आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सध्या सगळीकडे आणि खासकरून फेसबुकवर एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे स्नेहा भोसले! कोण आहे ही स्नेहा भोसले? कुणी सेलिब्रिटी आहे का? असं नेमकं काय केलंय तीने की सगळ्या फेसबुकवर न्यूजफिडमध्ये हीचंच नाव दिसत आहे?
तर मित्रहो ही स्नेहा भोसले म्हणजे एक फेक फेसबुक अकाऊंट आहे, हो हो अगदी बरोबर ऐकलंत. या मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊंट उघडून चक्क या मुलीने कित्येक मुलांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे.
या फेक प्रोफाइलच्या माध्यमातून सध्या बऱ्याच मुलांना फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि बरेचसे म्युच्युअल फ्रेंड लिस्टमध्ये दिसल्याने लोकांनी तिला आपलं फ्रेंड बनवलं.
नंतर याच प्रोफाइलवरुन एक मेसेज मुलांना गेला. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी याच अकाऊंटतर्फे मुलांकडे पैसे मागितले गेले, सोबत बँक डिटेल्ससुद्धा दिले होते.
===
हे ही वाचा – इंटेरनेटच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करताना ‘ह्या’ गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी!
===
शिवाय ही कुणी खरी मुलगी आहे आणि खूप भावनिक होऊन ती आपल्याशी बोलत आहे आणि कित्येक गरजू लोकांना ती मदत करू इच्छिते, असं समजून कित्येक लोकांनी तिच्या दिलेल्या खात्यात ५०, १००, ५०० पासून अगदी ५०००० रुपयांपर्यंत मदत केली!
आता असं समोर आलं आहे की अशी कुणी मुलगी नाही तर ते एक फेक प्रोफाइल होतं ज्यांचा मूळ उद्देश होता लोकांकडून आणि खासकरून मुलांकडून पैसे लुबाडायचे.
असे कित्येक महाशय सध्या फेसबुकवर सापडतील ज्यांनी या मुलीला पैसे दिले आणि आता डोकेफोड करत आहेत. त्यापैकीच एका व्यक्तीने तिचा अनुभव शेअर केला आहे.
रवी शेजूल नामक एका तरूणाकडून या स्नेहा भोसलेने २००० रुपये उकळले आणि हे खोटं असल्याचं त्याला समजलं तेव्हा त्याने फेसबुक वॉलवर त्याचा अनुभव मांडला!
गरजूंना मदत करणारी आणि अत्यंत भावनिक होऊन बोलणाऱ्या या मुलीच्या जाळ्यात आणखी किती लोकं फसलेत ते देवच जाणे.
रवी शेजूल यांनी “ती तर मुलगी होती २००० रुपयांची मदत केली, त्याऐवजी एका मुलाने मदत मागितली असती तरी १००० रुपयांची मदत मी केलीच असती” असंही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अगदी छातीठोकपणे म्हंटल्याचं दिसून येत आहे!
या पोस्टवर लोकांनी रवी शेजुल याला बरंच ट्रॉल केलं शिवाय मुलगी होती म्हणून २००० रुपये आणि मुलगा असता तर १००० रुपये दिले असते यावरूनसुद्धा लोकं त्याला खूप ट्रॉल करतायत.
पाहूया यावर आलेल्या काही भन्नाट कॉमेंट्स आणि मीम्स!
खरंतर फेसबुकच्या माध्यमातून इतका मोठा गफला हा काही पहिल्यांदा झालेला नाही, अशी कित्येक लोकं आधीही फसली आहेत. तरीही लोकं अजूनही कोणत्याही प्रकारचे पैशाचे व्यवहार ऑनलाइन करताना सगळी शहानिशा करत नाहीत आणि अशा लोकांच्या जाळ्यात अडकतात!
आपण सगळेच सोशल मीडियाला इतके सराईत झालो आहोत की कोणती प्रोफाइल फेक आणि कोणती खरी हे चटकन ओळखता यायला हवं, किंवा ते जरी जमलं नाही तरी असे आर्थिक व्यवहार करताना डोळे उघडे ठेवून करायला हवेत.
===
हे ही वाचा – फेक सोशल मिडिया अकाऊंट : कोण? कसं? कधी? का तयार करतं?
===
अशा आणखीन किती स्नेहा भोसले या फेसबुकवर अॅक्टिव आहेत कुणास ठाऊक, अगदी या पोस्ट मध्ये म्हंटल्याप्रमाणे “एक मैत्रीण म्हणून जवळ आली आणि लोकांना कित्येक हजारांचा चुना लावून गेली”!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.