्या युद्धाला जास्त मतं मिळालीत. ह्यावरून आपल्याला जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेने गाजवलेल्या पराक्रमाची कल्पना यावी.
आणि इतक्या वर्षांनी ब्रिटिशांनी देखील त्या लढाईला ‘ब्रिटिश सेनेने लढलेली सर्वात कठीण लढाई’ असं म्हणुन नेताजी, आझाद हिंद सेना, कर्नल शौकत मलिक आणि त्या कित्येक ज्ञात-अज्ञात वीरांचा एकप्रकारे सन्मानच केलाय.
दुःखद प्रश्न हा आहे की – भारतीयांना, आपल्यापैकी किती लोकांना, हे माहित होतं?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.