आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सत्ता मिळवण्यासाठी कोण काय काय करू शकतं हे आपल्याला माहीतच आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असलेल्या आपल्या भारतात सत्ता, राजकारण, गादी, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, डावपेच हा बहुतांश लोकांचा आवडीचा विषय आहे.
भारतातच नाही तर जभरातील लोकांमध्ये सत्तेचं नेहमीच आकर्षण बघण्यात आलं आहे. २००० वर्षांपूर्वी ‘मिस्र’ (आजचा इजिप्त) देशात एक राणी होऊन गेली होती तिचं नाव होतं, ‘क्लिओपात्रा.’ सत्तेवर टिकून राहण्यासाठी या राणीने जे केलं ते वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल.
जगातील सर्वात सुंदर व्यक्तींपैकी म्हणून गणल्या जाणाऱ्या क्लिओपात्राची जीवनकथा सुद्धा तितकीच रंजक आहे. इसवीसन पूर्व ५१ मध्ये इजिप्त मध्ये टॉलेमी यांचं राज्य होतं. मूळचे ग्रीस देशाचे नागरिक असलेल्या टॉलेमी यांनी अलेक्झांडर राजाच्या मृत्यूनंतर इजिप्तवर आपली सत्ता स्थापित केली होती.
राजाच्या मृत्यूनंतर देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्या मुलीवर क्लिओपात्रावर येऊन ठेपली. इसवीसन पूर्व ६९ मध्ये जन्म झालेल्या क्लिओपात्राने ही जबाबदारी आपल्या लहान भावासोबत स्वीकारली.
त्या काळात राजघराण्याचे सूत्र इतर घरांमध्ये जाऊ नयेत असा एक विचार जगाच्या त्या भागात प्रचलित होता. हे कारण होतं, ज्यामुळे क्लिओपात्राने आपल्या लहान भावासोबत लग्न केलं आणि सत्तेचा दावा केला.
क्लिओपात्राची ओळख ही नेहमीच सुंदर दिसणारी, केसांमध्ये मणी घालणारी, डोक्यावर टोप असणारी अशी नोंद इतिहासकारांनी केली आहे. इजिप्तच्या ममीवर, नाण्यांवर एक चेहरा आपण बघितला असेल तो क्लिओपात्राचा आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा –
===
आपल्या कार्यकाळात क्लिओपात्राने हे सिद्ध केलं की, एक महिला सुद्धा देशाचं नेतृत्व करू शकते.
देशाचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असलेली हुशारी आणि प्रसंगी लागणारी क्रूरता या गोष्टी महिला सुद्धा आत्मसात करू शकतात हे क्लिओपात्रा ने जगाला त्या काळात दाखवून दिलं होतं.
क्लिओपात्रा च्या वडिलांनी सुद्धा आपल्या बहिणी सोबतच लग्न केलं होतं अशी नोंद काही इतिहासकारांनी करून ठेवली आहे. आपल्याच घरात लग्न केल्याने ज्या आनुवंशिक समस्या उदभवतात त्या २००० वर्षांपूर्वीसुद्धा होत्या.
त्या काळातील लोकांना त्याचं ज्ञान नव्हतं. राजघराण्याची गादी कधी दुसऱ्या घरात जाऊच नये म्हणून प्रत्येक राजा, राणी हे नेहमीच घरातील भाऊ, बहिणी यांच्या सोबतच लग्न करायचे. क्लिओपात्राने तर यापुढे जाऊन आपल्यापेक्षा लहान दोन भावांसोबत लग्न केलं होतं.
सौंदर्यापेक्षा ‘स्मार्ट’ राणी:
फेब्रुवारी २००७ मध्ये एक नाणं प्रकाशित करण्यात आलं होतं. हे नाणं बघून जाणकारांनी हे मत नोंदवलं होतं की, क्लिओपात्रा ही काही एलिझाबेथ राणीसारखी सुंदर नव्हती. पण, ती या सर्वांपेक्षा ‘स्मार्ट’ होती.
ती नऊ भाषा बोलू शकत होती. क्लिओपात्राने गणित, अर्थशास्त्र, औषधीशास्त्र सारख्या विषयांचा अभ्यास लहानपणीच केला होता. आपल्या देशातील लोकांच्या भाषेसोबतच क्लिओपात्राने शेजारच्या देशातील म्हणजेच अरबी, ज्यू, सीरिया, एथोपिया यासारख्या सर्व भाषांचं तिला ज्ञान होतं.
इजिप्तच्या लोकांची स्थानिक भाषा असलेल्या ग्रीक भाषेचं ज्ञान क्लिओपात्राने राणीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर घेतलं होतं. आपल्या लोकांच्या सांस्कृतिक भावना नेहमीच जपल्या होत्या. पण, तरीही राजघराण्यात सारं काही आलबेल नव्हतं.
आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार भावांशी लग्न केलेल्या क्लिओपात्राचं आपल्या भावांसोबत अजिबात पटत नव्हतं. क्लिओपात्राचा लहान भाऊ हा तिच्या जीवावर उठला होता इतके त्यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते.
त्यावेळी तिने रोमचा राजा ज्युलियस सीझरकडे मदतीची याचना केली होती. सीझरने पूर्ण शक्तीनिशी इजिप्तवर आक्रमण केलं आणि त्या युद्धात क्लिओपात्राच्या एका भावाला हरवलं.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नाईल नदी मध्ये उडी मारणाऱ्या क्लिओपात्राच्या एका भावाचा मृत्यू झाला. तेव्हा दुसऱ्या भावासोबत लग्न करून क्लिओपात्राने त्याला देखील विष देऊन मारलं.
इतकंच नाही तर आपल्या सख्ख्या बहिण अरसिनोचा सुद्धा क्लिओपात्राने सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धक नको म्हणून काटा काढला होता.
सीझर चा रोल इथे संपला नव्हता. इथून रोल सुरू झाला होता. क्लिओपात्रा ही सीझरच्या युद्ध कौशल्य आणि व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडली होती. आपल्या मोहक सौंदर्य आणि संभाषण कौशल्याने क्लिओपात्राने सीझरवर भुरळ घातली होती.
इजिप्तमधील वास्तव्यात या दोघांना एक मूल झालं होतं. युद्ध संपल्यावर ज्युलियट सीझर परत आपल्या देशात परतला होता. पण, क्लिओपात्रा त्याच्या शिवाय राहू शकत नव्हती. तिने त्यांच्या मुलाला घेऊन रोम ला जाण्याचा निर्णय घेतला.
दोन वेळा आधी विवाहित असलेल्या सीझरने क्लिओपत्राचा तितक्याच सन्मानाने स्वीकार केला.
आपल्या विशिष्ट पद्धतीच्या राहणीमानामुळे क्लिओपात्रा रोममध्ये एक ‘फॅशन आयकॉन’ म्हणून महिलांमध्ये लोकप्रिय होत होती. कित्येक जणींनी तिच्यासारखं रहायला, दागिने वापरायला सुरुवात केली.
रोम मधल्या पुरुषांनी नेहमीच क्लिओपात्राला विरोध केला. हा विरोध इतका वाढला की, रोमच्या लोकांनी सीझरवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ज्युलियट सीझरचा मृत्यू झाला. या घटनेचा भावनिकपणे न विचार करता क्लिओपात्राने आपलं लक्ष फक्त सत्तेवर केंद्रित केलं होतं.
हे ही वाचा –
===
क्लिओपात्राला रोमच्या गादीवर आपल्या मुलाने बसावं अशी इच्छा होती. सोबतच, आपली इजिप्तची सत्ता टिकून रहावी यासाठी क्लिओपात्रा ने रोम च्या जनरल अँटनीचा उपयोग करून घेण्याचं ठरवलं. आपल्या सौंदर्याच्या जोरावर क्लिओपात्राने अँटनीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं.
इजिप्त मध्ये राज्य करत असताना क्लिओपात्राने अत्तर तयार करण्याचं काम सुरू केलं होतं. आपल्या रसायनशास्त्राच्या अभ्यासाच्या जोरावर तीने असे काही अत्तर तयार केले होते ज्याचा वास घेतला की, तुमच्यावर मोहिनीविद्या केल्यासारखं शरीर प्रतिसाद करतं.
याच अत्तराचा वापर करून तिने अँटनीला मोहित केलं होतं. अँटनी आता क्लिओपात्राच्या इशाऱ्यावर काम करू लागला होता. अँटनी हा ज्युलियट सीझर चा जावई होता आणि आपल्या सख्ख्या मेहुण्याला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तो क्लिओपात्रा ची मदत करत होता.
लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी त्या दोघांनी मिळून एका ‘ड्रिंक्स क्लब’ ची स्थापना केली. दोघांमधील जवळीक वाढली. अँटनी आणि क्लिओपात्राने लग्न केलं. या दोघांना ३ आपत्य झाली.
रोम मधील लोकांनी या नात्याचा आणि त्यांच्या समाजातील कृत्यांचा तीव्र निषेध केला होता.
रोमन जनतेने क्लिओपात्रा आणि अँटनी विरुद्ध इजिप्त वर युद्ध पुकारलं. इजिप्तच्या सैन्याच्या मदतीने क्लिओपात्रा ने या युद्धाचा प्रतिकार केला. पण, सीझरच्या मुलाच्या सैन्यासमोर अँटनी आणि इजिप्तचं सैन्य फार काळ तग धरू शकलं नाही.
इजिप्त मध्ये ‘देवाचा पुनर्जन्म’ म्हणून स्वतःला घोषित करणाऱ्या क्लिओपात्राने या युद्धाला एक दैवी युद्ध घोषित करून अधिकाधिक लोकांना तिची साथ देण्याचं आवाहन केलं.
अँटनी आणि क्लिओपात्रा हे युद्ध हरले आणि दोघांनाही जेल मध्ये डांबून ठेवण्यात आलं. अँटनीने स्वतःच्या पोटात वार करून आत्महत्या केली, तर क्लिओपात्राचा मृत्यू हा तुरुंगातच एका सर्पदंशाने झाला.
इतिहासकारांनी याबद्दल ही पण शक्यता वर्तवली आहे की, क्लिओपात्रा ही आपल्या केसांना जी क्लिप लवायची ती विषारी असायची आणि ती चाटून तिने आपला जीव घेतला.
कायम तरुण राहण्याची इच्छा असलेल्या क्लिओपात्राने त्या काळात प्लास्टिक सर्जरीसारखी पद्धत स्वतःच्या चेहऱ्यावर अवलंबली होती आणि तिने चिरतरुण रहाणं साध्यसुद्धा केलं होतं. मृत्यूच्या वेळी क्लिओपात्राचं वय केवळ ३९ वर्ष इतकं होतं.
आपली प्रत्येक इच्छा कोणत्याही मार्गाने पूर्ण करून घेण्याची कसब असलेल्या क्लिओपात्राचं स्वतंत्र इजिप्तचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. क्लिओपात्राच्या मृत्यू नंतर ऑगस्टस या राजाने इजिप्तचा राज्य कारभार सांभाळला होता.
राज्य कारभार सांभाळताना आपल्या नावाने एक ‘महिना’ असावा अशी ऑगस्टस ची इच्छा होती. त्याने क्लिओपात्राचा मृत्यू झालेल्या ८ व्या महिन्याची निवड केली आणि त्यामुळे आपण प्रत्येक वर्षाचा ८ वा महिना ‘ऑगस्ट’ या नावाने ओळखतो.
क्लिओपात्राचं संपूर्ण आयुष्य वादग्रस्त आणि न पटणाऱ्या गोष्टींनी भरलेलं होतं. पण, जगातील सौंदर्यवान आणि शक्तिशाली महिला नेत्यांमध्ये तिचं नाव नेहमीच घेतलं जाईल असं इतिहासकार सांगतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.