Site icon InMarathi

‘लँडलाईन कॉलिंग ते थेट व्हिडिओ कॉलिंग’, वाचा या भन्नाट अँपचा प्रवास…

skype feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज कोरोनासारख्या आजारामुळे वर्क कल्चर पूर्णपणे बदलून गेले आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम हे नवीन कल्चर उदयास आले आहे. अगदी सगळ्याच क्षेत्रांमध्ये हे लागू होत नसले तरी जितके शक्य आहे तितके वर्क फ्रॉम होम करायला सरकार सांगत आहे.

आज मुलांच्या शाळा असो किंवा संगीताचे, नाटकाचे कार्यक्रम असो सर्व काही शक्य आहे ते व्हिडिओ कॉन्फरसिंगमुळे आणि ज्याच्यावर हे चालते ते म्हणजे इंटरनेट. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे असे उगाच म्हंटले जात नाही.

 

 

मागच्या वर्षी लॉकडाऊन घोषित केल्याने अनेक जण देशोधडीला लागले, तर काहींचा व्यवसाय तेजीत होता. झूम या अँप्लिकेशनचा मालक जगातील श्रीमंतीच्या यादीत आला आहे. आज झूम हे अँप्लिकेशन अगदी मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या ऑफिसेस पासून ते अगदी शाळा कॉलेजेस यासारख्या संस्था देखील झूमचा पर्याय वापरतात .

झूम आज जरी लोकप्रिय झाले असले तरी एक काळ असा होता कि जेव्हा कॉलसाठी करण्यासाठी देखील भरपूर पैसे मोजावे लागायचे तेव्हा स्काईप हे अँप्लिकेशन उदयास आले.

स्काईपचा उदय :

स्काईपची स्थापन २००३ साली करण्यात आली. एका प्रोग्रॅम वरून त्याला स्काईप असे नाव देण्यात आले. peer to peer या सॉफ्टवेअर प्रणालीवरून स्काईपचा जन्म झाला. प्रामुख्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत फाईल शेअरिंग करता यावी हा या मागचा उद्देश होता.

 

हे ही वाचा – जंगलातील लाकूडतोड्या ते सर्वात मोठी फर्निचर कंपनी! वाचा IKEA चा भन्नाट प्रवास...

जानुस फ्रिस आणि निकोलस झेन्सस्ट्रॉम हे संस्थापक आहेत तर प्रेसिंड कासासूल, अथी हेनीला, जॉन टॅलिन यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढले.स्काईप मागची अशीही संकल्पना होती की जितके लोक सिस्टिम वापरत आहेत तितकी विश्वासार्हता वाढणार.

स्काईपचे मूळ नक्की काय होते :

स्काईपच्या मूळ प्रणालीवरून एका सिस्टिम वरून दुसऱ्या सिस्टिमला अथवा लँडलाईनला कॉल लावता येईल अशी सोय करण्यात आली होती. स्काईप ०.९ बीटा असे या प्रणालीला नाव देण्यात आले होते. तसेच कॉल करण्यासाठी काही रक्कम देखील आकारण्यात आले होती.

 

 

अपग्रेड स्काईप :

कालांतराने या अँप्लिकेशनमध्ये  अनेक अपग्रेडस सुद्धा करण्यात आले. कंपनीने अगदी लोगोच्या रंगात सुद्द्धा बदल केले. पूर्वी जांभळ्या रंगात लोगो होता. आताचा  रंग निळा आहे.

आज व्हिडिओ कॉलींग जरी सहज शक्य असले तरी हा तंत्रज्ञानातील आमूलाग्र बदल स्काईपने २००८ सालीचा घडवला होता. स्काईप ३.१ या अपडेशन मध्ये ही सुविधा उपलब्ध होती.

 

 

२०१० साली नुकतेच बाजारात अँडरॉइड फोन येऊ लागले होते. अँड्रॉइड मार्केट हे मोठे आहे हे लक्षात  घेऊन आपले उत्पादन अँड्रॉइड सिस्टिम मध्ये सुद्धा उपलब्ध करावे असे कंपनीने ठरवले. आणि डिसेंबर २०१० साली अँपल आणि अँड्रॉइड सिस्टिम मध्ये ही  यंत्रणा लागू करण्यात आली. त्याआधी विंडोज फोन मध्ये ही यंत्रणा वापरण्यात आली होती.

मायक्रो सॉफ्टचे स्काईप :

आज मार्केट मध्ये एखादी कंपनी वर येत असेल तर तिला विकत घेण्यासाठी बलाढ्य कंपन्या तयार असतातच. असाच काहीसा प्रकार स्काईप बाबतीत झाला. २०११ साली मायक्रोसॉफ्टने ८.५ बिलियन डॉलर्सना ही कंपनी विकत घेतली.

 

 

मायक्रो सॉफ्टचे असे म्हणणे होते की सुरवातीला स्काईप ही फक्त मेसेंजर म्हणून वापरात येईल जसे जसे यूजर्स वाढतील तसे त्यांना मायक्रोसॉफ्टच्या अकाऊंटवरून लॉग इन करता येईल. 

सद्यस्थित स्काईप : 

२०१९च्या एका मायक्रोसॉफ्टच्या इंजिनीअरच्या म्हणणयानुसार स्काईपचे जगभरात ४बिलियन वापरकर्ते आहेत. 

दशकानुसार तंत्रज्ञामध्ये बदल होत असतात. तसेच कंपनीला देखील काळानुसार बदलावे लागते. एखादे उत्पादन हिट ठरले की लगेच तेच उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या बाजरात येतात. आपल्याकडे ही असे अनेक ब्रँड येऊन गेले ज्यांनी मूळ उत्पादनसारखे सेम उत्पादन स्वतः बनवून मार्केट मध्ये आणले पण त्यातले काहीच हिट ठरले.

आज नोकियासारखी कंपनी जिचे फोन रोज खपले जायचे तीच कंपनी आज इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच मागे पडली आहे. लोकांची आवड ही त्याला तितकीच जवाबदार आहे म्हणा. कारण लोकांना सतत नवीन काहीतरी हवं असते. नवीन काहीतरी ट्राय करायचं असते. त्यामुळेच कंपन्यांमध्ये  वेगळे देण्यासाठी कायमच रस्सी खेच सुरु असते.

===

हे ही वाचा – तुमच्या आवडत्या ब्रँड्सच्या जन्माच्या काही अफलातून कहाण्या, जाणून घ्या…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version