ऋषी की वैज्ञानिक? हे प्राचीन हिंदू ऋषी मुळात शास्त्र संशोधन करणारे वैज्ञानिक होते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या देशाला असंख्य ऋषी, महात्म्यांची परंपरा आहे. म्हणूनच भारताला संतांचा देश म्हणून देखील संबोधले जाते. अनेक मोठमोठे ऋषी पूर्वीच्या काळात होऊन गेले आहेत.
मात्र ऋषी, महात्मा, संत आदी शब्द ऐकले की, त्या वैशिष्ट्य महात्म्यांचे अध्यात्मिक महत्व आणि अध्यात्मिक कार्यच आपल्या डोळ्यांसमोर येते.
अशा अनेक गोष्टी आज आपण पाहतो ज्या आपल्या पुराणांमध्ये आधीच सांगितल्या गेल्या आहेत. उदाहरण द्यायचे झालेच तर आपण विमानाचे देऊ शकतो. आज कोणालाही विचारले की, विमानाचा शोध कोणी लावला तर लगेच सांगितले जाईल ‘राइट बंधू’ मात्र त्यांनी शोध लावण्यापूर्वीच आपल्या पुराणांमध्ये पुष्पक विमानाचा उल्लेख आला आहे.
संतांच्या आध्यात्मिक महत्वापलीकडे जाऊन देखील याच ऋषींनी अनेक विविध, मोठे आणि चांगले शोध देखील लावले आहेत. त्यांची अध्यात्मिक बाजू सर्वश्रुत आहेच. पण आज आम्ही तुम्हाला याच ऋषींच्या वैज्ञानिक बाजूची नवीन ओळख करून देणार आहोत.
ऋषी भारद्वाज :
वाल्मीकी रामायणानुसार भारद्वाज ऋषी महर्षि वाल्मीकी यांचे शिष्य होते. त्यांनी व्याकरण, आयुर्वेद संहिता, धनुर्वेद, राजनीतिशास्त्र, यंत्रसर्वस्व, अर्थशास्त्र, पुराण, शिक्षा आदि अनेक विषयांवर ग्रंथ लेखन केले. ऋषींमध्ये भारद्वाज ऋषी मोठे आणि सर्वश्रेष्ठ मानले जातात.
भारद्वाज ऋषींनी ‘राइट बंधू’ यांच्या आधीच विमानाचा शोध लावला होता. यालाच पुष्पक विमान म्हणून देखील संबोधले जाते. या विमानाच्या शोधाबद्दल त्यांनी विस्तृत माहिती एका ग्रंथात लिहून ठेवली आहे, ज्याला विमान शास्त्र असे म्हटले जाते.
यात्री विमानांव्यतिरिक्त भारद्वाज ऋषींनी लढाऊ विमान, स्पेस शटल यान यांचा सुद्धा उल्लेख त्या विमान शास्त्रात केला आहे. सोबतच त्यांनी एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर विमानांबद्दल देखील लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे, ही वायुयाने अदृश्य करण्याची माहिती देखील दिली आहे.
बौधायन
बौधायन हे प्राचीन भारतातील एक महान गणितज्ञ आणि शुल्ब सूत्र म्हणजेच श्रौतसूत्र यांचे निर्माते होते. पायथॅगोरसच्या सिद्धान्ताआधीच बौधायन यांनी त्रिमितीचे सूत्र तयार केले होते.
मात्र आज जगात ज्यामितिशास्त्री पाइथागोरस आणि यूक्लिड यांचेच सिद्धांत शिकवले जातात. असंख्य वर्षांपूर्वी भारतात रेखागणित, ज्यामिति किंवा त्रिकोणमिति यांना शुल्व शास्त्र संबोधले जायचे.
शुल्व शास्त्रानुसार विविध आकारांच्या यज्ञवेदि तयार केल्या जायच्या. दोन सारख्या समभुज असलेल्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढल्यानंतर जी संख्या येते त्या संख्येच्या क्षेत्रफळाच्या ‘समकोन’ समभुज चौकोन तयार तयार होतो अशा अनेक कठीण प्रश्नाची सूत्रे बौधायन यांनी तयार केली.
भास्कराचार्य
भास्कराचार्य हे अतिशय प्रसिद्ध आणि मोठे गणितज्ञ, खगोल शास्त्रज्ञ होते. भास्कराचार्य यांनी लिहिलेल्या अनेक मोठ्या ग्रंथांचा अनुवाद परदेशी भाषांमध्ये देखील केला गेला आहे. याच ग्रंथांमुळे परदेशी शास्त्रज्ञांना नवीन नवीन शोध लावण्यासाठी मार्ग मिळाले आहेत.
न्यूटन यांनी शोध लावण्याआधीच ५०० वर्षांपूर्वी भास्कराचार्य यांनी गुरुत्वाकर्षण आणि त्याचे नियमन समजून घेतले होते. याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ‘सिद्धांतशिरोमणि’ या ग्रंथात देखील केला आहे.
भास्कराचार्य यांनी लिहिलेल्या ‘लीलावती’ ग्रंथात गणित आणि खगोल विश्व यांबद्दल सांगितले आहे. ‘करण कुतूहल’ या ग्रंथात त्यांनी ग्रहणाबद्दल माहिती दिली आहे.
–
हे ही वाचा – अविवाहित असलेल्या ‘या’ ऋषींनी जगाला दिला कामसूत्राचा मंत्र, विश्वासच बसणार नाही!
–
पतंजली
पतंजली हे काशीचे असल्याची माहिती आहे. त्यांनी योगसूत्र, पाणिनी मध्ये अष्टाध्यायी वर भाष्य करत आयुर्वेदावर ग्रंथ लिहिले. पतंजली यांना भारताचे मनोवैज्ञानिक आणि चिकित्सक सुद्धा म्हटले जाते.
पतंजली हे रसायन शास्त्राचे मोठे विद्वान होते. अभ्रक, विंदास, धातुयोग, लोहशास्त्र आदी पतंजली यांच्यामुळेच आपल्याला माहित झाले आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ने पाच वर्षाच्या शोधानंतर सांगितले की, योगसाधना केल्याने कर्करोग पासून मुक्ती मिळवता येते.
आचार्य चरक
आचार्य चरक यांची गणना भारताच्या औषधी विज्ञानाच्या मुख्य शास्त्रज्ञांमध्ये होते. त्यांनी अथर्ववेदामध्ये आयुर्वेदाची अनेक सूत्रे सांगितली आहेत.
महर्षी चरक यांनी आयुर्वेदावर आधारित अतिशय महत्वाच्या ‘चरक संहिता’ ग्रंथाचे लिखाण केले आहे. शरीरशास्त्र, गर्भशास्त्र, रक्ताभिसरणशास्त्र, औषधिशास्त्र इत्यादि विषयांमध्ये म्हटणचे आणि गंभीर शोध सोबतच मधुमेह, क्षयरोग, हृदयविकार आदी रोग आणि त्यांचे निदान, औषधोपचार यांची माहिती यात दिली आहे.
महर्षी सुश्रुत
महर्षी सुश्रुत यांना ऑपरेशनचे अविष्काराक म्हटले जाते. महर्षी सुश्रुत यांनी त्यावेळेच्या मोठे वैद्यांसोबत बोलून त्यांनी अवघड प्रसूती, मोतिबिंदू, कृत्रिम अवयव लावणे, प्लास्टिक सर्जरी आदी अनेक जाती समस्यांवर उत्तरे दिली आहेत.
त्यांच्या अजून एक ‘सुश्रुत संहिता’ ग्रंथात शल्य चिकित्सेसंदर्भात अतिशय महत्वाची माहिती मिळते. सोबतच ऑपरेशनसाठी लागणाऱ्या साधनांची नावे देखील आहे.
नागार्जुन
नागार्जुन यांनी रसायन शास्त्र आणि धातु विज्ञान यावर खूप मोठे आणि महत्वाचे संशोधन केले आहे. रसायन शास्त्र विषयावर त्यांनी अनेक ग्रंथांची रचना देखील केली आहे. ज्यात ‘रस रत्नाकर’, ‘रसेन्द्र मंगल’ आदी ग्रंथ प्रसिद्ध आहे.
रसायनशास्त्रज्ञ आणि धातुकर्मी होण्यासोबतच त्यांनी अनेक मोठ्या आणि अवघड अशा रोगांवर औषध तयार केली आहेत. चिकित्सा विज्ञानमध्ये त्यांची ‘कक्षपुटतंत्र’, ‘आरोग्य मंजरी’, ‘योग सार’, ‘योगाष्टक’ आदी पुस्तक प्रसिद्ध आहेत.
–
हे ही वाचा – कथा शबरीची: फारशी माहित नसलेली, पण तिच्या बोरांइतकीच गोड आणि ह्रदयस्पर्शी!
–
पाणिनी
जगातील पहिले व्याकरण पाणिनी यांनी लिहिले. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी व्यकरणाबद्दल लिहून ठेवली आहेत. भाषण योग्य साच्यात बांधणे आणि संस्कृत भाषेला व्याकरणबद्ध त्यांनी केले.
‘अष्टाध्यायी ‘ या त्यांच्या व्याकरण ग्रंथामध्ये आठ अध्याय आणि चार सहस्त्र सूत्र आहेत. व्याकरणासोबतच या ग्रंथात त्या काळातील काही भाषांबाबत महत्वाच्या नोंदी सापडतात.
त्या काळातील भूगोल, समाज, अर्थकारण, शिक्षण, राजकारण, जीवन यांचीही माहिती त्यांनी नोंदवून ठेवली आहे.
महर्षि अगस्त्य :
महर्षि अगस्त्य एक वैदिक ॠषि होते. राजा दशरथ यांचे राजगुरु म्हणून ऋषी अगस्त्य ओळखले जातात. शिवाय त्यांची गणना सप्त ऋषींमध्ये देखील केली जाते. त्यांनी ‘अगस्त्य संहिता’ या ग्रंथाचे लिखाण केले आहेत.
विजेचा शोध हा थॉमस एडिसन यांनीच लावला असला तरी त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात म्हटले आहे, की मी रात्री संस्कृतची एक ओळ वाचतच झोपी गेलो. झोपतेच मला त्या ओळीचा अर्थ आणि त्यामागील रहस्य समजले.
अगस्त्य ऋषींच्या ‘अगस्त्य संहिता’ या ग्रंथात विजेबद्दल माहिती दिली आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.