Site icon InMarathi

या गावात माणसं, पशुपक्षी सर्वच अंध! रोगामुळे नव्हे! एका भलत्याच कारणामुळे…!

blind 3 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात अगदी अचंबित करणारी निरनिराळी माणसं आणि निरनिराळी गावं आहेत ज्यांबद्दल आपण ऐकून आहोत. एक गाव आहे जिथे प्रत्येक घरात जुळी बाळंच जन्माला येतात, काही अशी गावं आहेत जिथे फक्त महिलाच राहतात आणि काही गावं तर अशी आहेत जिथे पशु – पक्ष्यांपासून माणसांपार्यंत सगळेच आंधळे आहेत. होय, नीट वाचलंत सगळे सजीव आंधळे!

 

 

कॅनडाच्या ऑंटेरियो भागात असलेल्या ह्या “Titlepek” खेड्याचे निवासी रेड इंडियन्स आहेत त्यातील झोपोटेक नावाची ही आदिवासी प्रजाती. उत्तर अमेरिकेच्या भागात हे लोक आढळतात.

 

 

जवळ पास 300 मनुष्यवस्ती असलेल्या ह्या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला कोणत्याच झोपड्यांना खिडक्या दिसणार नाहीत, की बंद करून घ्यायला दारं दिसणार नाहीत, ह्या गावात कोणाला कधीही एकही पक्षी आकाशात उडताना दिसणार नाही. कारण इथे वास्तव्यास असणारा प्रत्येक सजीव आंधळा आहे. याचे कारण काय ते जाणून घेऊया.

Titlepek मध्ये जन्मतः कोणीच आंधळं जन्माला येत नाही. कालांतराने वय वाढतं तसे सगळे सजीव हळूहळू आंधळे व्हायला लागतात. पर्यटकांनी आणि संशोधकांनी जेव्हा ह्या अंधत्वाच्या कारणाचा शोध घ्यायचा ठरवला तेव्हा तिथल्या मुळ गावकऱ्यांनी एका झाडाला जबाबदार धरलं.

 

हे ही वाचा – विश्वास बसणार नाही, पण भारतातील या गावात स्त्रिया चक्क ५ दिवस निर्वस्त्र राहतात

ह्या झाडाचं नाव, Lavujueja आहे. संपूर्ण Titlepek गांवाच्या भोवती मोठ्या प्रमाणात ही झाडं आहेत. संशोधकांनी ह्या दृष्टिकोनातून संशोधन केलं तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की, एका झाडामुळे अंधत्व येणं, हा गावकऱ्यांचा निव्वळ एक गैरसमज आहे आणि ह्या आंधळेपणा मागचं कारण काही वेगळंच आहे.

त्या नंतर, संशोधकांनी आपल्या संशोधनाच्या कक्षा वाढवल्या व तिथे आढळणाऱ्या एकूण एक घटकाचा अभ्यास केला. अगदी गवतापासून, तिथल्या डासाच्या प्रजाती पर्यंत सगळं संशोधकांच्या अभ्यासाचा एक भाग होतं. ह्या संशोधनातून एक गोष्ट अशी लक्षात आली, की  Titlepek मध्ये माश्यांची एक अनोखी प्रजाती आढळते, जी जगात कुठेच बघायला मिळत नाही.

 

 

ह्या माश्या इतक्या विषारी असतात कि एक डंख सुद्धा आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतो. तिथल्या सजीवांच्या अंधत्वाचं कारणही ह्याच माश्या होत्या. ह्या माश्या डासांसारख्या, मनुष्य, प्राणी, पक्षी ह्या सगळ्यांच्या हमखास संपर्कात येतात तिथल्या जैवविविधतेचा त्या एक भागच आहेत.

ह्याच माश्या सजीवांना दंश करतात व त्यांच्यातील विष हे सजीवांच्या शरीरात हळू हळू भिनयला लागतं. ह्या विषाने इतर कुठल्याही अवयवाला इजा पोहचत नाही, पण हळू हळू दृष्टी जाऊ लागते. हे विष, सजीवांच्या डोळ्यासंबंधी समस्त रक्तवाहिन्यांना जॅम करून टाकतं आणि डोळ्यांना नीट रक्तपुरवठा न झाल्याने अंधत्व येतं. तिथले असलेला एकूण एक सजीव कधीना कधी ह्या माश्यांच्या संपर्कात येतोच व आपली दृष्टी गमावून बसतो.

माश्यांच्या विषाचं रहस्य उलगडण्याआधी संशोधकांना तिथलं हवामान व गावकऱ्यांची आहाराची पद्धतच ह्या अंधत्वाला कारणीभूत असू शकते असा अंदाज होता. कारण गावकरी फक्त मिर्ची; बाजरा, ज्वारी, मका आणि काही डाळींशिवाय दुसऱ्या कोणत्याच भाज्यांचा किंवा फळांचा ही  माणसं आपल्या आहारात समावेश करून घेत नाहीत. त्यांची दिनचर्या पण गाणी म्हणत सुरु होते व रात्री सोबत जेवण करून, नाचत गाणी गातच संपते.

 

 

तिथले माणसं अजूनही लाकडाच्या शास्त्रांचा वापर करतात व कोणताही ऋतू असो, दगडांवरच झोपतात. कारण दगडांतून कोणताही जीव, किडा कीटक वर येऊन अजून इजा पोहचवू शकत नाही. इथले पक्षी सुद्धा उंच उडताना दिसत नाहीत कारण, आंधळेपणामुळे उडताना झाडावर आदळतात आणि त्यांचा मृत्यू होतो.

जन्माला येतात तेव्हाच जे जगाचं दर्शन घडतं ते शेवटचं बाबी त्यानंतर त्यांच्या आयुष्यात उरतो तो फक्त अंधार. पण तरीही ही माणसं उदास नसतात, हसतात, गातात, आणि जीवन जगत राहतात.

===

हे ही वाचा – पोटच्या पोराची ‘अशी’ दशा करणारी ही प्राचीन परंपरा आजही अंगावर काटा आणते…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version