Site icon InMarathi

मुघलांची अनेक क्रूर आक्रमणं सोसूनही हिंदूंचं हे श्रद्धास्थान आजही स्थिर आहे…!!

eklingji featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताच्या भूमीतच एक संघर्ष आहे. इथे प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला आणि वास्तूला आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील ऐतिहासिक वास्तूंना आधी मुघल आणि मग इंग्रजांनी नेहमीच उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या पूर्ण कारकिर्दीत केवळ हिंदू मंदिर उद्ध्वस्त करण्यातच धन्यता मानली.

त्यापैकी काही वास्तूंची पडझड झाली. पण, राजस्थान मधील ‘श्री एकलिंगजी आराधना देव शिव मंदिर’ हे एक असं मंदिर आहे ज्याच्या रचनेला कोणताच मुघल राजा कधी धक्का पोहोचवू शकला नाही.

 

 

उदयपूर जिल्ह्यातील ‘कैलाशपुरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात एकूण १०८ छोटी मंदिरं आहेत. किती आक्रमण करण्याचे प्रयत्न झाले. पण, एकलिंग शिव मंदिर, त्याचं बांधकाम हे नेहमीच या सर्व आक्रमणांना तोंड देण्यास समर्थ होतं.

कोणी बांधलं असेल हे मंदिर? काय आहे या मंदिराचं वैशिष्ट्य? जाणून घेऊयात.

मेवाडच्या राजा एकलिंगजी यांच्या नावाने ओळखलं जाणारं हे मंदिर म्हणजे भगवान शंकर यांच्या देव आणि एक लोकमान्य राजा म्हणून मान्यता असल्याचा सुद्धा दाखला देते.

उदयपूरच्या महाराणा राजांना ‘दिवाण’ म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. मेवाडचे दिवाण हे कोणत्याही युद्धावर जाताना किंवा मोठा निर्णय घेताना एकलिंग जी यांचा नेहमीच आशीर्वाद घ्यायचे.

हे मंदिर बांधल्यापासून महाराणा प्रताप यांच्यावर कित्येक परकीय शत्रूंनी आक्रमण केलं होतं. पण, मंदिराच्या रचनेला कोणत्याही राजाला धक्का लावता आला नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा मुस्लिम शासकांनी ‘देवळांची डागडुजी’ केल्याचा कसलाही पुरावा नाही…

===

एकलिंग शिव मंदिरावर होणारा हल्ला रोखण्यासाठी महाराणा प्रताप यांनी राजा अकबरच्या दरबारी मान असलेल्या बिकानेरच्या महाराजा पृथ्वीराज यांच्या विरुद्धसुद्धा बंड पुकारलं होतं.

 

 

महाराजा एकलिंगजी हे प्राण्यांमध्ये सुद्धा इतके लोकप्रिय होते त्यांच्या जाण्यानंतर काही घोड्यांनी कोणालाच परत त्यांच्या स्वारीचा मान दिला नाही.

मंदिरावर झालेले हल्ले 

– दिल्ली सल्तनत ने १३ व्या शतकात सर्वात पहिला हल्ला या मंदिरावर केला होता. १४ व्या शतकात हमीर सिंघ या राजाने या मंदिराच्या रचनेत बदल केले.

– १५ व्या शतकात माळवा सल्तनतच्या घियानाथ शाहने मेवाडवर हल्ला केला आणि मंदिराला नुकसान पोहोचवलं. राणा रायमलने या हल्ल्यानंतर मंदिराची पुनर्बांधणी केली. राणा रायमलने एकलिंग शिव मंदिराला एखाद्या कॉम्प्लेक्स सारखं स्वरूप दिलं आणि तिथे १०८ मंदिरांची स्थापना केली.

– १६ व्या शतकात एकलिंग मंदिर हे पशुपात राजाच्या अधिपत्याखाली होतं जे की कालांतराने रामानंदी राजाच्या अधिपत्याखाली गेलं.

मंदिराची रचना कशी आहे ?

मेवाड पद्धतीने बांधण्यात आलेलं एकलिंग शिव मंदिर हे एक अतिप्राचीन असून इथली शिवमूर्ती ही ५० फुट इतकी उंच असून चतुर्मुख आहे. शिवजींचे चार मुख हे चार दिशांचे प्रतिक आहेत असं मानलं जातं :

१. पूर्वेकडील – शिवमुख हे सुर्याचं प्रतिक

२. पश्चिमेकडील – शिवमुख हे ब्रम्हाचं

३. उत्तरेकडील – शिवमुख हे भगवान विष्णूचं

४. दक्षिणेकडील – शिवमुख हे रुद्र म्हणजे शिव शंकराचं आहे.

पश्चिमेकडे मंदिरात प्रवेश करण्यासाठी महाद्वार आहे. मंदिरात प्रवेश करतांना नंदीची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात एकूण १०८ देवतांच्या मूर्ती आहेत. ‘एकलिंग शिव’ ची मूर्ती ही मंदिर परिसराच्या मध्यभागी आहे.

 

 

या मंदिरात प्रवेश करताना विशेष पोशाख करावा लागतो ज्याची सोय मंदिर प्रशासनाकडून केली जाते.

एकलिंग शिव मंदिराची राजपूत लोकांचं आराध्य दैवत म्हणून मान्यता आहे. मेवाडचा राजा महाराणा प्रताप हा एकलिंग शिवाची मनोभावे आराधना करायचा.

दोन मजली असलेलं मंदिर हे भारतीय स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून ओळखलं जातं. कळसावरील नक्षीकाम आणि मंदिराच्या भिंतीची पायऱ्या सारखी रचना ही त्या काळातील बांधकाम ज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना आपल्यासमोर ठेवते.

कधीही या मंदिराला भेट दिली तरीही एक विशिष्ठ घमघमाट इथे येतो असं प्रत्येक दर्शनार्थी मान्य करतात.

मंदिराचा इतिहास :

८ व्या शतकात मेवाडचा शोध लावणाऱ्या ‘बाप्पा रावळ’ यांनी ‘एकलिंग शिव मंदिराचं’ बांधकाम केलं होतं.

१५ व्या शतकात तत्कालीन राजा महाराणा रायमल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि आज मंदिराला आलेलं भव्य स्वरूप हे १५ व्या शतकात केलेल्या नियोजनाचं फलित आहे याचं मंदिर बघितल्यावर प्रत्येकालाच आश्चर्य वाटेल.

===

हे ही वाचा या अजब मंदिरात होतात अशा काही गोष्टी ज्यांची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल!

===

 

कैलाशपुरी मंदिर ज्याला ‘एकलिंगजी’ या नावाने ओळखलं जातं त्याला ‘पाताळेश्वर महादेव’ हे सुद्धा नाव आहे. राजस्थानच्या भूमीवर बांधण्यात आलेल्या सुंदर मंदिरांच्या रचनेत कैलाशपुरीचा क्रमांक नेहमीच प्रथम असेल असं सर्वच पर्यटक सांगतात.

प्रत्येक उन्हाळ्यात महाराणा प्रताप हे एकलिंग महाराजांची काळजी घेण्यासाठी कित्येक किलोमीटर अंतरावरून पाण्याची सोय करायचे इतकं हे मंदिर राजस्थानच्या इतिहासात महत्वाचं ठिकाण मानलं जातं.

एकलिंग शिव मंदिरबद्दल एक आख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहेत की, या मंदिराजवळच इंद्र सरोवर आणि बाघेला या नावाने दोन सरोवर आहेत.

ब्रम्हदेवाच्या रागापासून वाचण्यासाठी इंद्र देवाने या सरोवराची निर्मिती केली होती. या सरोवराच्या आसपास नेहमीच फुल, फळावळ असेल असा आशीर्वाद दिला होता. एकलिंग राजाने ते सर्व फळ प्रजेला दान करण्याचा संकल्प केला आणि शेवटपर्यंत तो आमलात आणला.

 

 

उदयपूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर एकदा अवश्य भेट द्यावी असं आहे. पुढच्या वेळी राजस्थानला फिरायला जाताना ‘एकलिंगजी महाराज’ यांच्या मंदिराबद्दल आपल्या टूर मॅनेजरला नक्की विचारा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा भारतीय इतिहासातील काळेकुट्ट डाग: आक्रमकांनी उद्धवस्त केलेली ५ मंदिरं!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version