तुमच्या लहानग्यांवर कोरोनाची सावली नाही ना? हे वाचा आणि खात्री करून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
२०२० हे वर्ष मानवी इतिहासातील सर्वात जास्त भयंकर वर्ष ठरले. याच काळात जगावर जीवघेणा आजार कोरोना सावट बनून आला. लाखो लोक बळी पडले. आठ महिने सारे उद्योग बंद होते. जगाचं शटर खाली ओढलं गेलं. कितीतरी लोक उपचाराअभावी गेले. बरेचसे कोरोनाच्या धसक्यानेही गेले.
कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे कोरोना झालेल्या माणसाच्या संपर्कात निरोगी माणूस आला की त्याला कोरोना होतो. लहान मुले आणि वृद्ध लोकांना या संसर्गाची भीती जास्त असते, कारण यांची प्रतिकारशक्ती कमी असते.
वृध्द लोकांना आपण घरात थांबायला सांगू शकतो. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते बाहेर न पडता घरी राहू सुद्धा शकतात. परंतू, लहान मुलांना किती काळ आणि कसं घरात डांबून ठेवणार?
आतापर्यंत सावधगिरी बाळगली त्यामुळे लहान मुलांना कोविडची बाधा झाली, तरी प्रमाण कमी आहे. जी मुलं आधीच कुठल्यातरी रोगाची शिकार ठरली आहेत त्यांना कोरोना होण्याची शक्यता जास्त आहे.
पोलिओ, देवी यांसारख्या आजारांवर लस निघाली आहे. ती लस एकदा टोचली की तयार होणाऱ्या अँटीबाॅडीज जन्मभर शरीरात कार्यरत राहतात आणि आपल्याला हे रोग होऊ शकत नाहीत. देवीचे रुग्ण तर आता सापडतही नाहीत. याच धर्तीवर कोरोनाची लस काम करेल असा अंदाज आहे.
===
हे ही वाचा – पालकांनो, मुलांच्या आरोग्याशी निगडित या ८ गोष्टी दुर्लक्षिल्यास परिणाम गंभीर होतील!
===
आतापर्यंत मुलांना बाह्य संपर्कात येऊ न दिल्याने मुलांच्या कोरोनाच्या केसेस कमी होत्या. मात्र, शाळा सुरू झाल्यावर ही शक्यता जास्त आहे.
युनिसेफ या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने एक अहवाल सादर केला आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की लहान मुले आणि किशोरवयीन मुले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून एक विचित्र आणि गंभीर आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत.
Multiple inflammatory syndrome हा कोविडशी मिळता जुळता आहे. त्याची लक्षणंही अशीच आहेत- ताप येणं, डोळे लाल होणं, डोळ्यांवर सूज, शरीरावर लाल चट्टे उठणं. जीभ, ओठ यावर खुणा दिसणं. अन्न पचनास त्रास होणं, रक्तदाब कमी होणं, शरीरावर सूज येणे ही लक्षणं मुलांमध्ये जाणवली आहेत. आणि ही लक्षणं जाणवलेली मुलं कोरोना पाॅझिटिव्ह आली आहेत.
पण असा दावा करता येत नाही की हे सारं कोरोनामुळेच झालं आहे, किंवा कोरोना या लक्षणांमधून आपलं अस्तित्व दाखवून देत आहे. ही समस्या उत्तर अमेरिकेतील मुलांचा सर्व्हे करुन मांडली आहे. जगातील इतर देशांतील मुलांच्या बाबतीत अजून असे सर्वेक्षण केलेले नाही.
युनिसेफनं सांगितलं आहे की, मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे दिसू लागताच त्यांना दवाखान्यात न्या. प्रारंभी दिसत असणाऱ्या या लक्षणांवरून इलाज करुन निदान पुढचा प्रसार, शरीराला येणारी सूज आपण टाळू शकतो.
आता यावर इलाज काय? सध्या कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. मात्र ती सर्वांपर्यंत पोहोचेपर्यंत कोरोनानं आपलं स्वरूप थोडंफार बदललं असेल. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय हाच बचावाचा उत्तम पर्याय आहे.
लहान मुलं कितीही अवखळ असली, वांड असली तरीही कोणतीही नवीन गोष्ट शिकायची, ग्रहण करण्याची क्षमता ही मोठ्या माणसांपेक्षा जास्तच असते. बघा.. तुमच्यापेक्षा मोबाईल मुलं उत्तम रितीने हाताळू शकतात. हे झालं एक उदाहरण!
तर मुलांना तुम्ही कोरोनाबाबत नीट आणि पुरेशी माहिती द्या. त्यापासून बचावण्यासाठी काय काय करावं लागेल हे सांगा. कोरोनाच्या गंभीरतेची जाणीव करुन द्या. मास्क वापरणं का गरजेचे आहे, कोरोनापासून मास्क कसा बचाव करु शकतो, सॅनिटायझर हँडवाॅश यांचा वापर का, कसा आणि कशासाठी करायचा हे त्यांना व्यवस्थितपणे सांगा.
===
हे ही वाचा – मुलांच्या ‘ह्या’ हालचालींवरून तुम्ही त्यांचे खोटे पकडू शकता !
===
मुलं ऐकतात. बाहेरुन आल्यावर, सॅनिटायझर हँडवाॅश यांचा वापर करून हात धुवायची सवय लागेपर्यंत त्यांना सांगत रहा.
आपल्याकडे एक गोष्ट सांगितली जाते, एखाद्या गोष्टीला सवयीत बदलण्यासाठी सतत २१ दिवस ती गोष्ट करत राहिल्यास २२ व्या दिवशी आपोआपच ती सवय बनते.
बाहेरुन आल्यावर,जेवण्यापूर्वी हात धुवून मगच जेवा. सॅनिटायझरची बाटली सोबत ठेवायची सवय लावा. फास्ट फूडसाठी मुलं हट्ट करत असतील तर त्यांना त्या खाण्यातून संसर्ग होऊ शकतो हे समजून सांगा. त्यापेक्षा घरगुती, पौष्टिक आणि पारंपरिक आहार घ्यायला सांगा. त्याचे फायदे सांगा. मुलं ऐकतात.
मुलांमध्ये कोविड सदृश लक्षणं दिसली तर काय कराल?
मुलांना सर्दी ताप खोकला आला तर घाबरून जाऊ नका. कधी कधी ही लक्षणं साध्या फ्ल्यूची पण असू शकतात. पण त्यावेळी मुलांना मास्क वापरायला द्या. तुम्ही पण मास्क वापरा ज्यामुळे या साध्या रोगाचाही संसर्ग होऊ नये.
त्यांच्यासाठी गरजेच्या असलेल्या सर्व लसी म्हणजे बीसीजी, गोवर वगैरे वेळच्या वेळी त्यांना द्या. त्यामुळे संसर्गाचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.
कोरोनाच्या या काळात मास्क, हँडवाॅश सॅनिटायझर यांचा वापर करून आपलं आणि आपल्या मुलांचं जीवन संसर्गापासून वाचवण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे हाच उपाय आहे.
बचाव हाच उपाय हे समजून कोरोनाशी लढूया आणि जिंकूया! आपली मुलं हीच आपली संपत्ती..ती आरोग्यपूर्ण जीवन कसे जगेल हेच पाहूया. चला लढूया!
===
हे ही वाचा – आपल्या मुलांच्या आरोग्याची फिकीर आहे? मग तरी “या” गंभीर चुका का करताय…?
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.