Site icon InMarathi

खळबळजनक! कोरोनाकाळात तब्बल एक लाख भारतीयांचे मिशनरींकडून धर्मांतर

missionaries featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागच्या वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीला तोंड देत आहे. एकीकडे कोरोनामुळे देशासोबतच सर्वांचीच सामाजिक, आर्थिक परिस्थिती लयाला जात असताना दुसरीकडे मात्र भारतीयांच्या याच परिस्थितीचा फायदा घेतला आहे ख्रिस्ती मिशनरींनी.

कोरोनामुळे भारतातील गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली असताना या वेळेचा फायदा घेऊन ख्रिस्ती मिशनरींनी भारतीयांचे धर्मांतर केल्याची घटना घडली आहे.

===

हे ही वाचा हिंदू ‘योगशास्त्र’ आणि ख्रिश्चन धर्म : परस्पर विरोधी तत्वज्ञान

===

 

भारताच्या ग्रामीण भागातील गरीब आदिवासी लोकांना अन्न, वस्त्र आणि पैसे देऊन त्याबदल्यात त्यांचे धर्मांतर केल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल एक लाख लोकांचे अशा प्रकारचे धर्मांतर केल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे.

या धक्कादायक गोष्टीची माहिती डेव्हिड रिवेस या ‘अनफोल्डिंगवर्ल्ड’ या स्वयंसेवी संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.

अनफोल्डिंगवर्ल्ड ही संस्था जगभर चर्चची स्थापना करून, जगभरातील सर्व भाषांमध्ये बायबलचे भाषांतर करून ते बायबल अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करते.

डेव्हिड रिवेस यांनी ही माहिती ‘मिशिनरी नेटवर्क न्यूज’ला मुलाखत देताना ही धक्कादायक माहिती दिली आहे.

 

===

हे ही वाचा या ७ गोष्टींना ख्रिश्चन धर्माने थेट “पाप” ठरवलं आहे! तुम्ही देखील यांत अडकला आहात काय? तपासून पहा!

===

या मुलाखतीदरम्यान डेव्हिड रिवेस यांनी महत्वाची आणि मोठी माहिती दिली. ते म्हणाले, “लॉकडाऊन काळात महाल अशा लोकांपर्यंत पोहोचायला मर्यादा येत होत्या. मात्र आमची चिकाटी आम्ही ढळू दिली नाही. आम्ही भारतातील दुर्गम अतिदुर्गम भागातील गरजूंपर्यंत मोबाईल, व्हाट्सअपद्वारे संपर्क केला. आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. व्हाट्सअपद्वारे आम्ही प्रार्थनेचे आयोजन वेळोवेळी केले.”

पुढे ते म्हणाले, याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि त्यामुळेच आम्ही याकाळात १ लाख भारतीय लोकांचे धर्मांतर करू शकलो. आम्ही जवळजवळ ५० हजार गावे ताब्यात घेतली असून, प्रत्येक १० गावांसाठी आम्ही एका चर्चची स्थापना केली आहे.

त्या चर्चमध्ये आता त्या त्या भागातील लोक नियमितपणे प्रार्थनेसाठी जमतात. पुढे डेव्हिड म्हणाले, ” आम्ही या महामारीचा काळ एका संधी म्हणून पाहत त्याचा वापर करून घेतला. ज्या काळात अवघे जग कोरोना महामारीला सामोरे जात होते, त्यावेळी अनफोल्डिंगवर्ल्ड संस्था भारतात त्याकडे संधी म्हणून पाहत होती. कोरोनाच्या २०२० वर्षात जेवढे चर्च स्थापन केले, तेवढे मागील २५ वर्षांत केले नव्हते.”

 

कोण आहे डेव्हिड रिवेस?

डेव्हिड रिवेस हे JAARS अर्थात जंगल एव्हिएशन अँड रेडिओ सर्व्हिस या संस्थेचे अध्यक्ष असून, ते ‘अनफोल्डिंगवर्ल्ड’ या संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देखील काम पाहत आहेत.

‘अनफोल्डिंगवर्ल्ड’ ही संस्था बायबलचे जगभरातील विविध भाषेत भाषांतर करते. आणि भाषांतरित बायबल लोकांना मिळून देण्यासाठी प्रयत्न करते.

डेव्हिड नेहमी सांगतात की, बायबलचे जास्तीत जास्त भाषेत भाषांतर केल्याने मोठ्या प्रमाणात चर्चची स्थापना होईल आणि येशूचा प्रसार होईल.

कशी केली जाते चर्चची स्थापना?

‘रिच ऑल नेशन्स’ या मुख्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील छोट्या-मोठ्या मिशनरी कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्मप्रसार करणे, धर्मांतर करणे याचे प्रशिक्षण दिले जाते.

प्रशिक्षण घेतलेले सर्व स्वयंसेवक त्यांच्या गावात जातात आणि चर्चच्या स्थापनेसाठी प्रयत्न करतात. त्यासाठी मिशनरी त्यांना जोवर ते स्वयंपूर्ण होत नाहीत तोवर ठराविक मासिक वेतन देतात.

 

 

मिशनरी महिन्यातून एकदा त्यांना भेटतात, त्यांच्या कामांचा आढावा घेतात. जोपर्यंत संबंधित स्वयंसेवक त्यांच्या त्यांच्या भागात चर्चची स्थापना करत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पाठपुरावा करतात.

अशा प्रकारे भारतात चर्चची स्थापना करण्यासाठी ११० मिशनरी कार्यरत आहेत. प्रत्येक मिशनरीला धर्मांतराच्या कामाचा आराखडा, लक्ष्य दिले जाते. प्रत्येक वर्षाला नवीन चर्च स्थापन करण्यास त्यांना सांगितले जाते.

===

हे ही वाचा चर्च मधील विकृत, गलिच्छ प्रकारांसाठी “सैतान” जबाबदार: पोप महाशयांचा “चमत्कारिक” शोध

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version