शनिवारची बोधकथा : आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ सांगणारी ही कथा वाचायलाच हवी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पूर्वीच्या काळी अनेक मोठे आणि दानशूर राजे होऊन गेले. विविध गोष्टींचे दान करून पुण्य मिळवणे हा प्रत्येक राजाच्या कामाचा जणू एक भागच बनला होता. असेच एक गाव होते मधुपूर नावाचे!
या गावाचा राजा खूप चांगला आणि प्रजा दक्ष होता. आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये राजाची ख्याती पसरली होती. मधुपूर गाव पाहून त्या गावातील प्रजेचा आनंद पाहून अनेकांना त्या गावाचा आणि तेथील प्रजेचा हेवा वाटायचा. राजाचा कारभार देखील नेहमी प्रजेला डोळ्यासमोर ठेऊनच होत असल्याने प्रजा राजावर खूप खुश होती.
राजा गावातील लोकांमध्ये आणि गावात येणाऱ्या नवनवीन लोकांमध्ये खूप दान करत. थोड्याथोड्या दिवसांनी अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दान राजा करत असल्याने या गावातील लोकांची कष्ट करून खायची सवयच मोडली गेली. त्यामुळे गावातील प्रजा काम करण्यास नकार देऊ लागली. यामुळे हळूहळू गावात अगदी छोट्या छोट्या कामासाठी शेजारच्या गावातून लोकांना बोलावून काम करून घ्यावे लागत असे. मात्र ही गोष्ट राजाच्या लक्षात येत नव्हती.
गावातील समजुदार व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येत होती ते राजापुढे बोलण्यास घाबरत होते. त्यामुळे ह्या समस्येतून मार्ग कसा काढावा यावर त्या हुशार मंडळींनी विचार करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना समजले की गावात एक मोठे महात्मा आले आहेत. त्यामुळे आपण त्यांची मदत घेऊन हा प्रश्न नक्कीच सोडू शकतो या विचाराने त्यांनी त्या महात्मा व्यक्तींना भेटण्याचे ठरवले.
एकदिवस गावातील काही मंडळी त्या महात्मांच्या निवासाच्या ठिकाणी त्यांना भेटण्यास गेली. आणि त्यांना सर्व समस्या सांगितले. यावर त्या महात्मांनी विचारले, ‘राजा पुढचे दान कधी करणार आहे? त्यावर गावातील लोकांनी उत्तर दिले की, ‘दोन दिवसांनी राजाच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्या दिवशी राजा पुन्हा दान करणार आहे.’ यावर महात्मांनी, ‘मी त्यादिवशी दरबार येतो आणि प्रयत्न करतो राजाला समजून सांगण्याचा.’ असे उत्तर दिले.
–
हे ही वाचा – शनिवारची बोधकथा: बुद्धांची ही गोष्ट वाचून तुमच्या सगळ्या अडचणींवर मार्ग सापडेल!
–
गावकरी त्या महात्मांना नमस्कार करून निघाले, आणि म्हणाले आता तरी राजाला त्याची चूक समजेल अशी अशा बाळगू.
दोन दिवसांनी दरबारात नेहमीप्रमाणे दान करण्याचा कार्यक्रम सुरु होतो. राजाचा मुलगा दान करण्याच्या सामानाला हात लावतो आणि त्या गोष्टींना प्रजेमध्ये दान केले जाते. हा कार्यक्रम सुरु असताना तिथे ते महात्मा पोहचतात आणि राजाच्या सेवकांना सांगतात की, मला राजाच्या हातूनच दान घ्यायचे आहे, त्यामुळे कृपया तुम्ही त्यांना बोलवा. महात्मांच्या विनंतीला मान देऊन सेवकांनी राजपर्यंत त्यांचा संदेश पोहचवला.
राजा देखील महात्मांना स्वहस्ते दान देण्यासाठी आला, आणि त्यांना दान देऊ लागला त्यावर महात्म्यांनी मला हे दान नको मला वेळे दान हवे असे सांगितले. त्यावर राजाने मोठ्या नम्रतेने माहात्म्यांना विचारले की महात्मा आपणास कोणत्या गोष्टीचे दान पाहिजे?
त्यावर महात्मा म्हणाले, ‘मला तुझ्याकडे असलेले संपूर्ण धन पाहिजे’ या उत्तरावर राजा गोंधळात पडला आणि त्याने विचारले, की ‘हे महात्मा आपणास मी संपूर्ण धन देण्यास तयार आहे, मात्र एवढ्या धनाचे तुम्ही काय करणार?’, ‘ तुम्ही तर संन्यासी आहात’ त्यापेक्षा मी काही धन तुम्हाला देऊन उरलेले धन माझ्या प्रजेमध्ये दान करू शकतो. त्यांना आनंद आणि सुख देऊ शकतो.’
यावर ते महात्मा म्हणाले, ” हे राजा तू हेच करू नये यासाठीच मला तुझे संपूर्ण धन पाहिजे आहे. तुझ्याकडून तुझे धन घेऊन मला त्याचा काय फायदा? मला तुझ्या धनामध्ये काहीही रस नाही. मात्र तू तुझी संपत्तीमधील काही भाग दान करून पुण्य कमवण्याच्या नादात एक खूप मोठी चूक करत आहेस, जी तुझ्या लक्षातच येत नाहीये.
महात्मांचे बोलणे ऐकून राजा आश्चर्यचकित होउन महात्मांना विचारले, “चूक? कोणती चूक?”
महाराज म्हणाले, तू प्रजेला वेळोवेळी दान करून त्यांना आयते बसून फुकटचे खाण्याची सवय लावली आहे. त्यामुळे तुझी प्रजा कष्टच करायचे विसरली आहे. म्हणूनच तुझ्या गावातील छोट्या कामांना तुम्हाला बाहेरून लोक बोलवावे लागतात. धान्य शेजारच्या गावातून घ्यावे लागते. ही अशीच परिस्थिती राहिली तर एकदिवस तुझे संपूर्ण धन संपून जाईल आणि तुझ्या प्रजेची कष्ट करण्याची सवयही निघून जाईल. त्यापेक्षा तू रोजगार निर्मिती कर, गावाच्या विकासासाठी योजना बनव आदी अनेक चांगल्या आणि उपयोगी गोष्टींसाठी तुझी संपत्ती खर्च कर.
वेळीच सावध हो राजा असे म्हटल्यावर राजाचे खाडकन डोळे उघडतात आणि त्याला महात्म्यांचे बोलणे समजून स्वतःची चूक लक्षात येते. तो महात्म्यांना मला माझी चूक समजावून दिल्याबद्दल धन्यवाद देते. आणि दान करण्यासाठी काही विशिष्ट अटी आणि नियम आखतो त्यानुसारच दान होईल असे जाहीर करतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.