Site icon InMarathi

भगवद्गीतेतील हे १० लाख मोलाचे धडे आपल्याला जीवनात कुठल्या कुठे घेऊन जातील!

krishna inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल प्रत्येक गोष्ट आपल्याला कमी वेळात म्हणजेच ‘इन्स्टंट’ हवी असते. समोरच्या व्यक्तीने तिचं बोलणं सुद्धा अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात मांडावं ही आपली अपेक्षा झाली असते.

एके काळी ३ तास चालणारा आपला सिनेमा सुद्धा आता २ तासांवर येऊन ठेपला आहे. अख्खी वेबसाईट वाचण्यापेक्षा ‘की वर्ड्स’कडेच आपलं आता जास्त लक्ष असतं.

कोणतीही माहिती किंवा ज्ञान हे ठराविक मुद्द्यांमधून समोर आलं, की नेहमीच लक्षात राहतं आणि जास्तीत जास्त लोकांना आपण ते वाचण्याचा आग्रह सुद्धा करतो.

आपल्या सर्वांचीच ही बदललेली मानसिकता लक्षात घेऊन आम्ही आपल्या जीवनाचं सार सांगणाऱ्या ‘भगवद्गीता’ या ज्ञान ग्रंथातील ठळक १० मुद्दे इथे उपलब्ध करून देत आहोत.

भगवद्गीतेचे १८ अध्याय आणि ७०० श्लोकांचा सारांश या मुद्द्यांमध्ये आहे. वाचा, जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवा आणि सर्वात महत्वाचं ‘भगवद्गीता आचरणात आणा’

 

===

हे ही वाचा – महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले? त्यामागचे ‘रहस्य’ जाणून घेऊया!

===

१. मान्य करण्याची वृत्ती

जी परिस्थिती जशी आहे तसा तिचा स्वीकार करणे आणि त्यावर आवश्यक तो उपाय करणे हे भगवद्गीता आपल्या ‘कर्मयोग’द्वारे सांगत असते. आपण बऱ्याच वेळेस परिस्थिती मान्य करत नाही किंवा ‘असं माझ्यासोबतच का होतं?’ हाच विचार खूप वेळ करत राहतो.

 

 

एखादा आजार झाल्यावर जसं आपण आजाराचा विचार करत न बसता औषध घेणं अपेक्षित असतं, आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नावर तसंच वागणं आपल्याकडून अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘कार्य’ करणं थांबवू नका. कार्यशील रहा, यश मिळवण्याचा तो एकमेव राजमार्ग आहे.

२. समानता

पृथ्वीतलावरील प्रत्येक जीवित किंवा निर्जीव वस्तूमध्ये देवाचा अंश आहे जो त्यांना एकत्र बांधून ठेवतो असं आपण म्हणतो. पण, आपण खरंच असं मानतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.

एकदा आपण वस्तूंकडे समान नजरेने बघायला लागलो, की मग एखाद्या वस्तूबद्दल आसूया आणि एखाद्या वस्तूचा तिटकारा हे आपण करणारच नाही. हेच व्यक्तींबद्दल सुद्धा लागू पडतं.

काही व्यक्ती तुम्हाला आवडतील तर काही अजिबात पटणार नाहीत. त्यांच्या कृत्याचा फक्त विचार करा, व्यक्ती म्हणून तुमच्या मनात त्यांच्याबद्दल कोणतीही कटूता ठेवू नका. तुमच्यासाठीच ते चांगलं नाहीये.

 

 

३. काळजी करणं थांबवा

विचारांचा मनात गोंधळ सुरू असतो, ज्यामुळे आपण अशांत असतो. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यापेक्षा आपण लोकांच्या म्हणण्याने चालत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो.

आपण काळजी केल्याने गोष्टी बदलणार नाहीत, हे माहीत असूनही आपण सतत काळजीचे विषय डोक्यात आणून एक ओझं घेऊन वावरत असतो.

‘जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे, जे होणार आहे ते पण चांगलंच होणार आहे’ हे एकदा मान्य केलं की, आपण वर्तमानात जगू शकतो आणि आनंदात जगू शकतो. आनंदी म्हणजे बेपर्वा नाही हे सुद्धा त्यासाठी आपण मान्य करायला पाहिजे.

 

 

४. बदल मान्य करायला शिकणं

हाताची बोटं सारखी नसतात, तशी कोणतीही आलेली परिस्थिती ही नेहमी एकसारखी नसते. उगवलेला सूर्य हा संध्याकाळी मावळणारच असतो. हे महिती असूनही आपण काही बदल चटकन मान्य करत नाहीत.

‘बदलासोबत चालणे’ ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली जाते. नवीन संधीच्या सतत शोधात असणं, बदललेली परिस्थिती मान्य करणं हे ज्याला जमलं त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.

भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं हेच ज्ञान आपण विविध इंग्रजी वक्त्यांकडून ऐकत असतो आणि त्यांच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवत असतो.

 

 

५. सकारात्मक विचार करणे

‘ध्यान योग’ चा अभ्यास केला आणि नियमित सराव केला तर आपल्याला मनाची विचार करण्याची पद्धत समजू शकते. मनावर चांगले संस्कार करणं ही सुद्धा आपलीच जबाबदारी असते.

मनाची दिशा नेहमी सकारात्मक दिशेने ठेवल्यास चांगल्याच गोष्टी घडतील किंवा घडणाऱ्या गोष्टी चांगल्याच वाटतील. दिवसातील निदान २० मिनिटं आपण स्वतः साठी काढलीत आणि ध्यान साधना केली तर शरीराला व्यायाम केल्याने जो फायदा होतो तोच फायदा मनाला होत असतो.

 

===

हे ही वाचा – पश्चाताप टाळायचा असेल तर यंदाच्या आर्थिक वर्षात या ८ टिप्स फॉलो करायलाच हव्यात

===

६. कामावर प्रेम

“एक तर आपल्या आवडीचं काम करा किंवा करत असलेल्या कामावर प्रेम करा” हे आज सर्वांनी शिकणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा का काम आवडलं की, आपण त्याच्यातून मिळणाऱ्या फळाचा आपण विचार करत नाही.

क्रिकेटची मॅच बघताना आपण कधी घड्याळाकडे बघतो का? अर्थातच नाही. कामाच्या ठिकाणी मात्र थोडा जास्त वेळ देणं हे आपल्याला त्रासदायक वाटत असतं. कारण, आपलं लक्ष हे कामापेक्षा त्याच्यातून मिळणाऱ्या मोबदल्याकडे असतं, कामातून मिळणाऱ्या आनंदाकडे नाही.

 

 

‘आनंदाने पोट भरत नाही’ असं काहींना वाटेल. पण, तुम्ही ‘तुमचं काम पूर्ण मन लावून करा, फळ देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे’ असं स्वतः श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आहे. त्यापेक्षा मोठा दाखला असूच शकत नाही, हे फक्त आपल्या मान्य करण्यावर आहे.

७. कृतज्ञता भाव असणे

आपल्याकडे काय नाहीये हे बघण्यापेक्षा आपल्याला काय सहज उपलब्ध झालं आहे त्याबद्दल कृतज्ञता भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. एका प्रार्थनेतील ‘हम न सोचे हमे क्या मीला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण’ ही ओळ आपल्याला हेच सांगायचा प्रयत्न करते.

फक्त स्वतःपुरता विचार न करता आपल्याला या समाजाला काय देता येईल? याचा सुद्धा प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी झाले असाल तर, इतरांना त्यांचं ध्येय साध्य करण्यास मदत करा आणि हे करतांना कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नका.

 

 

८. भीती काढून टाकणे

रोजच्या जगण्यात आपण किती तरी गोष्टींची भीती बाळगून जगत असतो. नोकरी जाण्याची भीती, पैसे कमी मिळण्याची किंवा न मिळण्याची भीती तर काहींना अपघात होण्याची भीती वाटत असते.

‘तुम्ही एक शरीर नसून एक आत्मा आहात’ हे भगवद्गीतेत वारंवार सांगण्यात आलं आहे. आधी आत्म्याचा विचार करा, त्यातूनच ‘अध्यात्म’ हा शब्द तयार झाला आहे. तर, या आत्म्याने न सोबत काही आणलं होतं, ना तो सोबत काही घेऊन जाऊ शकतो. मग कशासाठी घाबरायचं? कोणत्याही परिस्थितीचा विचार करून घाबरू नका, सतर्क रहा. काळजी घ्या, काळजी करू नका.

 

 

 

९. रागावर नियंत्रण ठेवणे

‘अति राग आणि भीक माग’ ही म्हण आपण कित्येक वेळेस ऐकली असेल. तरीही आपल्याला राग येत असतो. रागातून इतरांसाठी काही सकारात्मक घडणार असेल तरी ठीक आहे. पण, फक्त स्वार्थी विचार करून ज्या लोकांना राग येतो त्यांना कोणीही कधीच माफ करत नाही.

 

 

‘काम, क्रोध, लोभ’ या तिन्ही गोष्टींपासून आपण जितकं लांब राहू शकतो तितकं आनंदी जगू शकतो. क्षणिक फायद्याचा विचार न करता अगतिकता कशी होणार नाही याकडे प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे.

१०. शांत वृत्तीने जगणे

कोणत्याही परिस्थितीला जेव्हा तुम्ही शांततेने सामोरे जातात तेव्हा अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलेली असते. शांत आणि संयमी मन हे आयुष्याच्या कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला मदत करत असतं.

 

 

निरोगी आरोग्य आणि शांत मन हेच तुम्हाला नेहमी तुमच्या कार्यात यश मिळवून देत असतं. “प्रत्येक अंधारा नंतर उजेड हा होतोच” यावर कायम विश्वास ठेवावा आणि स्वतःची वृत्ती शांत ठेवावी.

कोरोनामुळे उदभवलेल्या आरोग्य, आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या आपण सर्वांनीच या १० गोष्टी लक्षात ठेवणं आणि आमलात आणणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःला ‘अंदर से स्ट्रॉंग’ करूया आणि मग बाहेरची कोणतीच गोष्ट आपल्याला कमजोर करू शकणार नाही.

या टिप्स तुमच्या ओळखीतील मंडळींना सुद्धा सांगाल ना? त्यांनाही त्या टिप्सचा फायदा नक्की होईल. त्यामुळे त्यांच्यासाठी हे शेअर करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटलं आणि तुमचं मत काय, तेही आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा.

===

हे ही वाचा – मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version