Site icon InMarathi

हवामान खातंही अचंबित…!! मंदिर अचूकरित्या वर्तवते पावसाचा अंदाज…

jagannath mandir featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतात अनेक शतकांपासूनची मंदिरं, स्मारकं, स्तंभ आहेत जे संपूर्ण जगाला नेहमीच आकर्षित करतात. भारतातील मंदिरं ही अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहेत.

भारतीय मंदिरं ही केवळ पूजेची आणि प्रार्थनेची स्थळं नसून प्रत्येक प्राचीन मंदिराच्या गर्भगृहात जाऊन मनुष्याची आणि निसर्गाची ऊर्जा एका लयीत येते, असंही मानलं जातं. घंटानाद, शंखनाद, सुवासिक धूप, कापूर, फुलं यामुळे वातावरणाची शुद्धी होऊन मनाची मरगळ निघून, आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

मंदिरात उभं राहून हात जोडून नामस्मरण केल्याने चित्त एकाग्र होऊन, स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. काही मंदिरांत जाऊन विशिष्ट आजार बरे होण्याची सुद्धा उदाहरणं आहेत.

 

 

प्रत्येक मंदिरातील पूजेचे विधी तिथलं वातावरण, लोकांचं राहणीमान, व्यवसाय यांवर अवलंबून असतात. त्यामुळे प्राचीन भारतीय मंदिरं केवळ श्रद्धेची ठिकाणं नसून शिक्षणाचे स्रोत आहेत हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

भारतात हजारो प्राचीन मंदिरं आहेत, त्यातील काही मंदिरात विज्ञानाला आव्हान दिलं जातं, तर काही मंदिरात अलौकिक अनुभव येऊन माणूस तृप्त होतो.

काही मंदिरं शिल्पकलेचा तर काही मंदिरं उत्तम स्थापत्यशास्त्र आणि इंजिनियरिंगसाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ – खजुराओची मंदिरं आपल्या शिल्पकलेसाठी, कोणार्कचं सूर्य मंदिर आपल्या मोठ्या प्राचीन घड्याळासाठी, हिमालयातील ज्वाला देवी मंदिर चमत्कारिक निरंतर पेटणाऱ्या नैसर्गिक वाती/ज्वालांसाठी, आसाममधील त्रिपुरसुंदरी मंदिर दर महिन्याला देवीला होणाऱ्या रजस्रावामुळे मूर्तीतुन फक्त ३ दिवस लाल जलस्त्रावासाठी, दक्षिणेची मंदिरं आपल्या सुंदर शिल्प कलांसाठी…

 

 

अशी अनेकानेक मंदिरं आपल्या डोळे दिपवणाऱ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना भेट दिल्यावर, दोन प्रचिती नक्की येतात; एक म्हणजे देव नक्की आहे ज्यामुळे असे अनेक चमत्कार होत आहेत किंवा आपले पुर्वज इतके पुढारलेले आणि प्रगत होते की त्यांच्या ज्ञानाला काहीच तोड नाही.

जगन्नाथाचं असंच एक मंदिर आहे, जे आपल्या हवामानाचा अचूक अंदाज लावण्यासाठी प्रसिद्ध आहे.

===

हे ही वाचा – हे मंदिर बंद असतानासुद्धा यातून होणारा प्रचंड घंटानाद जगाला बुचकळ्यात टाकतो…

===

उत्तरप्रदेशच्या, कानपुर जिल्ह्यात असलेल्या भितरगांव घाटमपुर येथे भगवान जगन्नाथाचे शंभर वर्षांपेक्षा जुने असलेले एक असे मंदिर आहे, जे मान्सून येण्याच्या १०-१५ दिवसांआधीच पावसाचे संकेत देते.

हवामानखात्यापेक्षाही अचूक अंदाज असलेल्या ह्या मंदिराच्या गोल घुमटाकाराच्या छप्परातून मान्सून आगमनाच्या १०-१५ दिवसांआधीपासूनच आपोपाप पाणी गळू लागतं.

पाणी किती गळतं आणि थेंब किती मोठे किंवा लहान आहेत यावरून मान्सूनचा अंदाज लावला जातो. पाणी जास्त गळत असेल आणि थेंब चांगले टपोरे असतील तर त्यावर्षी मान्सूनचा पाऊस जास्त मोठा असतो. लहान थेंब असले आणि पाणी कमी गळलं की त्यावर्षी कमी पाऊस किंवा चक्क दुष्काळ पडल्याचं इथल्या स्थानिकांकडून सांगितलं जातं.

 

 

पाणी का गळतं

गावातील लोक पिढ्यानपिढ्या ह्या मंदिराच्याच संकेतांवरून पेरणी आणि इतर शेतीची कामं करत आले आहेत. मंदिरातील पाणी गळण्याचा आणि पावसाचा किंवा विज्ञानाचा काय संबंध, ही केवळ एक अंधश्रद्धा किंवा योगायोग असावा असं ही वाटू शकतं. पण देश- विदेशातील अनेक वैज्ञानिक, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीचे प्रोफेसर ह्यांनी मंदिरावर रिसर्च केला आहे आणि अजूनही संशोधन करत आहेत.

आजही ते पाणी का आणि कसं गळतं याचं ठोस कारण कोणालाच उमगलेलं नाही. त्यांच्या अभ्यासानुसार त्यांनी जे तर्क लावले त्यांनुसार मंदिराच्या छप्पराची रचना आणि बांधणी अशी केलेली आहे की मान्सूनपूर्वीची उष्ण हवा तिथे अडते आणि पाणी गळू लागतं.

एकदा मान्सून सुरु होऊन संपला, की परत पुढील वर्षापर्यंत तिथे एक थेंब सुद्धा पाणी सापडत नाही. मंदिराच्या निर्मितीसाठी वापरलं जाणारं साहित्य सुद्धा वेगळं असून त्यात चुन्याचा वापर जास्त आहे.

मंदिराचा इतिहास

ह्या मंदिराच्या निर्माणाबद्दल अजून कोणतेच संशोधक ठोस मतापर्यंत पोचू शकलेले नाहीत. काहींच्या म्हणण्यानुसार ह्या मंदिराची मुळ निर्मिती जरी इसवीसन पूर्व २००० च्या पूर्वीची असली, तरी ११ ते १३ व्या शतकादरम्यान त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत या मंदिराची निर्मिती झालेली आहे.

मंदिराच्या भिंती १४ फूट जाड आहेत आणि गर्भगृहाचं क्षेत्रफळ ७०० स्क्वेयर फूट इतकं आहे. मंदिराच्या स्तंभांवरील मोर आणि चक्रांच्या कोरीवकामामुळे या मंदिराचा राजा हर्षवर्धनच्या काळात एकदा जिर्णोध्दार झालेला असावा असं सुद्धा संशोधकांचं मत आहे.

 

 

हे मंदिर भारतातील इतर जगन्नाथ मंदिरापेक्षा खूपच वेगळं आहे. इतर भगवान जगन्नाथ मंदिरांत भगवान श्रीकृष्ण, त्यांचे ज्येष्ठ बंधू बलराम आणि लहान बहीण सुभद्रा आशा तीन मूर्ती असतात. पण ह्या मंदिरात केवळ भगवान श्री कृष्ण आणि बलराम ह्यांच्याच प्रतिमा आहेत.

अनेक यात्रा आणि उत्सवांचे आयोजन दर वर्षी या मंदिरात केले जाते. जुलैमध्ये पुरीच्या जगन्नाथ उत्सवावेळी ह्या मंदिरात सुद्धा उत्सव साजरा केला जातो. पुरी प्रमाणेच इथे सुद्धा रथ यात्रेचे आयोजन केले जाते.

भाविक भगवान जगन्नाथाचा रथ स्वतः ओढून गावातून मिरवणूक काढतात. कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेसही या मंदिरात मोठी यात्रा भरते. मोठ्या भक्ती भावाने भाविक या मंदिरात येऊन जगन्नाथाची पूजा करतात.

ह्या मंदिरात येणारे अधिकतर भाविक शेतकरी आहेत. आणि हेच शेतकरी पावसाळ्याआधी नीट पाऊस पडावा आणि आपल्या पिकाची नीट वाढ व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.

अनेक वेळा जीर्णोद्धार करून अजूनही त्याचं पाणी गाळण्याचं तंत्र, अजूनही अबाधित आहे. अजूनही इतक्या शतकांनंतर सुद्धा अचूक अंदाज वर्तवणारं हे जगन्नाथाचं मंदिर ह्या आधुनिक काळात, २१ व्या शतकात अनेक समज – गैरसमज, विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी एक चॅलेंज आहे.

 

 

ह्या मंदिरांना सोडून आपण अनेक परदेशाच्या यात्रा करतो. कराव्या, पण ह्या मंदिरांना भेट देऊन आपले पुर्वज किती प्रगत होते ह्याकडे पण कौतुकाने बघावं म्हणजे संस्कृती सुद्धा जपली जाईल व आपली मंदिरं सुस्थितीत राहतील.

===

हे ही वाचा – या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version