Site icon InMarathi

दुसरी लाट फक्त महाराष्ट्रातच आहे काय?? कारण राजस्थानात चक्क हेल्मेट वाटप होतंय!

raj feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागच्या जवळपास दीड वर्षांपासून जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. लॉकडाऊन, लसीकरण सारख्या निर्णयांची अंमलबजावणी करून सगळेच देश आता कोरोनाला अटकाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतामध्ये  प्रामुख्याने  महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा स्फोट झाला आहे म्हणायला काही हरकत नाही. त्यानुसार नियमावली जाहीर करून अंशतः लॉकडाऊन लागल्याच दिसायला ही मिळत आहे. पण महाराष्ट्र सॊडून इतर राज्य मात्र कोरोना सोबत आपल्या राज्याचा गाडा मात्र सुशेगात हाकताना दिसत आहे.

हिमालयीन राज्य ही मुख्यतः पर्यटनासाठी प्रसिद्ध. आणि तिथली अर्थव्यवस्था सुद्धा त्यावरच अवलंबून आहे.त्यामुळे कोरोना काळात सुद्धा तिथे पर्यटन सुरू असल्याचे दिसत आहे.

 

 

नुकताच हरिद्वारमध्ये आयोजित केलेला कुंभमेळा कोरोनाचा धोका लक्षात घेता आटोपता घेतला. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात गोवा, कर्नाटकात सुद्धा पर्यटन सुरू असल्याचे समजते.

एकंदरीत महाराष्ट्र सोडता इतर राज्यात कोरोनाचा धोका लक्षात घेता इतर कारभार सुरळीत असल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडे संचारबंदी आहे पण तिथे राजस्थानमध्ये तर वेगळंच काही तरी चालू आहे.

 

 

राजस्थानात टू व्हीलर बाईक विकत घेतल्यावर त्याच्यासोबत आयएसआय स्टँडर्ड असलेले हेल्मेट मोफत मिळणार आहे.

इथे कोरोना काळात सगळ्यात जास्त विक्री ही दोन चाकी गाड्यांची झाली होती. त्यावर फोकस करत आणि होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता राजस्थान सरकारने उचलले हे पाऊल योग्य असल्याचे सर्व स्तरावरून बोलले जात आहे.

मागे लोकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते,की देशात सर्वाधिक मृत्यू हे अपघाताने होत आहेत.आणि यातसुद्धा सगळ्यात जास्त दोन चाकी वाहनांच्या अपघातात होणारे मृत्यू सर्वाधिक आहे.आणि हे अपघात रोखण्यासाठी राज्य सरकार ज्या उपाययोजना राबवतील त्याला केंद्राकडून सर्वोतोपरी सहायता करण्यात येईल असे सांगितले.

 

हे ही वाचा – होय! रस्ता अपघात झाल्यास सरकार भरपाई देतं. वाचा महत्त्वाचा नियम!

राजस्थान सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तशी केंद्राच्या मंजुरीची गरज नाही.पण त्यांच्या या निर्णयातून छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा अपघात रोखला जाऊ शकतो हे अधोरेखित होते.

यासंदर्भात सांगताना राजस्थान चे वाहतूक मंत्री प्रताप सिंग खाचरियावास सांगतात,

रस्ते वाहतूक अपघात आणि त्यात होणारे मृत्यू यांची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.राज्य सरकार रस्ते सुरक्षेसाठी प्रतिबद्ध असून त्याच्या अंमलबजावणी साठी हा निर्णय घेतला गेला आहे.

अपघात,त्यात होणारे जखमी आणि मृत्यू यांचा दर कमी करणे ही प्राथमिकता आहे.हल्ली दिसून येत की पैशांची कमी किंवा चलान पासून सुटका व्हावी म्हणून कमी किमतीचे आणि कामचलाऊ हेल्मेट विकत घेतात.तसेच काही लोक सेफ्टी आणि स्टॅंडर्ड कडे दुर्लक्ष करून साधारण हेल्मेट विकत घेतात.पण त्यांचा हाच निष्काळजीपणा त्यांच्या अंगलट येऊन अपघात होऊन मृत्यूला कारणीभूत ठरतो.

त्यामुळे सदरचा निर्णय घेऊन सरकार अपघात कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकल्याचे प्रताप सिंग सांगतात.

देशात वर्षाला सुमारे दीड लाख अपघात होतात.आणि यात मृत होणाऱ्यांची संख्या ही ४.५ लाख एवढी आहे.यावरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन केले होते.

 

 

रस्ते अपघातांच्या मामल्यात भारत हा चीन आणि अमेरिकेच्या सुद्धा पुढे आहे. रस्ते अपघात २०२५ पर्यंत ५०% पर्यंत कमी करण्याचे आवाहन केंद्राने राज्याला केलेले आहे. गंभीर स्वरूप धारण करायच्या आधी रस्ते अपघातावर योग्य निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे केंद्राने सांगितल्याचे कळते.

भारतात प्रत्येक गोष्टीची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो अर्थात बीआयएस ही संस्था आहे.त्यांच्या नियमानुसार वस्तू बनवले गेले पाहिजे हा नियम आहे. परंतु प्रत्येक ओरिजिनल गोष्टीची कॉपी भारतात तयार व्हायला वेळ लागत नाही.त्यामुळे अनेकदा दिसायला ओरिजिनल आणि बनावट निकृष्ट असे अनेक गोष्टी पाहायला मिळतात.

हेल्मेटच्या बाबतीत सुद्धा हे बऱ्याचदा पाहिले गेले आहे.त्यामुळे निकृष्ट दर्जाचे हेल्मेट तयार करणाऱ्यावर बीआयएस ने लक्ष ठेवून त्यावर योग्य कारवाई करण्याची सूचना दिल्ली उच्च न्यायलायने दिलेली आहे.

एकूणच रस्ते अपघात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राजस्थान सरकारने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. हाच निर्णय इतर राज्यात देखील लागू केला जावा असा विचार अनेकांच्या मनात येऊन गेलाच असेल. 

===

हे ही वाचा – भारतातील दुर्दैवी, सर्वात भीषण रेल्वे अपघातामागे ही २ प्रमुख कारणे होती…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version