आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एसी हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्याला अगदी थंड -थंड वाटतं. उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच पंखा आणि एसीची आठवण प्रकर्षाने येते. पण आपल्या गरजा लक्षात घेऊन योग्य एसी निवडणे अत्यंत जिकरीचे काम आहे.
एसी असो वा इतर कोणतेही उपकरण, ते खरेदी करताना शक्यतो घाई करू नये. कारण या गोष्टी अत्यंत महाग आणि अधिक वापरात येणाऱ्या असतात.
आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत, योग्य एसी कसा निवडावा याबद्दल..
एसी घेताना सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे बजेट ठरवणे गरजेचे आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती रुपयांपर्यतचा एसी विकत घ्यायचा आहे. कारण एसीचे अनेक प्रकार आहेत. यातील कोणता प्रकार तुम्हाला हवा आहे. आणि तो तुमच्या बजेटमध्ये बसतोय का? हे तपासून पाहावं लागतं.
एसी तुम्ही कोणत्या रूमसाठी घेत आहात हेदेखील लक्षात घ्या. एसीचा वापर आणि त्याची रूम थंड करण्याची क्षमता या सर्वांचा विचार करा. या बरोबरच सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो एसी वापरल्या नंतर वीज बिल किती येणार आहे, हा. याचादेखील विचार करणे गरजेचे आहे.
एसीचे मुख्य तीन प्रकार पडतात. या तिन्ही प्रकारांचे काही फायदे आहेत आणि काही तोटेदेखील आहेत. आपण जाणून घेऊयात हे सगळे फायदे-तोटे.
स्प्लिट एसी, विंडो एसी, पोर्टेबल एसी हे एसीचे मुख्य तीन प्रकार ठरतात. त्यांचे नेमके उपयोग काय आहेत, त्यांचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत ते बघुयात.
===
- उन्हाळा आलाय : पहिले “ह्या” १० गोष्टी अंगिकारा आणि दुष्काळ टाळा!
- एअर कंडिशनर आपल्या गर्मीवर उपाय म्हणून जन्मलंच नव्हतं मुळी! वाचा एसीच्या जन्माची रोचक कहाणी!
===
स्प्लिट एसी
भिंतीवर जो एसी लावलेला असतो त्याला स्प्लिट एसी म्हणातात. या एसीचे दोन भाग असतात. एक इनडोअर युनिट आणि दुसरे आऊटडोअर युनिट.
स्प्लिट एसी हा एसीमध्ये सर्वाधिक खर्चिक प्रकार मानला जातो. कारण या एसीची काळजी घेणे अवघड असते.
याचे मुख्य कारण असे, की या एसीला सर्वाधिक मेंटेनन्स लागतो. पण या एसीचे दोन फायदे आहेत. ते म्हणजे हा एसी कमीत कमी वेळात खोली थंड करतो. याशिवाय हा एसी कोणत्याही भिंतीवर बसविता येतो.
अर्थात त्याची फिटिंग थोडीशी किचकट असते. जेव्हा तुम्ही एका घरातून दुसऱ्या घरात राहण्यासाठी जाता, तेव्हा हा एसी दुसरीकडे घेऊन जाणे फार अवघड असते.
या एसीला अत्यंत कमी जागा लागते. जरी खोली मोठी असेल, तरी देखील हा एसी अतिशय उपयुक्त ठरतो. या एसीच्या किंमती बाकीच्या प्रकारच्या एसीपेक्षा अधिक असतात. मात्र स्प्लिट एसी दिसायलाही अतिशय आकर्षक दिसतात.त्यांचा आवाज देखील अधिक येत नाही.
एसी बसविल्यामुळे तुमच्या खोलीमधील वातावरण अधिक चांगले होते. स्प्लिट एसीचा सर्वात मोठा फायदा हा आहे, की या एसीला अतिशय कमी जागा लागते.
स्प्लिट एसी घेताना एक काळजी जरुर घ्यायला हवी, ती म्हणजे एसीवर जे स्टार दिलेले असतात ते पहा. ज्या एसीला जास्त स्टार दिलेले असतात त्या एसीचे अधिक फायदे असतात.
तसेच एसी घेताना हेदेखील तपासून पहा, की त्यांचे लाइट बिल किती येणार आहे. कारण वर्षभरात आपण किमान ४ महीने तरी एसी वापरतो, जर अधिक वीजबिल येणारा एसी असेल तर नक्कीच तुम्हाला अधिक वीज बिल भरावे लागेल.
विंडो एसी
जर तुम्ही भाड्याच्या घरात रहात असाल तर तुमच्यासाठी विंडो एसी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. स्प्लिट एसीला ज्या प्रमाणे दोन भाग असतात तसे विंडो एसीला नसतात. विंडो एसी हे संपूर्ण एकच मशीन असते.
हा एसी स्प्लिट एसीपेक्षा थोडासा स्वस्त असतो. याची जोडणी करणे देखील खूप सोप्पे असते. याचा मेंटेनन्स ठेवणे देखील अतिशय सोप्पे जाते. कारण हा एसी आपण काढून व्यवस्थित साफ करू शकतो.
या एसीचे काही तोटे देखील आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात आवाज येतो. तसेच जर तुमची खोली फार मोठी असेल, तर ती पूर्णपणे थंड होणार नाही. कारण या एसीची कुलिंग क्षमता कमी असते.
या एसीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे, हा एसी खिडकीत ठेवावा लागतो आणि त्यामुळे तुमच्या खिडकीतून काही सुंदर दृश्य दिसत असेल, तर ते दृश्य दिसणे बंद होईल. खिडकी वापरताना सुद्धा काही अडचणी उभ्या राहतील, तेही ओघाने आलेच.
तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ते म्हणजे एसीची क्षमता टन्सवर मोजली जाते. जसे की एक टन किंवा दीड टनचा एसी. एसी जितका जास्त टन्सचा असेल तितकी जास्त त्यांची कुलिंग करण्याची क्षमता असते.
जर तुमची खोली लहान असेल, तर एक टनचा एसीदेखील पुरेसा ठरतो. पण जर खोली मोठी असेल, तर मात्र तुम्हाला दीड टनाचा एसी असणे आवश्यक आहे.
१३० स्क्वेअर फुटाची खोली असेल, तर तुम्हाला एक टन एसी पुरेसा आहे. पण जर तुमची खोली १८५ स्क्वेअर फुटांपेक्षा मोठी असेल तर तुम्हाला दीड टनाचा एसी घेणे फायदेशीर ठरेल.
पोर्टेबल एसी
पोर्टेबल एसी हा आपल्या देशात अजून तितकासा प्रचलित प्रकार नाही. आपल्याकडे पोर्टेबल कूलर फार मोठ्या प्रमाणात वापरले जातात. अनेकदा एसी घेताना लोक पोर्टेबल एसीला अधिक प्राधान्य देतात. त्यांना वाटते हा एसी आपण सहज कोठेही नेऊ शकतो.
दिवसभर तो हॉलमध्ये वापरता येऊ शकतो कारण आपण हॉलमध्ये असतो. रात्रीच्या वेळेस तो बेडरूममध्ये वापरता येऊ शकतो. त्यामुळे या एसीला प्रचंड मागणी असते.
या एसीचे फायदे म्हणजे, हा एसी आपण सहज एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. हा एसी वजनाला देखील अधिक नसतो. परंतु याची किंमत अधिक असते.
तसेच याचा आवाज देखील अधिक येतो. जर तुमच्या खोल्या लहान असतील, तर नक्कीच हा एसी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा.
एका खोलीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माणसे असतील, तरी देखील खोली थंड होण्यावर परिणाम होतो.
एसी शक्यतो ऑटो स्टार्ट असावा. त्यामुळे लाईट गेल्यावर बंद झालेला एसी पुन्हा लाइट आल्यावर चालू होतो.
एसी शक्यतो ऑफ सीजनमध्ये म्हणजे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात घ्यावा, कारण उन्हाळ्यात एसीची मागणी अधिक असते. त्यामुळे त्यांच्या किंमती देखील अधिक असतात.
शक्यतो तुमच्या परिसरात ज्या एसीचे सर्विस सेंटर असेल, असाच एसी घ्या. त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी घेणे अधिक सोप्पे पडेल.
तुमच्या खोलीला जर अधिक दरवाजे किंवा खिडक्या असतील तर तुमचा एसी उत्तमरीतीने काम करू शकत नाही.
जर खोलीमध्ये अधिक सूर्य प्रकाश येत असेल, तरी देखील तो एसी उत्तमरित्या काम करू शकत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.