आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोणतीही माहिती सहज उपलब्ध होऊ शकणाऱ्या आजच्या जगात काही गुन्हेगारांचं आयुष्य गूढ राहू शकतं ही एक आश्चर्याची बाब आहे. कित्येक वर्षांपासून आपण दाऊद इब्राहिमचे फक्त शारजा क्रिकेट स्टेडियम वरचे फोटोच फक्त बघत आलो आहोत. तो कधीच का पकडला गेला नाही?
गुन्हेगारांच्या या यादीत नंतर भर पडली ती भारतीय कर्ज बुडवून विदेशात जाऊन स्थायिक होणाऱ्या निरव मोदी, विजय माल्या सारख्या लोकांची.
गुप्तहेर संस्था यांच्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवून असतात. पण, ही माहिती आणि विदेशातील कायदे या लोकांना शिक्षेपर्यंत नेऊ शकत नाहीत आपलं दुर्दैव म्हणावं लागेल.
गुन्हेगारांच्या या यादीत ‘सुकुमार कुरूप’ हे एक नाव आहे जे कदाचित आपण ऐकलं नसावं. ३७ वर्षांपूर्वी केरळमध्ये या गुन्हेगाराने उच्छाद मांडला होता.
‘के जे चॅको’ या टॉलीवूड मधील निर्मात्याचा खून करण्याच्या गुन्ह्यात सुकुमार कुरूपचं नाव आजही मोस्ट वॉन्टेड केरळच्या गुन्हेगारांच्या यादीत आहे.
सुकुमार कुरूपच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेला ‘कुरूप’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. केरळच्या नॅशनल हायवेवर झालेल्या या खुनाबद्दल या आधी १९८४ मध्ये सुद्धा ‘NH-47’ हा सिनेमा तयार करण्यात आला होता.
===
हे ही वाचा – बेमालुमपणे हत्या करणा-या या चर्चच्या प्रेसिडेंटची कथा भयपटाहूनही थरारक आहे!
===
काय आहे या सुकुमार कुरूपची गोष्ट?
के जे चॅको हा केरळ मधील एक निर्माता होता. आपल्या गरोदर पत्नी ला घरी ठेवून चॅको हा केरळच्या टॉकीज मालकाला भेटायला गेला होता. तिथलं काम झाल्यावर चॅको हे घरी परत येण्यासाठी निघाले होते.
केरळच्या नॅशनल हायवे वर असतांना चॅको यांची ट्रॅफिक जाम मध्ये कार खराब होते. त्यांना ३ लोक काळ्या रंगाच्या अँबेसेडर कारमध्ये लिफ्ट देतात. ही कार थोड्या वेळात एका अज्ञातस्थळी पोहोचते. कार मधील इतर ३ लोक खाली उतरतात आणि कारला ‘चॅको’ सकट जाळून टाकतात.
शवविच्छेदनाच्या अहवालात पोलिसांच्या असं लक्षात येतं की, या व्यक्तीला आधी दारू पाजून मारण्यात आलं आहे आणि मग गाडीत बसवून जाळण्यात आलं आहे.
संशय तेव्हा पक्का झाला जेव्हा कारजवळ पोलिसांना एक काडेपेटी सापडली, एका बुटाची जोडी आणि ग्लोव्हज सापडले. आजूबाजूच्या परिसरात त्याच बुटाचे चिखलात ठसे उमटलेले होते.
मावेलीकारा या केरळच्या पोलीस स्टेशन ला २२ जानेवारी १९८४ रोजी पहाटे ४ वाजता एका व्यक्तीने या कार बद्दल येऊन माहिती दिली आणि तिथून हा शोध सुरू झाला.
दक्षिणेकडील एखाद्या सिनेमात एखादा सीन आपण बघितलेला असावा. पण, हे प्रत्यक्षात घडलं होतं. आपल्या गरोदर पत्नीपर्यंत चॅको हा कधीच पोहोचू शकला नाही. सुकुमार कुरूप त्याचा भाऊ भास्कर पिल्लई आणि ड्रायव्हर पुंजपन या तिघांनी मिळून हे कृत्य केलं होतं.
चॅकोला सुकुमारने का मारलं?
सुकुमार आणि त्याचा गल्फ मध्ये राहणारा मित्र शाहू यांनी एक प्लॅन केला होता. सुकुमार कुरूपच्या नावावर त्यांनी मोठ्या रकमेची इन्श्युरन्स पॉलिसी काढली होती. सुकुमार कुरूपच्या मरण्या नंतरच ही इन्शुरन्सची रक्कम त्याच्या मित्रांना मिळणार होती.
ही रक्कम घेऊन कुरूपला आपल्या घराच्या बांधकामासाठी लागणार होती. एखाद्या सिनेमात दाखवतात तसं, कुरूपला कसंही करून स्वतःला ‘मृत’ घोषित करायचं होतं.
हे साध्य करण्यासाठी त्यांना साधारणपणे त्याच्याच उंचीची, वयाच्या व्यक्तीच्या विद्रुप मृतदेहाची आवश्यकता होती. ‘के जे चॅको’ ही त्यांना सर्वार्थाने योग्य व्यक्ती सापडली होती.
त्यांनी योग्य वेळ आणि जागा निवडली आणि चॅकोला आपल्या गाडीत बसवलं. कार जाळली आणि हे सिद्ध केलं की या दुर्घटनेत सुकुमार कुरूपचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झाला होता चॅकोचा जे की पोलिसांना कालांतराने लक्षात आलं. तोपर्यंत सुकुमार कुरूप गल्फ मध्ये पळून गेला होता.
३७ वर्षात एकदासुद्धा सुकुमार कुरूपचा कुठेच चेहरा दिसलाय ना त्याच्याबद्दल कोणता सुगावा पोलिसांच्या हाती लागला आहे. जिवंत असेल तर सुकुमार कुरूप हा पोलिसांच्या माहितीनुसार ७४ वर्षांचा असेल.
सुकुमार कुरूप हे त्याचं बदललेलं नाव होतं. पासपोर्ट वर त्याचं नाव गोपालक्रिष्ण कुरुप हे आहे म्हणून तो भारताबाहेर पडू शकला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
काही वर्षांपासून एक गोष्ट परत अधोरेखित होत आहे की, परदेशात जातांना कुठे तरी तुमच्यावरील कर्ज, गुन्हे याबद्दल सुद्धा एखादा चेकपॉइंट असावा. हे इतर देशांमध्ये आहे म्हणून तिथे कोणी अशी हिंमत करत नाहीत.
सुकुमार कुरूपचं पूर्व आयुष्य कसं होतं?
गोपालक्रिष्ण कुरुपची एअरफोर्समध्ये नोकरी करण्यासाठी निवड झाली होती. ते काम आवडलं नाही म्हणून कुरुप ते काम सोडून घरी परतला. घरी परतल्यावर त्याने एअर फोर्सला मित्राच्या नावाने टेलिग्राम पाठवून हे कळवलं की, गोपालक्रिष्ण कुरुपचा मृत्यू झाला आहे.
===
हे ही वाचा – महाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा खटला आजही अनेकांची झोप उडवतो!
===
चेंगानूर या केरळमधील गावाचे पोलीस जेव्हा या घटनेची शहानिशा करायला आले तेव्हा त्यांना पैसे देऊन शांत करण्यात आलं.
गोपालक्रिष्ण कुरुप हा रेकॉर्डमध्ये मृत झाला होता आणि त्याच व्यक्तीला सुकुमार कुरूप या नावाने दुसरा पासपोर्ट देण्यात आला. त्यासाठी त्याने सर्व कागदपत्र त्या नावावर बदलली.
इथे पुन्हा एकदा आपल्या भारतीय सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. की, हाताचे ठसे, डोळ्यांचा स्कॅन हे तेच असून असं कसं घडू शकतं?
सुकुमार कुरूप या नवीन पासपोर्टने दुबईला गेला. अबुधाबी मध्ये त्यांनी एका पेट्रोलियम कंपनीत नोकरी मिळवली. काही वर्षात आपल्या पत्नीला तिथे नेलं. तिला नर्स म्हणून नोकरी मिळवून दिली. सुकुमारने तिथे एक इन्शुरन्स पॉलिसी काढली.
झटपट श्रीमंत होण्याची इच्छा असलेल्या सुकुमारला आपल्या पॉलिसीच्या रकमेवर डोळा होता. ही रक्कम मिळवण्यासाठी त्याचा भाऊ, मित्र आणि दुबईच्या इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीने हात मिळवणी केली.
त्याच्या सारखी दिसणारी व्यक्ती ‘चॅको’ ही सापडल्यावर त्यांनी दुबई मधील एका मेडिकल कॉलेज मधून ‘इथर’ मिळवलं. इथर पाजल्या नंतर एखाद्या व्यक्तीस जाळलं तर ती लवकर जळते असं त्यांना कळलं होतं.
चॅको सोबत त्यांनी सर्व गोष्टी त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे केल्या. पोलिसांना जेव्हा जळलेली कार सापडली, तेव्हा कारचा मालक ‘भास्कर पिल्लई’चं नाव समोर आलं. त्याच्या पायावर दिसलेल्या जळण्याचे मार्क बघून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पूर्ण माहिती भास्कर पिल्लई कडून काढून घेतली.
इन्शुरन्सचे पैसे घेऊन सुकुमार कुरूपला आपलं अर्धवट बांधकाम झालेलं घर बांधायचं होतं. ती जागा आजही तशीच पडून आहे.
१९८४ पासून सुकुमार कुरूप हा ‘मिसिंग’ म्हणून घोषित आहे. भारतातील प्रत्येक पोलीस स्थानकात सुकुमार कुरूप बद्दल माहिती देण्यात आली आहे. त्याच्या सारख्या दिसणाऱ्या कित्येक लोकांना अटक करण्यात आली आहे.
पण, त्यापैकी कोणीही खरा सुकुमार कुरूप नाहीये हे सुद्धा सिद्ध झालं आहे. प्लास्टिक सर्जरी करून सुकुमार कुरूपने आपला चेहरा, हाताचे ठसे बदलले असावेत असा अंदाज आहे.
भास्कर पिल्लई आणि ड्रायव्हरला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आज ते दोघेही आपली शिक्षा भोगून केरळ मध्ये वास्तव्यास आहेत.
सुकुमार ज्याने एका इंग्रजी डिटेक्टिव्ह मासिकात वाचून हा प्लॅन केला तो आज निवांत आयुष्य जगत असावा असं चेरीनाड या केरळ मधील गावाचे लोक बोलतात.
चॅको यांच्या खुनाच्या तपासाची जबाबदारी असलेले डी वाय एस पी हरिदास हे सेवानिवृत्त झाले. ते आज ८४ वर्षाचे आहेत. या खुनाचा ते पूर्णपणे छडा लावू न शकल्याचं शल्य त्यांना आजही आहे.
सुकुमारला त्याचे मित्र केरळ मध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन द्यायचे आणि त्याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्याला साथ द्यायचे. सुकुमार ने या सर्वांची मदत घेऊनच चॅकोला मारलं असं निवृत्त पोलीस अधिकारी हरिदास यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
===
हे ही वाचा – या निरागस चेहऱ्याने कित्येक महिलांना ज्या यातना दिल्यात त्या बघून अंगावर काटा येतो!
===
सुकुमार कुरूप आणि पोलीस यांच्यात हा चोर-पोलीसचा खेळ आजही सुरू आहे. या सर्वात चॅको परिवाराचं खूप मोठं नुकसान झालं ज्याची भरपाई कोणतीही रक्कम करू शकत नाही.
सुकुमार कुरूप किंवा तत्सम गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी जेणेकरून आपल्या स्वप्नांसाठी कोणी इतरांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा विचार सुद्धा करणार नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.