' भीमाने गदा मारून निर्माण केलेल्या या तळ्याची खोली आजपर्यंत कळलेली नाही! – InMarathi

भीमाने गदा मारून निर्माण केलेल्या या तळ्याची खोली आजपर्यंत कळलेली नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात अशा अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा अजूनपर्यंत मोठमोठ्या वैज्ञानिकांना करता आला नाहीये.

भारत हजारो वर्षांचा मोठा इतिहास लाभलेला देश आहे. आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये असंख्य रहस्यमयी आणि गूढ गोष्टी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्या गोष्टींमागील इतिहास पाहिला तर थक्क करून टाकणारी माहिती सर्वांसमोर येईल.

पौराणिक ,ऐतिहासिक अशा अनेक काळातील रहस्यांनी भरलेल्या आपल्या देशातील एका नवीन रहस्याची माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

 

in marathi 1

 

आपल्या देशातील अशीच एक रहस्यमयी गोष्ट म्हणजे ‘भीमकुंड’. नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की, हे कुंड महाभारताशी आणि पाण्याच्या कुंडाशी संबंधित आहे. हे कुंड अनेक गूढ आणि मोठ्या अशा अनाकलनीय रहस्यांनी व्यापले आहेत.

मध्यप्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यापासून सुमारे ७० किलोमीटर दूर असलेल्या बजना गावाजवळ हे भीमकुंड आहे. भीमकुंड या नावावरून या कुंडल महाभारताचा एक इतिहास आहे हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले असेलच.

 

in marathi 6

 

या कुंडामागे असलेली कथा अशी की, ” जेव्हा पांडव अज्ञातवासात होते, तेव्हा त्यांनी काही हजारो किलोमीटरचा भाग पिंजून काढला होता. त्याचवेळी ते फिरत फिरत बजना या गावाजवळ पोहोचले. तेव्हा पांडवांना खूप तहान लागली होती. मात्र आसपास पाणी पिण्यासाठी कोणतीच नदी अथवा तलाव त्यांना मिळत नव्हता.

 

in marathi 7

हे ही वाचा – गूढ गोष्टी: पुण्यातील तथाकथित ‘भुताने झपाटलेली’ ११ ठिकाणे

अखेर खूप थकल्यावर भीमाने या ठिकाणी त्याच्या गदेने जोरात जमिनीवर मारले असता, तिथे एक मोठा खड्डा तयार झाला आणि त्यातून पाणी बाहेर आले. तेव्हापासून हे कुंड तिथे स्थित असल्याचे सांगितले जाते. निरखून पाहिले तर लक्षात येईल की या कुंडाचा आकार देखील एखाद्या गदे सारखाच आहे.

 

in marathi 2 png

 

या कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे या कुंडातील पाणी कधीच कमी होत नाही. तसे पाहिले गेले तर साचलेले पाणी लवकर गढूळ किंवा खराब होते त्याचा वास येतो, मात्र हे साचलेले पाणी असूनही खूप स्वच्छ आहे. त्या पाण्याचा वापर तेथील स्थानिक लोक पिण्यासाठी देखील करतात.

आश्चर्यकारक बाब म्हणजे या क्षेत्रात पाण्याचा दूर-दूरपर्यंत कुठलाही स्रोत नाही. जर दुष्काळ पडला तरीही या कुंडातील पाणी कमी होत नाही. आजपर्यंत मोठमोठे वैज्ञानिकही याचं कारण शोधू शकलेले नाहीत की या कुंडात पाणी येतं कुठून?

 

in marathi 3png

हे ही वाचा – सावधान! हे गूढ जंगल तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायला भाग पाडेल

या कुंडाची अजून एक विशेषतः म्हणजे, असे सांगितले जाते की, जेव्हा आपल्या देशावर किंवा आजुबाजुच्या देशांवर कोणतीही नैसर्गिक आपदा येणार असते, तेव्हा या कुंडाचे पाणी आपोआप वाढते.

या कुंडाची खोली अजूनपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला शोधता आली नाहीये. काही परदेशी वैज्ञानिकांनी या कुंडाची खोली जाणून घेण्याच्या दृष्टीने साधारण २०० मीटर खोलपर्यंत एक कॅमेरा सोडला होता, मात्र तरीही त्याची खोली समजली नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?